Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नालेकामात हलगर्जीपणा भोवला, झोन अधिकारी निलंबित; महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची कडक भूमिका

मान्सूनपूर्व नाले कामांमध्ये दिरंगाई आणि आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी विभागीय कार्यालय क्र.५ चे सहायक अभियंता तथा विभागीय अधिकारी किशोर बाबुराव तळीखेडे यांना निलंबित करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही कारवाई केली असून याबाबत आदेश काढले आहेत.

  • By विवेक
Updated On: May 29, 2026 | 09:19 PM
Solapur Municipal commissioner Dr. Sachin Ombase suspends zone officer over delay in drainage cleaning,

Solapur Municipal commissioner Dr. Sachin Ombase suspends zone officer over delay in drainage cleaning,

Follow Us
Follow Us:

सोलापूर : मान्सूनपूर्व नाले कामांमध्ये दिरंगाई आणि आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी विभागीय कार्यालय क्र.५ चे सहायक अभियंता तथा विभागीय अधिकारी किशोर बाबुराव तळीखेडे यांना निलंबित करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही कारवाई केली असून याबाबत आदेश काढले आहेत.

महापालिकेच्या आदेशानुसार, गतवर्षी पावसाळ्यात शहरातील अनेक भागांत पाणी तुंबणे, नाले बुजणे व पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर यंदाच्या मान्सूनपूर्व उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला होता. त्यासाठी पूर नियंत्रण, पर्जन्यजल व्यवस्थापन आणि नाले सर्वेक्षणाबाबत विभागीय अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, विभागीय कार्यालय क्र.५ अंतर्गत शिवदारे कॉलेज ते द्वारकाधीश मंदिरलगतच्या नाल्याच्या कामाची २६ मे २०२६ रोजी महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे व सदस्यांनी पाहणी केली. यावेळी नव्या नाल्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते तसेच २४ तासांत मार्किंग करून काम सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र ४८ तास उलटल्यानंतरही प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना पाणी तुंबण्याचा त्रास सहन करावा लागू शकतो, असा ठपका ठेवत संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे.

कार्यालयीन शिस्तभंग व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विभागीय कार्यालय क्र.५ चे सहायक अभियंता तथा विभागीय अधिकारी किशोर तळीखेडे यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) १९७९ नियम ३ (१) मधील तरतुदींचा भंग झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, यास ते सर्वस्वी जबाबदार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, प्रस्तावित शिस्तभंगाच्या कारवाईत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ४ (१) (अ) अन्वये त्यांना निलंबनाधीन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दोन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देत कापड विक्रेत्याला साडेतीन लाखाला फसवले

या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडून कार्यालयीन शिस्तभंग झाल्याचे नमूद करत महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार २८ मे २०२६ रोजी कार्यालयीन वेळेनंतर किशोर तळीखेडे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय सोलापूर राहणार असून आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच या कालावधीत कोणतीही खाजगी नोकरी, व्यवसाय किंवा व्यापार करता येणार नसल्याचे महापालिका आयुक्तांच्या आदेशात स्पष्ट केले आहे.

राज्यात ‘मुंढे’ ब्रँड धडाका, सोलापुरात मात्र शांतता! आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपुरात भेसळखोरांना अभय; एफडीए अधिकारी रजेवर

Web Title: Solapur municipal commissioner dr sachin ombase suspends zone officer over delay in drainage cleaning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 09:19 PM

Topics:  

  • Solapur
  • Solapur Municipal Corporation
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur Crime: पतीच्या छळाला कंटाळली; 10 महिन्यांच्या मुलीची हत्या करून आई थेट मृतदेह खांद्यावर घेऊन पोलीस ठाण्यात
1

Solapur Crime: पतीच्या छळाला कंटाळली; 10 महिन्यांच्या मुलीची हत्या करून आई थेट मृतदेह खांद्यावर घेऊन पोलीस ठाण्यात

दिल्ली लाठीचार्जचे महाराष्ट्रात पडसाद; माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संतप्त एल्गार
2

दिल्ली लाठीचार्जचे महाराष्ट्रात पडसाद; माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संतप्त एल्गार

‘माऊली’च्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत
3

‘माऊली’च्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

चार महिन्यांनंतर परिवहन समितीला मुहूर्त; २० जुलैला १२ सदस्यांची घोषणा, भाजपचे १०, एमआयएम व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा
4

चार महिन्यांनंतर परिवहन समितीला मुहूर्त; २० जुलैला १२ सदस्यांची घोषणा, भाजपचे १०, एमआयएम व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.