Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिल, ‘गोकुळ’विरोधातील १८ दिवसांचे आंदोलन स्थगित; ‘या’ तारखेपर्यंत खात्यात पैसे जमा होणार

सोलापूरमधील धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी सुरू असलेले १८ दिवसांचे शेतकरी आंदोलन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मध्यस्थीनंतर १६ जूनपर्यंत २८०० रुपये प्रति टन जमा करण्याच्या आश्वासनावर स्थगित झाले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 11, 2026 | 09:23 PM
सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिल, 'गोकुळ'विरोधातील १८ दिवसांचे आंदोलन स्थगित

सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिल, 'गोकुळ'विरोधातील १८ दिवसांचे आंदोलन स्थगित

Follow Us
Follow Us:

 

  • सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिल
  • ‘गोकुळ’विरोधातील १८ दिवसांचे आंदोलन स्थगित
  • ‘या’ तारखेपर्यंत खात्यात पैसे जमा होणार
सोलापूर, शहर प्रतिनिधी: धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याकडून थकीत ऊस बिलाची रक्कम मिळावी, या प्रमुख मागणीसाठी गेल्या १८ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पूनम गेट येथे सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर गुरुवारी (दि. ११ जून) तात्पुरते स्थगित करण्यात आले. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मध्यस्थीनंतर येत्या १६ जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रति टन २,८०० रुपये दराने थकीत ऊस बिल जमा केले जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.

‘गोकुळ थकीत ऊस बिल शेतकरी संघर्ष समिती’च्या वतीने सुरू असलेल्या या आंदोलनाने मागील काही दिवसांत तीव्र स्वरूप धारण केले होते. ४ जून रोजी शेकडो शेतकऱ्यांनी सोलापूर येथील साखर आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न आंदोलन केले होते. त्यानंतर १० जून रोजी कंबर तलाव येथे दीड ते दोन हजार शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

आंदोलनाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी तसेच दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या उपस्थितीत शेतकरी संघर्ष समितीच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीस अरविंद घोडके, अमोल पाटील, बसवराज नरे, बाळासाहेब मोरे, नेताजी खंडागळे यांच्यासह अनेक शेतकरी नेते उपस्थित होते.

Solapur News: मनपा क्षयरोग विभागात खळबळ! डॉ. हराळकर यांच्यावर कारवाईची मागणी; कर्मचारी संघटनांचा कामबंदचा इशारा

बैठकीत १६ जूनपर्यंत थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडण्यात आली. लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून संघर्ष समितीने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दिलेल्या मुदतीत पैसे जमा न झाल्यास १७ जून रोजी दुपारपासून पूनम गेट येथे अधिक तीव्र स्वरूपाचे ठिय्या आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे. आंदोलन स्थगित करताना आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार यांच्या हस्ते आंदोलक शेतकऱ्यांना ऊसाचा रस देण्यात आला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शंभर टक्के प्रयत्न

शेतकऱ्यांच्या ऊस बिलाच्या आंदोलनाकडे माझे पहिल्या दिवसापासून लक्ष होते. मात्र, ठोस तोडगा निघत नसल्याने मी आंदोलनस्थळी आलो नव्हतो. प्रशासन आणि संबंधित यंत्रणांशी सातत्याने चर्चा करून शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी माझे शंभर टक्के प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांसोबत कायम उभा असून पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही. -आमदार सचिन कल्याणशेट्टी 

सोलापूर महापालिकेच्या डिजिटल क्रांतीला वेग, आयटी तज्ज्ञांशी विनामूल्य करार, तब्बल 6 कोटींची बचत

Web Title: Solapur gokul sugar factory farmers protest called off after mla sachin kalyanshetti mediates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 09:23 PM

Topics:  

  • Protest
  • Solapur
  • Solapur News

संबंधित बातम्या

‘जातो माघारी पंढरीनाथा’ म्हणत वारकऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू; आषाढीनंतर पंढरीतून भक्तांची एक्झिट; रेल्वे, बसस्थानकावर गर्दी
1

‘जातो माघारी पंढरीनाथा’ म्हणत वारकऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू; आषाढीनंतर पंढरीतून भक्तांची एक्झिट; रेल्वे, बसस्थानकावर गर्दी

E20 Janta Party: मुद्दा पेटणार? CJP नंतर आता E20 जनता पार्टीची एन्ट्री! 100% शुद्ध पेट्रोलची सोशल मीडियावर मोठी मागणी
2

E20 Janta Party: मुद्दा पेटणार? CJP नंतर आता E20 जनता पार्टीची एन्ट्री! 100% शुद्ध पेट्रोलची सोशल मीडियावर मोठी मागणी

Sindh News: पाकिस्तानचे तुकडे तुकडे! सिंधच्या MQM-P कडून स्वतंत्र प्रांताची जोरदार मागणी; कराची-हैदराबादमध्ये जोरदार प्रोटेस्ट
3

Sindh News: पाकिस्तानचे तुकडे तुकडे! सिंधच्या MQM-P कडून स्वतंत्र प्रांताची जोरदार मागणी; कराची-हैदराबादमध्ये जोरदार प्रोटेस्ट

Health Workers Protest: आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘अन्नत्याग’! वसई-विरार महापालिकेच्या 500 कर्मचाऱ्यांचा वेतन हक्कासाठी लढा
4

Health Workers Protest: आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘अन्नत्याग’! वसई-विरार महापालिकेच्या 500 कर्मचाऱ्यांचा वेतन हक्कासाठी लढा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.