Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नौसेना दिन सिंधुदुर्गमध्ये होत आहे हे महाराष्ट्रासाठी भूषण -एकनाथ शिंदे

किल्ले राजकोट येथे नेवी तसेच राज्य शासन सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य पुतळा उभारणी करण्यात आला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 01, 2023 | 10:52 AM
नौसेना दिन सिंधुदुर्गमध्ये होत आहे हे महाराष्ट्रासाठी भूषण -एकनाथ शिंदे
Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ४ डिसेंबर रोजी होत आहे. महाराष्ट्र व देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. त्या सोबतच नौसेना दिन सिंधुदुर्ग येथे होत आहे, हेही महाराष्ट्रासाठी भुषण आहे. हे दोन्ही कार्यक्रम न भूतो न भविष्यती असे होतील. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले राजकोट येथे बोलताना व्यक्त केले.

किल्ले सिंधुदुर्ग समुद्र परिसरात होणारा नौसेना दिन सोहळा म्हणजे आरमारचे जनक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन अशा स्वरूपात हा सोहळा असणार आहे. या संपूर्ण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून शासनाच्या माध्यमातून सर्वत्र जय्यत तयारी सुरु असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

किल्ले राजकोट येथे नेवी तसेच राज्य शासन सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य पुतळा उभारणी करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार रवींद्र फाटक, माजी खासदार निलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, तहसीलदार वर्षा झालटे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, आनंद शिरवलकर, माजी उपासभापती राजू परुळेकर, शिवसेना जिल्हा पदाधिकारी बबन शिंदे, तालुकाध्यक्ष राजा गावकर, नीलम शिंदे, हर्षद पारकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कुमुदिनी प्रभू, नौदल, पोलीस तसेच अन्य विभागाचे अधिकारी, शिवसेना, भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. एकनाथ शिंदे म्हणाले, गेले दोन महिने राजकोट येथे नौदल व शासनाच्या वतीने शिव पुतळा उभारण्याचे काम हाती घेत ते मार्गी लावण्यात आले आहे. येत्या ४ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होईल. नौसेना दिन हा पूर्वी दिल्लीत व्हायचा मात्र यावर्षी तो येथे होत आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांना मोठे अभिवादन आहे. कारण शिवाजी महाराज हे आरमाराचे जनक होते. त्यांनी पहिले आरमार सुरू केले. त्याची दखल पंतप्रधानांनी आणि नौदल विभागाने घेऊन नौसेना दिन येथे साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पंतप्रधानांचे मी आभार मानत आहे. नौदल विभागाच्या ध्वजावर देखील शिवमुद्रा लावण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांची एक दैवी कृपा आहे. त्यामुळे हा कार्यक्रम न भूतो न भविष्यती असा होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Sindhudurg prime minister narendra modi cm eknath shinde maharashtra government maharashtra political party shivsena maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2023 | 10:52 AM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • maharashtra
  • Maharashtra Government
  • political party
  • Prime Minister Narendra Modi
  • shivsena

संबंधित बातम्या

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
1

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

Shivsena News: “मुंबईतील समूह पुनर्विकास योजना देशभर राबवा…”, मिलिंद देवरा यांची राज्यसभेत मागणी
2

Shivsena News: “मुंबईतील समूह पुनर्विकास योजना देशभर राबवा…”, मिलिंद देवरा यांची राज्यसभेत मागणी

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा
3

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर
4

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.