Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Metro: पिंपरी-निगडी मेट्रोपासून पाणीप्रश्नापर्यंत…; पिंपरी-चिंचवडच्या १० प्रश्नांवर सरकारकडून आश्वासन

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो प्रकल्प गतीने पूर्ण करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवडचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठीही सरकारने ठोस पावले उचलली आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 21, 2026 | 03:11 PM
Pune Metro:  पिंपरी-निगडी मेट्रोपासून पाणीप्रश्नापर्यंत…; पिंपरी-चिंचवडच्या १०  प्रश्नांवर सरकारकडून आश्वासन
Follow Us
Follow Us:
  • पवना बंदिस्त जलवाहिनी आणि ५२० एमएलडी अतिरिक्त पाण्याचे नियोजन
  • भामा आसखेड प्रकल्पातील ‘ढिसाळ’ ठेकेदार निलंबित
  • पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून जानेवारी २०२७ मध्ये ती प्रवाशांसाठी खुली
 

Bhama Askhed Project:  पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो, पाणीपुरवठा आणि वाहतूक कोंडी यांसारख्या गंभीर प्रश्नांवर राज्य सरकारने विधान परिषदेत महत्त्वाची घोषणा केली आहे. “पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण केले जाईल, तसेच शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी पवना धरणातून ५२० एमएलडी पाणी बंदिस्त जलवाहिनीद्वारे आणण्याचे नियोजन आहे,” अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेच्या अधिवेशनात आमदार उमा खापरे यांनी शहरातील १० महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्षवेधी मांडली होती, त्याला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.

पाणीपुरवठा आणि नदी सुधार प्रकल्पांचा आढावा

आमदार उमा खापरे यांनी शहरातील वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, “शहराची लोकसंख्या ४० लाखांवर पोहोचली असून ७५० एमएलडी पाण्याची गरज आहे, मात्र सध्या केवळ ६२० एमएलडी पाणी मिळत आहे. भामा आसखेड आणि पवना बंदिस्त जलवाहिनीचे प्रकल्प तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे.”

अवकाळी पाऊस अन् गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; आमदार राहुल कुल यांचे प्रशासनाला आदेश

मंत्र्यांनी दिलेली प्रमुख आश्वासने:

मेट्रो प्रकल्प: पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून जानेवारी २०२७ मध्ये ती प्रवाशांसाठी खुली केली जाईल.

पाणीपुरवठा: पवना धरणातून ५२० एमएलडी आणि आंध्रा धरणातून १०० एमएलडी असे एकूण ६२० एमएलडी अतिरिक्त पाणी शहरात आणण्याचे नियोजन आहे. यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.

भामा आसखेड प्रकल्प: या प्रकल्पाचे काम संथगतीने करणाऱ्या ठेकेदाराला निलंबित करण्यात आले असून, आता कामाला गती दिली जाईल.

नदी सुधार: मुळा नदी सुधार योजनेचे ९३ टक्के काम पूर्ण झाले असून, पवना व इंद्रायणी नदी सुधारणेसाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे.

Onion Price : चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा बाजार कोसळला; प्रतिकिलो दर किती?

प्रलंबित प्रश्नांकडे वेधले लक्ष

लक्षवेधी दरम्यान आमदार खापरे यांनी केवळ मेट्रो आणि पाणीच नव्हे, तर शहरातील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न, नवीन न्यायालय इमारत आणि वाढती वाहतूक कोंडी यांकडेही सरकारचे लक्ष वेधले. नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी ‘संयुक्त आराखडा’ तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही सरकारने यावेळी स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवडसाठी मोठी घोषणा; मेट्रो, पाणी आणि ट्रॅफिकवर सरकारचे आश्वासन

पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो, पाणीपुरवठा आणि वाढती वाहतूक कोंडी या गंभीर प्रश्नांवर राज्य सरकारने विधान परिषदेत महत्त्वाची घोषणा केली आहे. उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पिंपरी ते निगडी मेट्रो प्रकल्पाचे काम जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.”

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो प्रकल्प गतीने पूर्ण करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवडचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठीही सरकारने ठोस पावले उचलली आहेत. पवना धरण येथून तब्बल ५२० एमएलडी पाणी बंदिस्त जलवाहिनीद्वारे शहरात आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे भविष्यातील पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधान परिषदेत उमा खापरे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल १० महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्षवेधी सूचना मांडली होती. यामध्ये मेट्रो, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी यांसह नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक मुद्द्यांचा समावेश होता.

 

 

 

Web Title: Solving pimpris water crisis government plans 520 mld water supply via closed pipeline

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • PCMC News
  • Pune Metro
  • Water Issue

संबंधित बातम्या

तासगावच्या पाण्याचा ‘शब्द’ आता कृतीत; 11 महिन्यांत पाणी आणण्याचे महेश शिंदेंचे आश्वासन
1

तासगावच्या पाण्याचा ‘शब्द’ आता कृतीत; 11 महिन्यांत पाणी आणण्याचे महेश शिंदेंचे आश्वासन

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय Hockey ची रणधुमाळी! आंध्र प्रदेश, आसाम अन्…; कोणते संघ जिंकले?
2

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय Hockey ची रणधुमाळी! आंध्र प्रदेश, आसाम अन्…; कोणते संघ जिंकले?

Moshi Garbage Depot Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगाराच्या पत्नीने घेतले टोकाचे पाऊल
3

Moshi Garbage Depot Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगाराच्या पत्नीने घेतले टोकाचे पाऊल

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…
4

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.