Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी, संजय राऊत यांची नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे विनंती

मागील अनेक दिवसांपासून शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाकडून अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहे.श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत आत्तापर्यंत उपक्रमांसाठी आणि उपक्रमांसाठी करण्यात आलेल्या खर्चाची निधीचा स्रोत नेमकं काय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 15, 2024 | 11:17 AM
Sanjay-Raut-PTI-1

Sanjay-Raut-PTI-1

Follow Us
Close
Follow Us:

मागील अनेक दिवसांपासून शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाकडून अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहे. त्यातच आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या (Shrikant Shinde Foundation) संशयास्पद आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत आत्तापर्यंत उपक्रमांसाठी आणि उपक्रमांसाठी करण्यात आलेल्या खर्चाची निधीचा स्रोत नेमकं काय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी

श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनच्या कार्यासाठी ज्यांनी कोट्यावधी रुपये दिले ते दानशूर कोण? ही माहिती सर्वसामान्य नागरिकांना द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. धर्मदाय आयुक्त या संदर्भात चौकशी करावी, अशी तक्रार वकील नितीन सातपुते यांनी केली आहे. मात्र एक महिना उलटून गेल्यानंतरही कुठल्या गोष्टीची दाखल घेण्यात आलेली नाही. तसेच माहितीच्या आधारात ही सगळी माहिती दिली जात नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्र राज्यातदेखील सुरू आहे.
त्याखेळाचे सूत्रधार आहेत मिंधेसरकारचे बाळराजे!
सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहेत.
धर्मादाय आयुक्त हिशोब द्यायाला तयार नाहीत.
पैसै देणारेकोण आहेत?
⁦@PMOIndia⁩
⁦@Dev_Fadnavis⁩ pic.twitter.com/LFD2dAfAn9
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 15, 2024

खासदार संजय राऊत यांनी पत्राद्वारे केलेल्या मागणीमध्ये म्हंटले आहे, ‘चंदा लो धंदा लो’ हा खेळ सध्या महाराष्ट्रामध्ये सुरु आहे. त्याखेळाचे सूत्रधार आहेत मिंधेसरकारचे बाळराजे! सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहेत. धर्मादाय आयुक्त हिशोब द्यायाला तयार नाहीत. पैसै देणारे कोण आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत यांनी लिहिलेल्या पत्रात म्हंटल आहे की,

मा. प्रधानमंत्रीजी,

विषय: श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याबाबत.

महोदय,

देशातील भ्रष्टाचार, काळ्या पैशांचे व्यवहार मोडून काढण्यासाठी आपण गेल्या १० वर्षांपासून अथक परिश्रम करीत आहात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही आपण जनतेला पुन्हा एकदा तेच आश्वासन दिले. त्यानिमित्त महाराष्ट्रातील काळा पैसा पांढरा करण्याचे व गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा समाजकार्याच्या नावाखाली ‘पांढरा करण्याचा एक धंदा मी आपल्या निदर्शनास आणत आहे.

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचा सध्या राजकीय गाजावाजा सुरू आहे. सदर फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची सार्वजनिक धर्मादाय न्यासाने सखोल चौकशी करावी अशी तक्रार प्रसिद्ध वकील श्री. नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे, पण या तक्रारीस एक महिना उलटून गेला तरी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडून तक्रारीची साधी दखल घेतली गेली नाही. धर्मादाय आयुक्तांवर राजकीय दबाव असल्यामुळेच ते माहितीच्या अधिकारातही याबाबतची माहिती द्यायला तयार नाहीत असे दिसते.

महाराष्ट्राला सामाजिक कार्याची मोठी परंपरा आहे. अनेक समाजसेवकांनी प्रसंगी पदरमोड करून संस्थात्मक कार्य केले आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक कार्य होत असेल तर त्यास आक्षेप असण्याचे कारण नाही. या फाउंडेशनतर्फे अनेक शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात व ते अत्यंत भव्य स्वरूपात होतात. ते कार्य कौतुकास्पद आहेच, पण या भव्य उपक्रमावर आतापर्यंत खर्च झालेल्या कोटधवधी रुपयांचे स्रोत काय? या कार्यासाठी ज्यांनी कोट्यवधी रुपये दिले ते दानशूर कोण? याची माहिती नागरिकांना मिळणे गरजेचे आहे.

