Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: कृषीनंतर पशुसंवर्धन विभागही ‘कमकुवत’; मनुष्यबळ-अधिकार घटल्याने पशुपालक चिंतेत

Solapur News: सोलापूर जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागातील मनुष्यबळ आणि निर्णयाचे अधिकार कमी झाल्याने पशुपालकांमध्ये चिंता आणि नाराजी व्यक्त होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 18, 2026 | 10:40 AM
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Solapur News: सोलापूर : भारत कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जात असताना जिल्हा परिषदांमधील कृषी आणि पशुसंवर्धन विभागाची ताकद सातत्याने कमी होत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. कृषी विभागातील अधिकारी आणि पदसंख्या यापूर्वीच कमी करण्यात आली असून, आता पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारांनाही कात्री लावली जात असल्याने हा विभाग अधिकारी आणि अधिकारांविना ‘खुळखुळा’ झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेतीसोबतच दूध व्यवसाय, शेळी-मेंढीपालन आणि कुक्कुटपालनाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे पशुधनाचे आरोग्य, लसीकरण, रोगप्रतिबंधक उपाययोजना, कृत्रिम रेतन, पशुवैद्यकीय सेवा तसेच विविध योजनांची अंमलबजावणी यासाठी पशुसंवर्धन विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, विभागातील अधिकारी आणि मनुष्यबळ कमी झाल्यास या सेवा पशुपालकांपर्यंत पोहोचण्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

योजनांच्या अंमलबजावणीवरही परिणाम होण्याची शक्यता

ग्रामीण भागातील पशुपालकांना शासनाच्या विविध अनुदान योजना, पशुधन विकास कार्यक्रम, चारा व्यवस्थापन आणि आधुनिक पशुपालन तंत्रज्ञानाची माहिती देण्याचे काम पशुसंवर्धन विभागामार्फत केले जाते. त्यामुळे विभागातील मनुष्यबळ आणि निर्णयाचे अधिकार कमी झाल्यास योजनांच्या अंमलबजावणीची गती मंदावण्याची शक्यता आहे.

विशेषतः दुर्गम आणि ग्रामीण भागातील पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवा मिळण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. पशुधनाच्या आजारांचे वेळीच निदान आणि उपचार न झाल्यास पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

Nashik Potholes: नाशिकमध्ये ठाकरे गटाचा एल्गार! ‘मनपावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; संजय राऊतांचा प्रशासनावर हल्लाबोल

‘विभाग ठेवायचा तरी कशासाठी?’

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडे पुरेसे अधिकारी नसतील आणि निर्णय घेण्याचे अधिकारही मर्यादित केले जात असतील, तर असा विभाग ठेवायचा तरी कशासाठी?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ग्रामीण भागातील पशुपालकांना तातडीने सेवा मिळण्यासाठी स्थानिक पातळीवर सक्षम यंत्रणा आवश्यक आहे. मात्र, अधिकारांचे केंद्रीकरण झाल्यास जिल्हा परिषद विभागांची भूमिका केवळ कागदोपत्री राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एकीकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे कृषी आणि पशुसंवर्धन विभागातील मनुष्यबळ तसेच अधिकार कमी होत असल्याने विसंगती निर्माण होत असल्याची नाराजी आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ असलेल्या या दोन्ही विभागांना अधिक सक्षम करण्याची मागणी होत आहे.

पशुसंवर्धन अधिकारीही ‘गायब’?

दरम्यान, जिल्हा परिषदेत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सातत्याने गैरहजर राहत असल्याचीही नागरिकांमध्ये चर्चा आहे. दोन विभागांचा भार त्यांच्याकडे असला तरी नागरिकांशी थेट संबंधित जिल्हा परिषद कार्यालयात ते पूर्णवेळ उपस्थित राहत नसल्याची चर्चा कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्ये सुरू आहे.

त्यामुळे ‘पशुसंवर्धन अधिकारीही गायब’ अशी चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात रंगली आहे. अधिकारी आणि अधिकारांची कमतरता अशा दोन्ही समस्यांमुळे पशुसंवर्धन विभागाची कार्यक्षमता प्रभावित होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Ratnagiri Accident: दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, मागून कारही आदळली; रत्नागिरी-पावस मार्गावर विचित्र अपघात, २२ प्रवासी जखमी

Web Title: Solapur news animal husbandry department staff powers reduced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • Solapur
  • Solapur Zilla Parishad

संबंधित बातम्या

Solapur News: भीमा कोरडी; वाळूचोरांचा डल्ला! रात्री अवैध वाळू उपसा-वाहतूक; महसूल, पोलिस यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्न
1

Solapur News: भीमा कोरडी; वाळूचोरांचा डल्ला! रात्री अवैध वाळू उपसा-वाहतूक; महसूल, पोलिस यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्न

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
2

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.