Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासदार श्रीकांत शिंदेंच्या मागणीची परिवहन मंत्री सरनाईकांकडून दखल, ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे निर्देश

ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांच्या माध्यमातून प्रवाशांच्या अडचणीचा गैरफायदा घेत आर्थिक शोषण करण्याच्या प्रकारांविरोधात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या मागणीची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ दखल घेतली आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 11, 2026 | 06:16 PM
Shrikant Shinde, app based taxi services, transport minister Pratap Sarnaik,

Shrikant Shinde, app based taxi services, transport minister Pratap Sarnaik,

Follow Us
Follow Us:

ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांच्या माध्यमातून प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप मागणे, अतिरिक्त रकमेची सक्ती करणे तसेच प्रवाशांच्या अडचणीचा गैरफायदा घेत आर्थिक शोषण करण्याच्या प्रकारांविरोधात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मागणीची राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ दखल घेत संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांना दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून विविध ॲप-आधारित टॅक्सी सेवांबाबत प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी समोर येत होत्या. प्रवास स्वीकारल्यानंतर अतिरिक्त टिप किंवा जादा रकमेची मागणी करणे, ती न मिळाल्यास प्रवास रद्द करणे अथवा प्रवाशांना मानसिक त्रास देणे असे प्रकार वाढल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.

या मागणीची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप मागण्याचा प्रकार अन्यायकारक असल्याचे स्पष्ट केले. तसेच संबंधित कंपन्यांच्या कारभाराची चौकशी करून आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांना देण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी परिवहन मंत्री सरनाईक यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभारही व्यक्त केले. ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवा देणाऱ्या कंपन्यांचा मनमानी कारभार रोखण्यासाठी परिवहन विभागाकडून महत्त्वपूर्ण उपाययोजना राबविण्यात येणार असून या क्षेत्रासाठी लवकरच नवीन ॲग्रीगेटर धोरण जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांकडून प्रवाशांवर जबरदस्तीने टिप मागणे हा प्रकार प्रवाशांसाठी अन्यायकारक आहे. याबाबत संबंधित कंपन्यांवर परिवहन आयुक्तांना त्वरीत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ही बाब मा. खासदार @DrSEShinde यांनी आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल त्यांचे… https://t.co/2Bs0Y50CMe — Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) June 11, 2026

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रवाशांच्या हितासाठी सातत्याने आवाज उठविला असून ग्राहकांना पारदर्शक, न्याय्य आणि सुरक्षित सेवा मिळावी यासाठी त्यांनी ही मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारने तात्काळ पावले उचलल्याने लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल.

Maharashtra Politics : राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज; म्हणाले, ‘काही जण कष्ट न करताच…’

मागणी काय होती ?

अॅप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांकडून प्रवाशांवर लादल्या जाणाऱ्या या अन्यायकारक पद्धतीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना कठोर कारवाई करण्याचे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले होते. तर गरजेच्या वेळी प्रवाशांना वेठीस धरणे, त्यांची अडचण ओळखून आर्थिक शोषण करणे आणि जादा रक्कम देण्यास भाग पाडणे, हा प्रकार ग्राहकांच्या हक्कांवर गदा आणणारा आहे. ही केवळ चुकीची व्यावसायिक पद्धत नसून ग्राहकांना अक्षरशः ओलीस ठेवण्यासारखी बाब आहे. ग्राहकांकडून स्वेच्छेने मिळणारी टिप ही सेवेच्या गुणवत्तेची पावती असते; मात्र टिप किंवा अतिरिक्त शुल्कासाठी दबाव टाकणे, सेवा नाकारण्याची धमकी देणे किंवा ग्राहकांना मानसिक त्रास देणे हे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही.ग्राहकांना पारदर्शक, न्याय्य आणि सुरक्षित सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे अशा शोषणात्मक आणि ग्राहकविरोधी प्रकारांवर तातडीने अंकुश ठेवून संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार डॉ.शिंदे यांनी केली होती.

‘ते सर्व फक्त आणि फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम आणि कृतघ्न लोकं…’ अजित पवार विमान अपघातप्रकरणी रोहित पवार संतापले

Web Title: Shrikant shinde demands to action against app based taxi services transport minister pratap sarnaik took notes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • Dr Shrikant shinde
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

ST workers DA : एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ताही वाढवणार; प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा
1

ST workers DA : एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ताही वाढवणार; प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Mira Bhayandar Case : ‘दोषींना कोणतीही माफी नाही…’, मीरा-भाईंदर अत्याचार प्रकरणावर प्रताप सरनाईक यांची कठोर भूमिका
2

Mira Bhayandar Case : ‘दोषींना कोणतीही माफी नाही…’, मीरा-भाईंदर अत्याचार प्रकरणावर प्रताप सरनाईक यांची कठोर भूमिका

Pratap Sarnaik : घोडबंदरच्या ‘शिवसृष्टी’ला अखेर वेग; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी माहिती
3

Pratap Sarnaik : घोडबंदरच्या ‘शिवसृष्टी’ला अखेर वेग; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी माहिती

अमराठी चालकांचा व्यवहारिक मराठी शिकण्याकडे उत्स्फूर्त कल : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक
4

अमराठी चालकांचा व्यवहारिक मराठी शिकण्याकडे उत्स्फूर्त कल : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.