श्रीकांत शिंदे फाऊंडेशन अनेक गरजूंना रोख स्वरूपातदेखील मदत करते. मनोरंजनाच्या अनेक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करते. त्यासाठी भव्य मंडप, देखावे, रोषणाई, कलाकारांचे संच ज्यांचा मेहनताना कोट्यवधीचा आहे. त्यांना बिदागीच्या रकमा कोणत्या माध्यमातून दिल्या गेल्या? त्याबाबत धर्मादाय आयुक्तांनी प्रकाश टाकायलाच हवा.

श्रीकांत शिंदे फाऊंडेशन वैद्यकीय उपक्रम घेते. वैद्यकय मोफत उपचार करते असे सांगितले गेले. ते उपक्रम नक्कीच वाखाणण्यासारखे आहेत, पण याबाबत ज्यांनी देणग्या दिल्या त्यांची पार्श्वभूमी काय? ते तपासणे गरजेचे आहे. ज्यांनी देणग्या दिल्या ते मुख्यमंत्री कार्यालयाचे लाभार्थी आहेत काय?

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे संबंध राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी असल्याने त्याबाबतचे सर्व व्यवहार हे पारदर्शक पद्धतीने होणे गरजेचे होते. या फाऊंडेशनवर मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती सदस्य आहेत? फाऊंडेशनचे आतापर्यंतचे सर्व हिशेबे धर्मादाय आयुक्तांकडे सुपूर्द केले आहेत काय? याबाबत गोपनीयता बाळगली जात आहे. या फाऊंडेशनसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष उघडला आहे व त्या माध्यमातून बिल्डर, ठेकेदारांकडून रोखीत रकमा घेतल्या जातात. आतापर्यंत किमान ५०० कोटी रुपये या माध्यमातून जमा केले आहेत.

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे इर्शाळवाडी येथील प्रकल्पग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली आहे. तसेच या संकटामुळे अनाथ झालेल्या बालकांना दत्तक घेण्याची जबाबदारी श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने स्वीकारली आहे. सदर बाब ही माणुसकी धरूनच आहे, परंतु अशा कार्यासाठी खूप मोठा निधी लागतो. सदर निधी ज्या देणगीदारांकडून प्राप्त झाला असेल त्यांचा योग्य सन्मान आणि त्यांच्या दातृत्वाची पुरेशी प्रसिद्धी होणे उचित ठरेल, परंतु सदर उपक्रम हाती घेताना शासकीय निधीचा वापर करून जर कोणी राजकीय व्यक्ती त्याचे श्रेय घेत असेल तर ते नुसते अनैतिक नसून गुन्हेगारी स्वरूपाचेदेखील आहे. यास मराठीमध्ये मेलेल्या माणसांच्या टाळूवरील लोणी खाणे असे म्हणतात.

नागरिकांना गणपतीच्या सणासाठी गावी जाण्यासाठी एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणात त्यांच्या गाड्या श्रीकांत शिंदे फाउंडेशनला उपलब्ध करून दिल्याचे वर्तमानपत्रातून समजले. सदर गाडधांचे पैसे प्राप्त झाले आहेत किंवा नाही याची माहिती करदात्या नागरिकांस होणे आवश्यक आहे. कारण जर पैसे प्राप्त झाले नसतील तर हा शासकीय निधीचा गैरवापर असून त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. जर निधी प्राप्त झाला असेल तर श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून निधीच्या देणगीदारांची नावे प्रसिद्ध होणे किंवा नागरिकांना सदर बाब समजणे आवश्यक आहे. देणगीदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला कोणत्या कारणासाठी पैसे देतात की धार्मिक बाब म्हणून कोट्यवधी रुपयांची दक्षिणा देतात, याचा खुलासा आवश्यक आहे.

Web Title: Shrikant shindes foundations financial dealings should be investigated sanjay rauts request in a letter to narendra modi nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2024 | 11:15 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • election 2024
  • narendra modi
  • sanjay raut
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: महायुतीमध्येच नेत्यांची चोरी; निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंना धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ
1

Maharashtra Politics: महायुतीमध्येच नेत्यांची चोरी; निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंना धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ

Shiv Sena Symbol Dispute : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
2

Shiv Sena Symbol Dispute : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश

Navi Mumbai International Airport Inauguration पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज भव्य लोक
3

Navi Mumbai International Airport Inauguration पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज भव्य लोक

ब्रिटिनच्या PM चा मिश्किल अंदाज; विमानत बसताच भारतीयांसोबत केला हास्यविनोद, म्हणाले, “मी तुमचा पंतप्रधान
4

ब्रिटिनच्या PM चा मिश्किल अंदाज; विमानत बसताच भारतीयांसोबत केला हास्यविनोद, म्हणाले, “मी तुमचा पंतप्रधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.