Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्थसंकल्प सादर होण्याआधीच ठाकरे गटाकडून देशाच्या आर्थिक स्थितीबाबत केंद्रावर टीकास्र,

गेल्या पाच वर्षांत असंख्य व्यावसायिक, उद्योगपतींनी देशाची लाखो कोटी रुपयांची कर्जे बुडवली आहेत. बँकांकडून कर्ज घेऊन ही मंडळी गायब झाली आहेत. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या अशा काही मोजक्या कर्जबुडव्यांची प्रकरणे समोर आली असली तरी समोर न आलेले कर्जबुडवे ‘मोदी-चोक्सी-मल्ल्या’ शेकडो आहेत आणि त्यांनी बुडविलेल्या कर्जाची रक्कमही प्रचंड आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Feb 01, 2023 | 09:46 AM
अर्थसंकल्प सादर होण्याआधीच ठाकरे गटाकडून देशाच्या आर्थिक स्थितीबाबत केंद्रावर टीकास्र,
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.या पार्श्वभूमीवर आज अर्थमंत्री नेमक्या कोणत्या घोषणा करणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागली असताना ठाकरे गटाकडून देशाच्या आर्थिक स्थितीबाबत केंद्रावर टीकास्र सोडण्यात आलं आहे. सामनातील अग्रलेखातून बुडीत कर्जाच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य करण्यात आलं आहे.

कर्जवसुलीची प्रक्रिया कागदोपत्री सुरू
“देशातील सुमारे 7 लाख कंपन्यांविरोधात कर्जवसुलीचे खटले सुरू असून त्यातील बहुतांश कंपन्या एक तर बंद पडल्या आहेत किंवा ‘गायब’ झाल्या आहेत. म्हणजे म्हणायला कर्जवसुलीची प्रक्रिया कागदोपत्री सुरू आहे, पण या ७ लाख कंपन्यांकडील कोटय़वधींचे थकीत कर्ज वसूल होण्याची शक्यता फार कमी आहे”, असं अग्रलेखात नमूद केलं आहे.

सात लाख कंपन्यांविरोधात हे खटले
“सर्व कंपन्यांविरोधात कर्जवसुलीचे खटले सुरू आहेत. पण ज्या सात लाख कंपन्यांविरोधात हे खटले सुरू आहेत त्यातील बहुतांश बंद पडल्या आहेत, दिवाळखोर झाल्या आहेत किंवा ‘गायब’ झाल्या आहेत. त्यात अशा व्यवसाय गुंडाळून पोबारा केलेल्या किती कंपन्या आहेत, त्यांचे मालक कोण आहेत याची अधिकृत माहिती खुद्द कंपनी व्यवहार मंत्रालयाकडेच नाही. हे जर खरे असेल तर मग हे कर्जवसुलीचे खटले म्हणजे हवेतली तलवारबाजीच ठरते. एक सरकारी सोपस्कार म्हणून ही प्रक्रिया सुरू आहे का?” असा सवाल अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

उद्योगपतींनी देशाची लाखो कोटी रुपयांची कर्जे बुडवली
गेल्या पाच वर्षांत असंख्य व्यावसायिक, उद्योगपतींनी देशाची लाखो कोटी रुपयांची कर्जे बुडवली आहेत. बँकांकडून कर्ज घेऊन ही मंडळी गायब झाली आहेत. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या अशा काही मोजक्या कर्जबुडव्यांची प्रकरणे समोर आली असली तरी समोर न आलेले कर्जबुडवे ‘मोदी-चोक्सी-मल्ल्या’ शेकडो आहेत आणि त्यांनी बुडविलेल्या कर्जाची रक्कमही प्रचंड आहे. कर्जबुडव्या कंपन्यांपासून बुडीत कर्जापर्यंत सगळे काही लाखांत आणि कोटय़वधींमध्येच आहे. तरीही विकास आणि आत्मनिर्भरतेचे ढोल पिटले जात आहेत”, असा आक्षेप ठाकरे गटाकडून घेण्यात आला आहे. “देशातील सामान्य माणूस कर्जाचा हप्ता कसा भरायचा, या विवंचनेत आहे आणि काही लाख कोटी रुपये बुडविणाऱ्या कंपन्यांचे मालक बुडीत कर्जाचा ‘ढेकर’ देत निर्धास्त आणि बिनधास्त आहेत. सरकार कागदी घोडे नाचविण्यात, तर कंपनी व्यवहार मंत्रालय कर्जवसुली खटल्यांच्या ‘फार्स’मध्ये मग्न आहे. हे असेच सुरू राहिले तर हा फार्स उद्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ‘फास’ ठरू शकतो, पण त्याचा विचार करायला सरकारला वेळ कुठे आहे?” असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

Web Title: Shivsena thackeray group slams narendra modi govt on budget 2023 nirmala sitharaman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2023 | 09:00 AM

Topics:  

  • BJP
  • budget 2023
  • Nationalist Congress Party
  • Nirmala Sitharaman
  • shivsena
  • Shivsena Thackeray Group

संबंधित बातम्या

Shivsena : “होमवर्क न केलेल्या मुलांचे अर्धवट वर्कशॉप”, आदित्य आणि अमित ठाकरेंवर शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे यांची घणाघाती टीका
1

Shivsena : “होमवर्क न केलेल्या मुलांचे अर्धवट वर्कशॉप”, आदित्य आणि अमित ठाकरेंवर शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे यांची घणाघाती टीका

Nanded:  भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा
2

Nanded: भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा

PCMC Election 2026: ‘माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यांसोबत मी आज सत्तेत…’; अजित पवारांचा भाजपवर जहरी पलटवार
3

PCMC Election 2026: ‘माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यांसोबत मी आज सत्तेत…’; अजित पवारांचा भाजपवर जहरी पलटवार

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार
4

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.