Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol Diesel Price Hike : ११ दिवसांत इंधन 8 रुपयांनी महाग! सिंधुदुर्ग काँग्रेसचे निवेदन, दरवाढ मागे घेण्याची मागणी

Sindhudurg Congress : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र आंदोलन छेडत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. गेल्या ११ दिवसांत इंधन दरात तब्बल ८ रुपयांची वाढ झाल्याचा आरोप करत केंद्र सरकारच्या धोरणांवर काँग्रेसने जोरदार टीका केली असून तात्काळ दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे

  • By श्वेता झगडे
Updated On: May 29, 2026 | 05:42 PM
११ दिवसांत इंधन 8 रुपयांनी महाग! सिंधुदुर्ग काँग्रेसचे निवेदन, दरवाढ मागे घेण्याची मागणी

११ दिवसांत इंधन 8 रुपयांनी महाग! सिंधुदुर्ग काँग्रेसचे निवेदन, दरवाढ मागे घेण्याची मागणी

Follow Us
Follow Us:
  • पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात सिंधुदुर्ग काँग्रेस आक्रमक
  • केंद्र सरकारवर नफेखोरीचा आरोप
  • पेट्रोल-डिझेल दरवाढीवर सिंधुदुर्ग काँग्रेसचा संताप
Petrol Diesel Price Hike News Marathi : मागील काही दिवसांत झालेल्या प्रचंड पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने आज निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. केंद्र सरकारच्या ‘नफेखोरी’ धोरणामुळे सर्वसामान्य जनता महागाईच्या खाईत होरपळत असल्याचा थेट आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीने हे निवेदन देण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी हे निवेदन स्वीकारले असून, आंदोलकांनी तात्काळ दरवाढ मागे घेण्याची मागणी लावून धरली आहे.

जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

निवेदनात नमूद केल्यानुसार, गेल्या ११ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तब्बल ८ रुपये प्रति लीटर इतकी वाढ करण्यात आली आहे. आधीच महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा हा प्रकार आहे. गेल्या १२ वर्षांचा विचार करता पेट्रोलच्या किमतीत ३८ टक्के, तर डिझेलच्या किमतीत ६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

PCMC Toxic Liquor Case: दारूत मिसळलेला ‘तो’ एक रासायनिक पदार्थ…; ज्याने घेतले 8 जणांचे बळी

डॉ. मनमोहन सिंग सरकारचा दिला दाखला

काँग्रेसने आपल्या निवेदनात युपीए (UPA) सरकारच्या काळातील दरांची तुलना सध्याच्या परिस्थितीशी केली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचले असतानाही, देशात पेट्रोल-डिझेलचे दर ७२ रुपयांच्या वर जाऊ दिले नाहीत. तत्कालीन सरकारने महागाईचा भार जनतेवर पडू दिला नाही. मात्र, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव ५०-५५ डॉलर्सच्या आसपास असतानाही देशात पेट्रोल १०० रुपयांच्या वर विकले जात असल्याकडे काँग्रेसने लक्ष वेधले आहे.

‘४३ लाख कोटींची नफेखोरी’ आणि इंधन कंपन्यांचा दरोडा

“गेल्या १२ वर्षांत केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनावरील कर आणि उत्पादन शुल्काच्या माध्यमातून जनतेच्या खिशातून तब्बल ४३ लाख कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. इतकेच नव्हे तर, मागील अवघ्या ४-५ दिवसांत केलेल्या ४ रुपयांच्या दरवाढीमुळे भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांनी बाजारातून अवघ्या काही तासांत १२,४०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही नफेखोरी म्हणजेच जनतेच्या खिशावर उघड दरोडा आहे,” असा घणाघाती आरोप काँग्रेसने केला आहे.

शेतीची कामे रखडली; महागाईचे दुष्टचक्र वाढणार

डिझेलच्या दरवाढीमुळे आणि राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर सुरू असलेल्या तुटवड्यामुळे ग्रामीण भागातील शेतीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. शेतीकामासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, मात्र डिझेलअभावी शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतीची कामे वेळेत झाली नाहीत तर अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम होऊन पुन्हा महागाई वाढेल, अशी भीती निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेचा चा ग्रीन मास्टरस्ट्रोक! मुंबईतील पालिका कार्यालयांत उभारले जाणार EV चार्जिंग स्टेशन

काँग्रेसच्या प्रमुख मागण्या

* पेट्रोल आणि डिझेलची केलेली दरवाढ तात्काळ मागे घ्यावी.
* सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरवठा विनाअडथळा आणि सुरळीत करावा.
* महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत.

या मागण्यांचा संवेदनशीलतेने विचार न झाल्यास आगामी काळात काँग्रेस पक्षाच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी दिला आहे.

Web Title: Sindhudurg congress protest petrol diesel price hike memorandum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • Congress
  • Petrol diesel price
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
1

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
2

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
3

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

‘दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या, नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारला इशारा
4

‘दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या, नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.