Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News : कोणी पाणी देतं का पाणी ; 872 कोटी रुपये खर्च करुनही नागरिकांची पाण्यासाठी वणवण

ऐन उन्हाळ्यात नागरिकांचा पाणी प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे. त्यामुळे एकेक घोटाच्या पाण्यासाठी सोलापूरकरांना वणवण करावी लागत असल्याचं समोर आलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 19, 2026 | 07:08 PM
Solapur News : कोणी पाणी देतं का पाणी ; 872 कोटी रुपये खर्च करुनही नागरिकांची पाण्यासाठी वणवण
Follow Us
Follow Us:
  • 872 कोटी रुपये खर्च करुनही नागरिकांचा पाणीप्रश्न मात्र कायम
  • उजनी धरण ते सोलापूर अशी 175 एमएलडी क्षमतेची जलवाहिनी पूर्ण पण…
सोलापूर : ऐन उन्हाळ्यात नागरिकांचा पाणी प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे. त्यामुळे एकेक घोटाच्या पाण्यासाठी सोलापूरकरांना वणवण करावी लागत असल्याचं समोर आलं आहे. शहराच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या कोट्यवधींच्या जलयोजनेला प्रशासकीय दिरंगाईचा ग्रहण लागल्याचे चित्र आहे. तब्बल 872 कोटी रुपये खर्च करुन देखील पदरी निराशा पडलेली आहे. उजनी धरण ते सोलापूर अशी 175 एमएलडी क्षमतेची जलवाहिनी पूर्ण झाली असली, तरी पाकणी येथील जलशुद्धीकरण प्रकल्प रखडल्याने नागरिकांना त्याचा अपेक्षित लाभ मिळालेला नाही.

स्मार्ट सिटी कंपनी, राज्य शासन आणि महापालिकेच्या संयुक्त उपक्रमातून उभारण्यात आलेली ही जलवाहिनी तांत्रिकदृष्ट्या तयार असतानाही, सुमारे 60 कोटी रुपये खर्चाच्या जलशुद्धीकरण केंद्राचे कामच सुरू न झाल्याने संपूर्ण प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहे.

Solapur News : करवाढीशिवाय १४०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता; सभागृहात एकमत, शासनाकडे प्रस्ताव होणार दाखल

जागेअभावी प्रकल्प ठप्प
पाकणी येथे प्रस्तावित जलशुद्धीकरण केंद्रासाठी आवश्यक जागा अद्याप वन विभागाकडून हस्तांतरित झालेली नाही. विशेष म्हणजे, जागेचा ताबा मिळण्यापूर्वीच टेंडर प्रक्रिया राबवण्यात आल्याने आता प्रशासकीय अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी, प्रकल्प कागदोपत्रीच अडकून पडला आहे.

क्षमता आहे,  पण उपयोग नाही

सध्या महापालिकेकडे उजनी धरणातून पाणी उचलण्याची एकूण 255 एमएलडी (80 + 175) क्षमता उपलब्ध आहे. मात्र, जलशुद्धीकरण केंद्राच्या अभावामुळे अतिरिक्त पाणी प्रक्रिया करून शहरात पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे नव्याने उभारलेल्या जलवाहिनीचा उपयोग मर्यादित राहिला आहे.

शहरात पाणीटंचाई तीव्र

दरम्यान, शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अनेक भागांत तीन ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा होत असून, नागरिकांना पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. वाढत्या उन्हाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नागरिकांचा संताप; तातडीने निर्णयाची मागणी

कोट्यवधी खर्च करूनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत पाकणी येथील जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण होत नाही, तोपर्यंत नव्या जलवाहिनीचा पूर्ण क्षमतेने वापर होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच प्रशासनाने वन विभागाकडील जागेचा प्रश्न तातडीने सोडवून प्रकल्प मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी आता नागरिकांतून पुढे येत आहे.

Solapur Crime: करमाळ्यात धक्कादायक प्रकार! दारूच्या त्रासाला कंटाळून बहिणीनेच भावाचा गळा आवळून खून

Web Title: Solapur news despite spending rs 872 crore in solapur citizens are still struggling for water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Solapur News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.