Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओव्हरलोड व भरधाव वेगातील वाहतुकीला पायबंद लावा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा इशारा

आचरा भागात आडवली, श्रावण व इतर भागात चिरेखाणी आहेत. तर देवगडमध्ये तोरसोळे, विजयदुर्गमध्ये वाघोटन व इतर भागात असलेल्या या सर्व चिरेखाणींवरून परजिल्ह्यात किंवा परराज्यात वाहतूक होते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 26, 2023 | 05:55 PM
ओव्हरलोड व भरधाव वेगातील वाहतुकीला पायबंद लावा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा इशारा
Follow Us
Follow Us:

सिंधुदुर्ग : आचरा, देवगड, विजयदुर्ग भागातून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड गाड्या चिऱ्यांची वाहतूक करतात. या गाड्या चिरे भरण्यासाठी जात असताना भरधाव वेगात असतात. अलिकडेच तोरसोळे येथे झालेला अपघात हे त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे याला पोलीस, महसुल व आरटीओ विभागाने पायबंद घालण्याची गरज आहे. याबाबत प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही न झाल्यास गणेशोत्सवानंतर रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला आहे.

आचरा भागात आडवली, श्रावण व इतर भागात चिरेखाणी आहेत. तर देवगडमध्ये तोरसोळे, विजयदुर्गमध्ये वाघोटन व इतर भागात असलेल्या या सर्व चिरेखाणींवरून परजिल्ह्यात किंवा परराज्यात वाहतूक होते. नियमानुसार ही वाहतूक करण्यास आमचा विरोध नाही. परंतु, परराज्य अथवा परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाहने येत असतात. यात बऱ्यापैकी वाहने ही १६ चाकी ट्रक आहेत. स्पर्धेच्या काळात ही वाहने चिरे भरण्यासाठी जात असताना भरधाव वेगात जातात. गेल्या आठवड्यात तोरसोळेच्या अपघातात तळेबाजार येथील आई व मुलाचा दुदैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर लोकांचा झालेला उद्रेक प्रशासनाने पाहिलेला आहे.

आपल्याकडील रस्ते मोठे नाहीत, अरूंद रस्त्यांवरून ही वाहने भरधाव वेगात धावत असतात. तसेच अनेक ठिकाणी रस्ते वळणाचे असल्याने भरधाव वेगातील वाहने आवरणे कठिण जाते. या मार्गावर काही ठिकाणी शाळाही आहेत. भरधाव वेगातील वाहनांपासून शालेय विद्यार्थ्यांनाही धोका उद्भवण्याची शक्यता आहे.

त्यामुळे अशा ओव्हरलोड तसेच भरधाव वेगातील वाहनांना प्रतिबंध करण्याची गरज आहे. तसेच असे अपघात भविष्यात होऊ नयेत, यासाठी उपाययोजनाही करण्याची गरज आहे. ही सर्व जबाबदारी, पोलीस, महसुल व आरटीओ विभागाची आहे. कणकवली, मालवण व देवगड तालुक्यातील संबंधित यंत्रणांनी याबाबत गांभीर्याने घेऊन उपाययोजना केल्या पाहिजेत. मात्र, अशा उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसते. त्यामुळे संबंधीत यंत्रणांनी गणेशोत्सव संपेपर्यंत याबाबतच्या उपाययोजना करून या वाहतूकीला प्रतिबंध करण्याची आमची मागणी आहे. तसे न झाल्यास गणेशोत्सवानंतर रस्त्यावर उतरावे लागेल, असेही श्री. पारकर यांनी म्हटले आहे.

Web Title: Sindhudurg achra devgad vijaydurg shiv sena district chief sandesh parkar maharashtra political party maharashtra government kankavali malvan devgad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2023 | 05:55 PM

Topics:  

  • Devgad
  • kankavali
  • maharashtra
  • Maharashtra Government
  • Malvan
  • Shiv Sena
  • Vijaydurg

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कर्जमाफीची मर्यादा 50 हजारांवरून 2 लाख, ‘ही’ अटही रद्द
1

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कर्जमाफीची मर्यादा 50 हजारांवरून 2 लाख, ‘ही’ अटही रद्द

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेचा पुढाकार! CET संकेतस्थळावरील सूचना मराठी भाषेत करण्याची मागणी
2

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेचा पुढाकार! CET संकेतस्थळावरील सूचना मराठी भाषेत करण्याची मागणी

Thane Building Collapse : ठाण्यात पावसाचा कहर! मद्रास चाळीची गॅलरी कोसळली; १० वर्षीय मुलाचा मृत्यू, महिला व बालक जखमी
3

Thane Building Collapse : ठाण्यात पावसाचा कहर! मद्रास चाळीची गॅलरी कोसळली; १० वर्षीय मुलाचा मृत्यू, महिला व बालक जखमी

Satara News : वाईच्या पश्चिम भागातील उत्खनन प्रकरण तापले; दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
4

Satara News : वाईच्या पश्चिम भागातील उत्खनन प्रकरण तापले; दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.