Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Manpa Scam: निवडणूक खर्चातील फुगवलेल्या बिलांची चौकशी रखडली! कागदपत्रांअभावी सुनावणी तहकूब, उपमहापौरांची कारवाईची मागणी

सोलापूर महापालिकेत निवडणूक खर्चाच्या फुगवलेल्या बिलांवरून वाद! अधिकाऱ्यांकडे कागदपत्रे नसल्याने सुनावणी तहकूब; उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांची कठोर कारवाईची मागणी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 05, 2026 | 09:03 PM
Solapur Manpa Scam: निवडणूक खर्चातील फुगवलेल्या बिलांची चौकशी रखडली! (Photo Credit- X)

Solapur Manpa Scam: निवडणूक खर्चातील फुगवलेल्या बिलांची चौकशी रखडली! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • निवडणूक खर्चातील फुगवलेल्या बिलांची चौकशी रखडली!
  • कागदपत्रांअभावी सुनावणी तहकूब
  • उपमहापौरांची कारवाईची मागणी
सोलापूर : महापालिका निवडणूक खर्चातील कथित फुगवलेल्या बिलांच्या चौकशीप्रकरणी बुधवारी झालेली सुनावणी संबंधित अधिकाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रे आणि समाधानकारक माहिती नसल्याने तहकूब करण्यात आली. आता तीन ते चार दिवसांत पुन्हा बैठक घेऊन संपूर्ण घटनाक्रम, निविदा प्रक्रिया, अंदाजपत्रके (इस्टिमेट) आणि सर्व संबंधित कागदपत्रांचा आढावा घेतला जाणार असून, चौकशीनंतर दोषी अधिकारी अथवा मक्तेदारावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी केली.

निवडणूक खर्चातील बिले फुगवण्यात आल्याचा आरोप करत उपमहापौरांसह अनेक नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आयुक्तांच्या निर्देशानुसार संबंधित सदस्य व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुनावणी बैठक पार पडली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, मुख्य लेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर, नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. तसेच उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, विधी समिती सभापती सत्यजित वाघमोडे, कामगार व सामाजिक न्याय समिती सभापती श्रद्धा पवार, मंजिरी किल्लेदार, अर्चना वडनाल, कलावती गदगे यांच्यासह संबंधित सदस्य उपस्थित होते.

Solapur News : शिवरत्न हटवून ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह’; जिल्हा परिषदेत ठराव मंजूर

बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांकडून अपेक्षित माहिती आणि कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. उपलब्ध नोंदींमधूनही स्पष्ट व समाधानकारक माहिती न मिळाल्याने सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी तीन ते चार दिवसांत सर्व आवश्यक माहिती संकलित करून सादर करण्याचे आश्वासन दिले आहे.

उपमहापौर देवकर यांनी सांगितले की, निवडणूक खर्चातील काही बिले सुरुवातीपासूनच फुगवलेली होती. समितीच्या हस्तक्षेपानंतर काही बिलांमध्ये कपात करण्यात आली असली, तरी अनेक शंका अद्याप कायम आहेत. त्यामुळे या संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी करून सत्य समोर आणणे आवश्यक आहे.

त्या पुढे म्हणाल्या, सुनावणीवेळी निविदा प्रक्रिया, इस्टिमेट, मंजुरी, खर्चाची कागदपत्रे आणि संपूर्ण घटनाक्रम अपेक्षित होता. मात्र त्याची पूर्तता अधिकाऱ्यांकडून झाली नाही. पुढील बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी संपूर्ण कागदपत्रांसह अभ्यासपूर्ण तयारीने उपस्थित राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करत प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, निवडणूक खर्चातील कथित आर्थिक अनियमिततेच्या या प्रकरणामुळे महापालिकेच्या प्रशासनात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, आगामी बैठकीत नेमके कोणते नवे तपशील समोर येतात आणि प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Solapur : खोदकाममुक्त रस्त्यासाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन; महापौरांचे निर्देश !

Web Title: Solapur municipal corporation election bill scam hearing postponed marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 09:02 PM

Topics:  

  • Solapur
  • Solapur Municipal Corporation
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे
1

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात पाणी नसल्यामुळे मनसेचे पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 
2

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात पाणी नसल्यामुळे मनसेचे पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन
3

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन

Solapur Navratri 2026: सोलापुरातील रूपा भवानी देवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी
4

Solapur Navratri 2026: सोलापुरातील रूपा भवानी देवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.