Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने भव्य मिरवणूक; आंबेडकरांच्या जीवनावरील प्रसंगांच्या देखाव्यांनी वेधले लक्ष

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या समारोपाच्या निमित्ताने रविवारी सोलापुरात विविध मंडळांनी लक्षवेधी मिरवणुका काढल्या. डिजेला काही अंशी दुर्लक्ष करत अनेक मंडळानी पारंपरिक देखावे सादर केले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 19, 2026 | 06:40 PM
Solapur News : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने भव्य मिरवणूक; आंबेडकरांच्या जीवनावरील प्रसंगांच्या देखाव्यांनी वेधले लक्ष
Follow Us
Follow Us:
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने भव्य मिरवणूक;
  • आंबेडकरांच्या जीवनावरील प्रसंगांच्या देखाव्यांनी वेधले लक्ष
सोलापूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या समारोपाच्या निमित्ताने रविवार दि. 19 एप्रिल रोजी सोलापुरात विविध मंडळांनी लक्षवेधी मिरवणुका काढल्या. डिजेला काही अंशी दुर्लक्ष करत अनेक मंडळानी पारंपरिक देखावे सादरीकरणावर भर दिला.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील विविध प्रसंग तसेच सचित्र देखाव्यांनी सोलापूरकरांचे लक्ष वेधले. प्रबुद्ध भारत ग्रुपच्यावतीने महाड चवदार तळ्याचे पाणी हा देखावा सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेत होता. रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणूकीचा जल्लोष सुरू होता. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि विधानसभेचे उपसभापती अण्णासाहेब बनसोडे यांनी तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोलापुरातील विविध मंडळांना भेटी देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात सहभाग नोंदवला.

सोलापूर शहरातील 150 हून अधिक मंडळांनी विविध आकर्षक आणि संदेशपूर्ण देखावे सादर केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनातील महत्त्वाचे टप्पे, सामाजिक न्यायासाठी दिलेला लढा, ऐतिहासिक घटना जणू देखाव्यामधून विविध मंडळांनी जिवंत केल्या होत्या.अनेक मंडळांकडून भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसह बौद्ध धम्माचा संदेश ही देण्यात आला. पारंपरिक देखाव्यासोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही पहावयास मिळाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेबांचे जीवन चरित्र स्क्रीनवर दाखविण्यात येत होते. ऐतिहासिक प्रसंग,सामाजिक चळवळीमधील घटना आणि प्रेरणादायी क्षणांचे जिवंत सादरीकरण मिरवणुकांच्या माध्यमातून विविध मंडळांनी सादर केले.

युनिव्हर्सल आंबेडकर संकल्पनेतून जगभरातील बाबासाहेबांचे पुतळे आणि त्यांची माहिती सादर करण्यात आली. महाड चवदार तळे सत्याग्रह ऐतिहासिक लढादेखील प्रभावीपणे उभारण्यात आला होता. याशिवाय राजगृह मधील कौटुंबिक जीवन, 1941 मधील ऐतिहासिक मिरवणुकीचे पुनरुज्जीवन तसेच बाबासाहेबांच्या विचारांचा जागतिक प्रभाव असे विविध पैलू देखाव्यांमधून मांडण्यात आले. सोलापूर शहरातील प्रत्येक चौकात आकर्षक विद्युत रोषणाईसुद्धा करण्यात आली होती. संपूर्ण वातावरण उत्सवमुळे झाले होते. यंदाच्या देखाव्यांतून नव्या पिढीला इतिहासाची आणि सामाजिक परिवर्तनाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रबुद्ध भारत ग्रुपच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळे येथे 1941 मध्ये झालेल्या ऐतिहासिक परिषदेवेळी बाबासाहेबांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली होती. तो देखावा सादर करण्यात आला.

