Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जंतरमंतर प्रकरणी टेंभुर्णीत भव्य निषेध मोर्चा; वंचित बहुजन आघाडी व वडार परिवर्तन सेनेची केंद्र सरकारवर टीका

जंतरमंतर येथील विद्यार्थी आंदोलनावरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ टेंभुर्णीत वंचित बहुजन आघाडी, वडार परिवर्तन सेना आणि विविध सामाजिक संघटनांनी भव्य मोर्चा काढला. आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Jul 23, 2026 | 10:02 PM
जंतरमंतर प्रकरणी टेंभुर्णीत भव्य निषेध मोर्चा; वंचित बहुजन आघाडी व वडार परिवर्तन सेनेची केंद्र सरकारवर टीका

जंतरमंतर प्रकरणी टेंभुर्णीत भव्य निषेध मोर्चा; वंचित बहुजन आघाडी व वडार परिवर्तन सेनेची केंद्र सरकारवर टीका

Follow Us
Follow Us:

टेंभुर्णी | प्रतिनिधी : दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थी व आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. २३) टेंभुर्णी येथे विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, व्यापारी, वकील, डॉक्टर आणि शेकडो युवकांच्या सहभागाने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत शहरात आंदोलन करण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता व्यापाऱ्यांनी बंदला शंभर टक्के प्रतिसाद देत टेंभुर्णी शहर कडकडीत बंद ठेवले.

मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

Wardha : भरपावसात गांधीगिरी ! पेपरफुटीवर काँग्रेसची आक्रमक भूमिका…

यावेळी वडार परिवर्तन सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार धोत्रे यांनी विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर झालेला कथित लाठीहल्ला हा लोकशाहीची गळचेपी करणारा प्रकार असल्याचा आरोप केला. केंद्र सरकार विद्यार्थ्यांवर अन्याय करत असून अशा प्रवृत्तीचा देशभर निषेध व्हावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच आंदोलनकर्त्यांवरील कारवाईची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

कुर्डूवाडी चौक येथे आयोजित सभेनंतर मंडल अधिकारी शेळवणे यांना निवेदन देण्यात आले. दिल्लीतील आंदोलनकर्त्यांवरील कथित लाठीहल्ल्याचा निषेध नोंदवून भविष्यातही लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Satara Protest: भर पावसात विद्यार्थ्यांचा एल्गार! ‘नीट’ पेपरफुटीविरोधात मोर्चा; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील चांदजकर, प्रमोद कुटे, बाळासाहेब पाटील, मधुकर देशमुख, सचिन जगताप, महेंद्र सोनवणे, डॉ. राहुल पाटील, विशाल नवगिरे, औदुंबर (भाऊ) देशमुख, ॲड. तुकाराम राऊत, डॉ. ज्योती अनंत कवळस, महेंद्र वाक्षे, क्रांती लोंढे, सुनील ओव्हाळ, वैभव कुटे, डॉ. पांडुरंग गायकवाड, भीमराव बंडगर, सुरेश लोंढे, गोविंद भाऊ पवार, नारायण गायकवाड, हरीभाऊ माने, बाबा चंदनकर, संतोष खैरमोडे, प्रशांत सोनवणे, गणेश केचे, सुनील ओहोळ, विकास बंदपट्टे, सुनील पवार, दादा पवार, समाधान पवार, रमेश पवार, अक्षय काळे, सचिन पवार, महादेव धोत्रे, महेश पवार, राहुल धोत्रे, सुरज धोत्रे, समाधान जाधव, राहुल कांबळे, सागर पवार यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, वडार परिवर्तन सेना, व्यापारी, वकील, डॉक्टर, विद्यार्थी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते महावीर वजाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजकुमार धोत्रे यांनी मानले.

Web Title: Tembhurni protest march jantar mantar vanchit bahujan aghadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 10:02 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Solapur
  • Solapur News
  • Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल
1

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल

Solapur News : बार्शीत रंगणार युवा महोत्सवाचा जल्लोष; ९ रंगमंचांवर ३९ कलांचा अविष्कार!
2

Solapur News : बार्शीत रंगणार युवा महोत्सवाचा जल्लोष; ९ रंगमंचांवर ३९ कलांचा अविष्कार!

Solapur News: ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा अनोखा एल्गार; झाडावर चढून अर्धनग्न आंदोलन, अडीच कोटींची थकबाकी
3

Solapur News: ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा अनोखा एल्गार; झाडावर चढून अर्धनग्न आंदोलन, अडीच कोटींची थकबाकी

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
4

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.