Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूर महापालिकेत नालेसफाई घोटाळ्यावरून रणकंदन! भाजप नगरसेवक अनंत जाधव आक्रमक; नगरअभियंत्यांच्या राजीनाम्याची मागणी

Solapur News: सोलापूर महापालिकेत नालेसफाई घोटाळ्यावरून भाजप नगरसेवक अनंत जाधव आक्रमक! १५ दिवसांची मुदत संपूनही चौकशी रखडल्याने नगरअभियंत्यांच्या राजीनाम्याची मागणी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 05, 2026 | 09:23 PM
सोलापूर महापालिकेत नालेसफाई घोटाळ्यावरून रणकंदन! (Photo Credit- X)

सोलापूर महापालिकेत नालेसफाई घोटाळ्यावरून रणकंदन! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • सोलापूर महापालिकेत नालेसफाई घोटाळ्यावरून रणकंदन!
  • भाजप नगरसेवक अनंत जाधव आक्रमक
  • नगरअभियंत्यांच्या राजीनाम्याची मागणी
सोलापूर: महापालिकेच्या नालेसफाई कामातील कथित घोटाळ्याच्या चौकशीला होत असलेल्या विलंबावर भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चौकशी समितीला दिलेली १५ दिवसांची मुदत संपूनही तपासात ठोस प्रगती झालेली नसल्याचा आरोप करत, दोषींवर कठोर कारवाई झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

मागील सर्वसाधारण सभेत नालेसफाईतील कथित अनियमिततेचे पुरावे सभागृहात सादर करण्यात आल्यानंतर महापौरांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी चौकशी समिती नेमून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र मुदत संपूनही चौकशीची समाधानकारक प्रगती झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण होत असल्याचे जाधव यांनी म्हटले.

नगरअभियंत्यांवरील चौकशीप्रकरणी कोणाचा दबाव आहे का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित नगरअभियंत्यांनी नैतिकतेच्या आधारावर पदापासून दूर राहावे, अशी मागणी केली. “चौकशीत ते निर्दोष ठरल्यास मी जाहीर माफी मागण्यास तयार आहे; मात्र तोपर्यंत नैतिकतेचे पालन व्हावे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, चौकशी समितीच्या अध्यक्षा तथा अतिरिक्त आयुक्त विना पवार यांची भेट घेतल्यानंतर चौकशीसाठी आवश्यक मनुष्यबळ व वेळ अपुरा पडत असल्याची माहिती समोर आल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यामुळे आवश्यक असल्यास मुदतवाढ घेऊन चौकशी पूर्ण करावी; मात्र संपूर्ण प्रक्रिया लेखी स्वरूपात आणि पारदर्शकपणे पार पाडावी, अशी मागणी त्यांनी केली.

Solapur Manpa Scam: निवडणूक खर्चातील फुगवलेल्या बिलांची चौकशी रखडली! कागदपत्रांअभावी सुनावणी तहकूब, उपमहापौरांची कारवाईची मागणी

‘१५ दिवस संपले, चौकशी कुठे?’

महापालिका आयुक्तांनी दिलेली मुदत संपल्यानंतरही चौकशीची नेमकी स्थिती जाहीर करण्यात आलेली नाही. यावरून प्रशासन या प्रकरणात गंभीर नसल्याचे दिसून येत असल्याचा आरोप जाधव यांनी केला. “नगरअभियंत्यांचे इतके वजन आहे का की आयुक्तही हतबल झाले आहेत? काही दबाव असेल तर तो स्पष्ट करावा. चौकशीत किती लाखांचा अपहार झाला, हे नंतर समोर येईल; मात्र अद्याप चौकशीलाच गती मिळालेली नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.

पालकमंत्र्यांशी चर्चेचा दावा

या प्रकरणाची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाही दिल्याचे जाधव यांनी सांगितले. भ्रष्टाचार करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला सरकारचा पाठींबा राहणार नाही, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी व्यक्त केल्याचा दावा त्यांनी केला. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत हा पाठपुरावा सुरूच राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Solapur News : शिवरत्न हटवून ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह’; जिल्हा परिषदेत ठराव मंजूर

Web Title: Solapur municipal corporation nala safai scam anant jadhav press conference marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 09:23 PM

Topics:  

  • Solapur
  • Solapur Municipal Corporation
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे
1

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात पाणी नसल्यामुळे मनसेचे पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 
2

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात पाणी नसल्यामुळे मनसेचे पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन
3

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन

Solapur Navratri 2026: सोलापुरातील रूपा भवानी देवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी
4

Solapur Navratri 2026: सोलापुरातील रूपा भवानी देवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.