Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Municipal Corporation : पावसाळ्यापूर्वी सोलापूर मनपा अलर्ट; 74 नाल्यांसह नाला सफाई मोहिमेचा महापौरांनी घेतला आढावा

आगामी पावसाळ्यात शहरात पाणी साचणे आणि पूरसदृश परिस्थिती टाळण्यासाठी सोलापूर महानगरपालिका सज्ज झाली आहे. महापौर विनायक दादा कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहरातील 74 नाल्यांची स्थिती, प्रस्तावित 19 नाला विकास कामे आणि सुरू असलेल्या नाला सफाई मोहिमेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 04, 2026 | 05:38 PM
पावसाळ्यापूर्वी सोलापूर मनपा अलर्ट; 74 नाल्यांसह नाला सफाई मोहिमेचा महापौरांनी घेतला आढावा

पावसाळ्यापूर्वी सोलापूर मनपा अलर्ट; 74 नाल्यांसह नाला सफाई मोहिमेचा महापौरांनी घेतला आढावा

Follow Us
Follow Us:
  • पूरस्थिती टाळण्यासाठी सोलापूर महापालिकेची तयारी
  • 19 नाला विकास कामांवर भर
  • शहरात पाणी साचू नये म्हणून मनपा सज्ज
  • नाले सफाई आणि विकास कामांचा आढावा
सोलापूर : आगामी पावसाळ्यात शहरात पाणी साचणे, पूरसदृश परिस्थिती निर्माण होणे आणि नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी सोलापूर महानगरपालिका सज्ज झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महापौर विनायक दादा कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात शहरातील ७४ नाले, प्रस्तावित १९ नाला विकास कामे आणि सुरू असलेल्या नाला सफाई मोहिमेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, नगरसेविका रोहिणी तडवळकर, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आक्कुलवार, प्रकाश दिवाणजी तसेच विभागीय कार्यालय क्रमांक १ ते ८ चे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी शहरातील सर्व नाल्यांची सद्यस्थिती, त्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता, आवश्यक दुरुस्तीची कामे आणि पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. विशेष म्हणजे शहरातील प्रस्तावित १९ नाला विकास प्रकल्पांच्या प्रगतीची स्वतंत्रपणे समीक्षा करण्यात आली. या प्रकल्पांमुळे भविष्यातील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.विभागीय कार्यालयांकडून सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार शहरातील नाला सफाईचे सुमारे ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. सर्व नाल्यांची सफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले.

मोठी बातमी! विधानपरिषद निवडणुकीआधीच मविआला धक्का, १७ पैकी ५ जागांवर महायुती बिनविरोध

बैठकीत पजवणी मार्केट, मुळेगाव नाका आणि अक्कलकोट रोडवरील मुद्रा सन सिटी परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर विशेष चर्चा झाली. मागील पावसाळ्यात या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे या संवेदनशील भागांतील जलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आवश्यक तांत्रिक सुधारणा आणि समन्वयातून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.

महापौर विनायक दादा कोंड्याल यांनी शहरातील सर्व ७४ नाल्यांची नियमित पाहणी करण्याच्या सूचना देत, ज्या ठिकाणी अडचणी आहेत तेथे तातडीने उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले. “नाला सफाईची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामेही तातडीने पूर्ण केली जातील. पजवणी मार्केट, मुळेगाव नाका आणि मुद्रा सन सिटीसारख्या संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष देण्यात येणार आहे. पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी महानगरपालिका पूर्ण क्षमतेने काम करत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यापूर्वी जलनिस्सारण व्यवस्थेची व्यापक तयारी करून शहराला जलसंकट आणि पाणी तुंबण्याच्या समस्येपासून दिलासा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंची तिरपी चाल, नाट्यमय घडामोडी अन् अभिजीत पवारांची माघार

Web Title: Solapur municipal corporation rain preparedness drain cleaning review mayor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • Rain Update
  • Solapur
  • Solapur Municipal Corporation

संबंधित बातम्या

Solapur Crime: पतीच्या छळाला कंटाळली; 10 महिन्यांच्या मुलीची हत्या करून आई थेट मृतदेह खांद्यावर घेऊन पोलीस ठाण्यात
1

Solapur Crime: पतीच्या छळाला कंटाळली; 10 महिन्यांच्या मुलीची हत्या करून आई थेट मृतदेह खांद्यावर घेऊन पोलीस ठाण्यात

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग! 20 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने
2

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग! 20 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

‘माऊली’च्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत
3

‘माऊली’च्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

चार महिन्यांनंतर परिवहन समितीला मुहूर्त; २० जुलैला १२ सदस्यांची घोषणा, भाजपचे १०, एमआयएम व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा
4

चार महिन्यांनंतर परिवहन समितीला मुहूर्त; २० जुलैला १२ सदस्यांची घोषणा, भाजपचे १०, एमआयएम व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.