Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News : देवळालीला वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा; घरांवरील पत्रे उडाले, पिकांचेही मोठे नुकसान

करमाळा तालुक्यातील देवळाली येथे सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक घरांवरील पत्रे उडून गेली असून काही नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. वादळाचा फटका शेती पिके आणि फळबागांनाही बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 07, 2026 | 09:02 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

करमाळा प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील देवळाली येथे सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः थैमान घातले. या नैसर्गिक आपत्तीत गावातील अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शेती पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन वेगाने वारे वाहू लागले. या वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, येथील रोहिदास वाघ यांच्या घरावरील पत्रे हवेत उडून लांब फेकले गेले. या दुर्घटनेत घरातील लक्ष्मी रोहिदास वाघ आणि अनुष्का वाघ या दोघींना किरकोळ दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Buldhana News : पर्यावरण दिनीच वृक्षतोड; खामगाव नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, पर्यावरणप्रेमींचा आंदोलनाचा इशारा

केवळ वाघ कुटुंबच नव्हे, तर गावातील संजय दामोदरे, दादा गाडे आणि प्रकाश दामोदरे,कल्याण अनंतराव कानगुडे यांच्या घरांवरील पत्रे देखील वाऱ्याने उडून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घरातील संसार उघड्यावर पडल्याने या कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे. गावातील बस स्टँड परिसरातही वादळाचा प्रभाव दिसून आला असून, तेथील झाडांच्या मोठ्या फांद्या तुटून पडल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कल्याण कानगुडे यांच्या घरावरील पत्रे तर शंभर फूट दूर उडून गेल्याने त्यांचे फार मोठे नुकसान झाले असून रात्रभर पावसात दुसरीकडे त्यांना काढावी लागली.

पिकांचे अतोनात नुकसान; शासकीय मदतीची मागणी

या वादळी वाऱ्याचा मोठा फटका परिसरातील शेतीलाही बसला आहे. काढणीला आलेली पिके जमिनीदोस्त झाली असून फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आधीच संकटात असलेला बळीराजा पूर्णपणे हतबल झाला आहे.

RPI Mahabaleshwar Protest: रिपाईच्या ‘नमस्कार’ आंदोलनाचा महाबळेश्वर नगरपालिकेला दणका! ३ तास टोलनाका बंद, लाखोंचा बसला फटका

वादळामुळे झालेल्या या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत आणि पीडित कुटुंबांना तसेच बाधित शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्यावी, अशी आग्रही मागणी देवळालीतील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Web Title: Solapur news deolali hit hard by strong gusty winds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 08:58 PM

Topics:  

  • Solapur News

संबंधित बातम्या

वाखरीत भक्तीचा महासागर, माऊलींच्या गोल रिंगणात लाखो वारकरी तल्लीन; ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर
1

वाखरीत भक्तीचा महासागर, माऊलींच्या गोल रिंगणात लाखो वारकरी तल्लीन; ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर

जंतरमंतर प्रकरणी टेंभुर्णीत भव्य निषेध मोर्चा; वंचित बहुजन आघाडी व वडार परिवर्तन सेनेची केंद्र सरकारवर टीका
2

जंतरमंतर प्रकरणी टेंभुर्णीत भव्य निषेध मोर्चा; वंचित बहुजन आघाडी व वडार परिवर्तन सेनेची केंद्र सरकारवर टीका

दिल्ली लाठीचार्जचे महाराष्ट्रात पडसाद; माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संतप्त एल्गार
3

दिल्ली लाठीचार्जचे महाराष्ट्रात पडसाद; माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संतप्त एल्गार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.