Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: घरकुलांना मुहूर्त कधी? पहिला हप्ता मिळूनही १५ महिन्यांपासून बांधकामे रखडली

Solapur News: सोलापूरमध्ये घरकुलाचा पहिला १५ हजारांचा हप्ता मिळून १५ महिने उलटले, तरी बांधकाम सुरू नाही. १५ ऑगस्टपासून विशेष पंधरवडा; काम न केल्यास अनुदान वसुलीचा इशारा.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 13, 2026 | 03:04 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Solapur News:  ग्रामीण घरकुल योजनेंतर्गत पहिला हप्ता म्हणून १५ हजार रुपयांचे अनुदान खात्यावर जमा होऊन १५ महिन्यांहून अधिक कालावधी उलटला, तरीही अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाच्या बांधकामाला सुरुवात केलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांकडून तातडीने बांधकाम सुरू करून घेण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून १५ ते ३१ ऑगस्टदरम्यान विशेष पंधरवडा राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेदरम्यान ग्रामपंचायत स्तरावर लाभार्थ्यांच्या विशेष बैठका घेण्यात येणार आहेत. पहिला हप्ता खात्यावर जमा होऊन १५ महिन्यांहून अधिक काळ झाला असल्याची माहिती देत पुढील आठ दिवसांत घरकुलाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याच्या सूचना लाभार्थ्यांना दिल्या जाणार आहेत.

पुढील हप्ते आणि रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन

लाभार्थ्यांना घरकुलासाठी मिळणाऱ्या विविध हप्त्यांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच व्हीबी-जी राम जी अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधींबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.

बैठकीनंतर लाभार्थ्यांच्या दोन स्वतंत्र याद्या तयार केल्या जाणार आहेत. आठ दिवसांत बांधकाम सुरू करण्यास तयार असलेले लाभार्थी आणि वारंवार सूचना देऊनही बांधकाम सुरू करण्यास इच्छुक नसलेले लाभार्थी, अशा दोन याद्या पंचायत समिती आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे सादर कराव्या लागणार आहेत.

दिवाळीपूर्वी घरकुले पूर्ण करण्याचे लक्ष्य

विशेष पंधरवड्यात सुरू होणारी घरकुले दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी तालुकास्तरावरील खातेप्रमुख, विस्तार अधिकारी आणि शाखा अभियंता यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रत्येक घरकुलाच्या कामाचे टप्पानिहाय नियोजन करून मायक्रो-प्लॅनिंग करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

घराचे स्वप्न पूर्ण होणार! ‘या’ तारखेला तब्बल ११,१२० घरांसाठी जाहिरात; म्हाडा लॉटरीप्रमाणे निवड

गटविकास अधिकाऱ्यांवर जबाबदारी

विशेष पंधरवडा प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष देऊन कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिले आहेत.

बांधकाम सुरू न केल्यास अनुदान वसुलीचा इशारा

पहिला हप्ता मिळूनही बांधकाम सुरू करण्यास इच्छुक नसलेल्या लाभार्थ्यांना प्रशासनाकडून अंतिम सूचना देण्यात येणार आहेत. वारंवार सूचना देऊनही बांधकाम सुरू न केल्यास घरकुलाची मंजुरी रद्द करण्यासह आतापर्यंत दिलेले शासकीय अनुदान वसूल केले जाऊ शकते, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी मिळालेल्या निधीचा योग्य वापर करून घरकुलाचे बांधकाम तातडीने सुरू करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Gharkul Scheme : राज्यात ३४ लाख कुटुंबांनाकडे पक्की घरे नाहीत; १३ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बेघर कुटुंबे

स्वातंत्र्यदिनी सामूहिक भूमिपूजन

१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बांधकामास तयार असलेल्या लाभार्थ्यांच्या घरकुलांचे गावपातळीवर सामूहिक भूमिपूजन करण्यात येणार आहे. यासाठी सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येणार आहे.

विशेष पंधरवडा : १५ ते ३१ ऑगस्ट
पहिला हप्ता : १५ हजार रुपये
बांधकाम सुरू करण्यासाठी मुदत : ८ दिवस
लक्ष्य : दिवाळीपूर्वी घरकुले पूर्ण करणे

Web Title: Solapur news rs 15000 gharkul installment construction not started 8 days deadline

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Gharkul Yojana
  • Solapur
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News: तेलंगणाहून नाणीजधामकडे निघाली ‘वसुधरा दिंडी’; सोलापुरात भाविकांचे भव्य स्वागत!
1

Solapur News: तेलंगणाहून नाणीजधामकडे निघाली ‘वसुधरा दिंडी’; सोलापुरात भाविकांचे भव्य स्वागत!

Solapur News: भीमा कोरडी; वाळूचोरांचा डल्ला! रात्री अवैध वाळू उपसा-वाहतूक; महसूल, पोलिस यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्न
2

Solapur News: भीमा कोरडी; वाळूचोरांचा डल्ला! रात्री अवैध वाळू उपसा-वाहतूक; महसूल, पोलिस यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्न

Solapur News :सोलापुरात मोठा उद्योग आणणार; तरुणांचे स्थलांतर थांबविण्याचे उदय सामंत यांचे आश्वासन
3

Solapur News :सोलापुरात मोठा उद्योग आणणार; तरुणांचे स्थलांतर थांबविण्याचे उदय सामंत यांचे आश्वासन

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर
4

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.