Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा लोकसभेसाठी तब्बल ‘इतके’ उमेदवार रिंगणात; पाच जणांची माघार

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत सातारा लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे लोकसभा मतदारसंघाकरिता आता 16 उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 23, 2024 | 09:56 AM
सातारा लोकसभेसाठी तब्बल ‘इतके’ उमेदवार रिंगणात; पाच जणांची माघार
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत सातारा लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे लोकसभा मतदारसंघाकरिता आता 16 उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झाले आहे.

दरम्यान या निवडणूकीत थेट लढत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विरूध्द महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यातच होणार आहे.
शनिवारी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. छाननीमध्ये तीन उमेदवारी अर्ज अवैध ठरले. त्यामुळे 21 उमेदवारांचे अर्ज निवडणुकीसाठी पात्र ठरले होते. पाच उमेदवारांनी अंतिम दिवसाअखेर अर्ज माघारी घेतले आहेत. दरम्यान माघारी प्रक्रियेनंतर सर्व उमेदवारांना निवडणुक चिन्हांचे वाटप करण्यात आले.

उमेदवार आणि त्यांना मिळालेले चिन्ह :

आनंद रमेश थोरवडे(बहुजन समाज पार्टी) चिन्ह-हत्ती, उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले (भारतीय जनता पक्ष) चिन्ह-कमळ, शशिकांत जयवंतराव शिंदे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष) चिन्ह-तुतारी वाजवणारा माणूस, प्रशांत रघुनाथ कदम (वंचित बहुजन आघाडी) चिन्ह- प्रेशर कुकर, तुषार विजय मोतलिंग (बहुजन मुक्ति पार्टी) चिन्ह-खाट, सयाजी गणपत वाघमारे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी) चिन्ह-शिट्टी, डॉ. अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले (अपक्ष) चिन्ह-कपाट, सुरेशराव दिनकर कोरडे (अपक्ष) चिन्ह-ऑटो रिक्षा, संजय कोंडीबा गाडे (अपक्ष) चिन्ह-तुतारी, निवृत्ती केरु शिंदे (अपक्ष) चिन्ह-चालण्याची काठी, प्रतिभा शेलार (अपक्ष) चिन्ह-गॅस सिलिंडर, सदाशिव साहेबराव बागल (अपक्ष) चिन्ह-दूरदर्शन, मारुती धोंडीराम जानकर (अपक्ष) चिन्ह-हिरा, विश्वजीत पाटील-उंडाळकर (अपक्ष) चिन्ह-बॅट, सचिन सुभाष महाजन (अपक्ष) चिन्ह-फुगा, सीमा सुनिल पोतदार (अपक्ष) चिन्ह-बॅटरी टॉर्च.

नोटा पर्यायासाठी दुसरी ईव्हीएम मशीन

दरम्यान, एका ईव्हीएम मशीनवर 15 उमेदवार व एक नोटा असे 16 नावांची मर्यादा असल्याने फक्त नोटा या पर्यायासाठी दुसरी ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर दोन ईव्हीएम मशीन लागणार आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाने मायक्रो प्लॅन करुन चोख तयारी केली असून ७ मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणा सज्ज असेल असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले.

कोणी घेतली माघार ?

शनिवारी विठ्ठल सखाराम कदम (अपक्ष) यांनी अर्ज माघार घेतला होता. तर सोमवारी दादासाहेब वसंतराव ओव्हाळ (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)), दिलीप हरिभाऊ बर्गे (भारतीय जवान किसान पार्टी), सागर शरद भिसे (अपक्ष) आणि चंद्रकांत जानू कांबळे (अपक्ष) या चार जणांनी उमेदवारी अर्ज माघार घेतले.

Web Title: So many candidates in the fray for satara lok sabha five people withdrew nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2024 | 09:56 AM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • Shashikant Shinde

संबंधित बातम्या

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
1

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा
2

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर
3

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली
4

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.