Kolhapur News : प्रशासनाचा हलर्जीपणा,पंचगंगेत पुन्हा सांडपाण्याचा शिरकाव; गावकऱ्यांचा संताप विकोपाला

प्रशिक सामाजिक संस्थेच्यावतीने युनिव्हर्सल आंबेडकर देखावा करण्यात आला होता.यामधून पृथ्वीचा नकाशा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जगभरातील135 पुतळे याची माहिती देण्यात आली. याशिवाय पोस्ट तिकीट, नाणी यावर बाबासाहेबांची प्रतिमा असे देखावेही सादर करण्यात आले. कबीरा सोशल फाउंडेशनच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धीची कल्पकता, युनिव्हर्सल कार्याची माहिती देण्यात आली. बुद्धदर्शन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महाड चवदार तळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कुटुंबीयांचा एकत्रित देखावा सादर करण्यात आला.जी. एम. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने एआयच्या माध्यमातून बाबासाहेब यांचे जीवन चरित्र तसेच बुद्धभूमी प्रतिष्ठानच्यावतीने महाड चवदार तळे सत्याग्रह हा देखावा सादर करण्यात आला.

प्रबुद्ध भारत, जीएम मागासवर्गीय संस्था,भीमशक्ती, प्रबुद्ध ग्रुप, रमापती, महेश नगर सम्राट अशोक मित्र मंडळ, महात्मा फुले तरुण मंडळ, भीमरत्न, बॉबी ग्रुप,कर्मवीर सामाजिक संस्था, भीमयुग, सिद्धार्थ फाउंडेशन, बुद्धराष्ट्र प्रतिष्ठान, भीममुद्रा सामाजिक संस्था, आम्रपाली,छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान, प्रशिक, बुद्धभूमी, बुद्धदर्शन, सम्राट अशोक फाउंडेशन, ग्लोबल फाउंडेशन थोरला मंगळवेढा तालीम, राजगृह संस्था, अमरभीम,भीम टोला, भीमशक्ती, भीम स्वराज्य,प्रबुद्ध प्रतिष्ठान, सिद्धार्थ तालीम,बॉबी मित्रपरिवार, रॉकी मित्र परिवार, भिमसेना,गौतमी तसेच विराट बहुउद्देशीय संस्था आदी मंडळांचा मिरवणुकीमध्ये जल्लोषपूर्ण असा सहभाग होता.

पार्क स्टेडियम जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन मिरवणुकीला प्रारंभ झाला. डफरीन चौक, जुना एम्प्लॉयमेंट, वाडिया हॉस्पिटल, चांदणी चौक, महापौर निवास, स्टेशन चौक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, सुपर मार्केट, मेकॅनिकी चौक, नवी पेठ,दत्त चौक,माणिक चौक,सोन्या मारुती चौक,मधला मारुती,मंगळवार पेठ, चाटी गल्ली, बाळीवेस, तरटी नाका नाका पोलीस चौकी, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे निघालेल्या मिरवणुकांची बुधवार पेठ मिलिंद नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थीविहार प्रेरणाभूमी समोर पंचाची चावडी येथे रात्री सांगता झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे दर्शन मिरवणुकीच्या माध्यमातून देखाव्यांमधून सोलापूरकरांना घडले.सोलापूरसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भीम सैनिक सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने घेणाऱ्या मिरवणुकी पाहण्यासाठी आले होते.

मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा,यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता .मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 3 पोलीस उपायुक्त, 7 सहाय्यक आयुक्त, 24 पोलीस निरीक्षक, 61 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 995 पोलीस अंमलदार आणि 600 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. एसआरएफची एक कंपनीही बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आली होती.

Kolhapur News : ऐन उन्हाळ्याच धरण कोरडं ठाक ; 17 टक्के पाणीसाठ्याने पाणीप्रश्न आणि शेती धोक्यात

 

Web Title: Solapur news grand procession on the occasion of dr babasaheb ambedkar jayanti scenes of incidents from ambedkars life attracted attention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Solapur News

संबंधित बातम्या

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल
1

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी
2

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी
3

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी

C. Vijayakumar: एका दिवसाला लाखोंची कमाई! 176 कोटी पगार घेणारे सी. विजयकुमार कोण आहेत?
4

C. Vijayakumar: एका दिवसाला लाखोंची कमाई! 176 कोटी पगार घेणारे सी. विजयकुमार कोण आहेत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.