Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Municipality: महापालिकेत शिस्तीचा नवा अध्याय! जूनपासून 4300 अधिकारी-कर्मचारी एकाच गणवेशात दिसणार

सोलापूर महानगरपालिकेत जून महिन्यापासून शिस्त आणि एकात्मतेला चालना देण्यासाठी सुमारे 4300 अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एकसमान गणवेश लागू करण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 20, 2026 | 06:45 PM
महापालिकेत शिस्तीचा नवा अध्याय! जूनपासून 4300 अधिकारी-कर्मचारी एकाच गणवेशात दिसणार

महापालिकेत शिस्तीचा नवा अध्याय! जूनपासून 4300 अधिकारी-कर्मचारी एकाच गणवेशात दिसणार

Follow Us
Follow Us:

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेत जून महिन्यापासून शिस्त आणि एकात्मतेचा नवा अध्याय सुरू होणार आहे. महापालिका प्रशासनातील सुमारे ४३०० अधिकारी व कर्मचारी आता एकसमान गणवेशात दिसणार असून, महापौर विनायक कोंड्याल यांनी याबाबत माहिती दिली. याशिवाय, महापालिकेत एकेकाळी वाजणारा सूचना भोंगाही पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये शिस्तबद्धता, ओळख आणि एकोपा निर्माण व्हावा यासाठी गडद गुलाबी (डार्क पिंक) रंगाचा ड्रेस कोड लागू करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या गणवेशाचा खर्च कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात न करता महापालिकेच्या निधीतून केला जाणार आहे. यापूर्वी २०१४ मध्येही ड्रेस कोड लागू करण्यात आला होता.

Weather Report : एकीकडे पावसाची चाहूल, दुसरीकडे उष्णतेचा तडाखा! राज्यात हवामानाचा दुहेरी इशारा!

महापालिकेत कर्मचारी आगमन, जेवणाची सुट्टी आणि कामकाज संपल्याच्या वेळेची सूचना देण्यासाठी पूर्वी भोंगा वाजवला जात होता. आता तो पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने जुन्या पद्धतीला नव्या स्वरूपात पुनर्जीवन मिळणार आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी २५ मे रोजी संबंधित विभागांची बैठक घेण्यात येणार आहे. नालेसफाईनंतर रस्त्याच्या कडेला पडून असलेला गाळ तातडीने हटवण्याच्या सूचनाही देण्यात येणार आहेत. पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासन प्राधान्याने काम करणार असल्याचे महापौर कोंड्याल यांनी स्पष्ट केले.

सोलापूर महानगरपालिका (SMC) ही सोलापूर शहराच्या नागरी प्रशासनाची प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्था आहे. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सेवा, कर वसुली, सार्वजनिक सुविधा, शिक्षण, अग्निशमन सेवा आणि शहरी विकासाची जबाबदारी महापालिकेकडे असते. सोलापूर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील जुन्या महापालिकांपैकी एक मानली जाते. सोलापूर नगरपालिका 1860 मध्ये स्थापन झाली आणि शहराची लोकसंख्या वाढल्यानंतर तिला 1963 मध्ये महानगरपालिकेचा दर्जा देण्यात आला. सध्या महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 178.57 चौ.कि.मी. क्षेत्रफळ असून 12 लाखांहून अधिक लोकसंख्या या प्रशासनाखाली येते.

महापालिकेची प्रमुख कामे

शहर नियोजन आणि पायाभूत सुविधा विकास

रस्ते, गटारे, पथदिवे आणि पाणीपुरवठा व्यवस्था

कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक स्वच्छता

सार्वजनिक आरोग्य सेवा आणि रुग्णालये

मालमत्ता कर व इतर महसूल वसुली

उद्याने, सार्वजनिक शौचालये, बाजारपेठ आणि नागरी सुविधा उपलब्ध करणे

झोपडपट्टी पुनर्वसन आणि सामाजिक कल्याण योजना राबवणे

Sharad Pawar: “मुंबईत रंगला शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर; शरद पवार आणि खासदार नीलेश लंकेंची ‘आपला मावळा’साठी मोठी घोषणा!

Web Title: Solapur municipal corporation uniform dress code from june news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • Solapur
  • Solapur Municipal Corporation

संबंधित बातम्या

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे
1

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात पाणी नसल्यामुळे मनसेचे पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 
2

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात पाणी नसल्यामुळे मनसेचे पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन
3

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन

Solapur Navratri 2026: सोलापुरातील रूपा भवानी देवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी
4

Solapur Navratri 2026: सोलापुरातील रूपा भवानी देवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.