Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुषमा अंधारे यांची खोचक टीका; म्हणाल्या,‘चल रे खोक्या टुनुक टुनुक..’

“आम्ही चल रे भोपळ्या टुनुक टुनुक म्हणायचो सध्याच्या राजकारणात चल रे खोक्या टुनुक टुनुक आहे”, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 17, 2024 | 08:09 PM
सुषमा अंधारे यांची खोचक टीका; म्हणाल्या,‘चल रे खोक्या टुनुक टुनुक..’
Follow Us
Follow Us:

पुणे : शिवसेनेच्या (ShivSena) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड (PCMC) येथे त्यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. “आम्ही चल रे भोपळ्या टुनुक टुनुक म्हणायचो सध्याच्या राजकारणात चल रे खोक्या टुनुक टुनुक आहे”, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली आहे. तसेच सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचे पुढील कार्यक्रमाचे आयोजन देखील सांगितले.

सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये नार्वेकरांच्या प्रत्युत्तर देणाऱ्या पत्रकार परिषदेवर निशाणा साधला. नार्वेकर यांनी सारवासारव परिषद घेतली अशी खोचक टीका देखील अंधारे यांनी केली. पुढे त्या म्हणाल्या “काल सगळं उघड झालंय. राहुल नार्वेकर यांच्यावर लोक विश्वास ठेवणार नाहीत. पक्षाची 2013 ला निवडणूक झाली, त्यांना 1999 ची घटना मान्य करायची असेल तर त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षाचे नेते नाहीत, तसेच उपनेते देखील नाहीत. गजानन कीर्तिकर, रामदास साहेब हे मागे गेले शिंदे पुढे आले. सगळे AB फॉर्म तुम्ही अमान्य करणार का?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

“पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाहीत तर मग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलणी करण्यासाठी मातोश्रीचे उंबरे का झिजवले? 70-72वर घरे घेणारे नेते त्यांच्याशी बोलणी का नाही गेली? 1999 साली तेव्हाच पक्ष का नाही गोठला? नोटीस का नाही पाठवली? असे सवाल उपस्थित करत अंधारे यांनी भाजप व अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. महापत्रकार परिषदेनंतर 26 जानेवारीपासून शिवसेना (ठाकरे गट) राज्यस्तरीय दौरा आखला जाणार आहे. लवकरच याची माहिती सविस्तर देऊ असे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले.

Web Title: Shivsena sushma andhare slams bjp and rahul narwekar on mla disqualification case result nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2024 | 08:09 PM

Topics:  

  • Rahul Narwekar
  • Shiv Sena
  • sushma andhare

संबंधित बातम्या

‘सुषमा अंधारेंनी कठीण काळात पक्षाची साथ दिली, पण…’; सचिन अहिरांचे वक्तव्य चर्चेत, सुषमा अंधारे शिंदेंच्या सेनेत जाणार?
1

‘सुषमा अंधारेंनी कठीण काळात पक्षाची साथ दिली, पण…’; सचिन अहिरांचे वक्तव्य चर्चेत, सुषमा अंधारे शिंदेंच्या सेनेत जाणार?

‘ऑपरेशन टायगर’नंतर धावपळीचा परिणाम; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल, सर्व कार्यक्रम रद्द
2

‘ऑपरेशन टायगर’नंतर धावपळीचा परिणाम; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल, सर्व कार्यक्रम रद्द

Maharashtra Politics: मुंबईच्या चर्चेवेळी अधिकारी गायब; विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांची नगरविकास सचिवांना नोटीस
3

Maharashtra Politics: मुंबईच्या चर्चेवेळी अधिकारी गायब; विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांची नगरविकास सचिवांना नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.