Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“चित्रपटांपेक्षा माणसांची ‘होप’ बनण्यातच खरे समाधान”- सोनू सूद; मोहोळ तालुक्यातील मसलेचौधरी गाव दत्तक

चित्रपटांचे यश, पुरस्कार आणि बॉक्स ऑफिसचे आकडे महत्त्वाचे असले तरी एखाद्या सामान्य माणसाची आशा बनण्यात जे समाधान मिळते, ते कोणत्याही यशापेक्षा मोठे असते, अशी भावना अभिनेता व समाजसेवक सोनू सूद यांनी व्यक्त केली.

  • By विवेक
Updated On: May 28, 2026 | 09:20 PM
Sonu Sood adopts Masalechaudhari village in Maharashtra, Sonu Sood adopts village, Sonu Sood, Sonu sood Charity foundation,

Sonu Sood adopts Masalechaudhari village in Maharashtra, Sonu Sood adopts village, Sonu Sood, Sonu sood Charity foundation,

Follow Us
Follow Us:

सोलापूर, शहर प्रतिनिधी: चित्रपटांचे यश, पुरस्कार आणि बॉक्स ऑफिसचे आकडे महत्त्वाचे असले तरी एखाद्या सामान्य माणसाची आशा बनण्यात जे समाधान मिळते, ते कोणत्याही यशापेक्षा मोठे असते, अशी भावना अभिनेता व समाजसेवक सोनू सूद यांनी व्यक्त केली.

सोलापूरातील पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ‘सोनू सूद चॅरिटी फाउंडेशन’, ‘उन्नती’ उपक्रम, सामाजिक कार्य, ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य आणि राजकारणातील प्रवेशाबाबत मनमोकळेपणाने भूमिका मांडली.कोविड काळात मजुरांना घरी पोहोचवण्यापासून सुरू झालेला प्रवास आज शिक्षण, वैद्यकीय मदत, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण विकासापर्यंत पोहोचल्याचे सांगताना सोनू सूद म्हणाले, ही लढाई एकट्याने जिंकता येत नाही. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोकांच्या सहकार्यामुळेच हजारो लोकांपर्यंत मदत पोहोचवणे शक्य झाले.

यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील ‘उन्नती’ प्रकल्पाची माहिती दिली. मोहोळ तालुक्यातील मसलेचौधरी गाव दत्तक घेतल्याचे सांगत, त्या गावात रस्ते, ड्रेनेज, वीज, शौचालये, आरोग्य आणि शिक्षण सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले. ग्रामीण शाळांमधील मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर असल्याचे नमूद करताना ते म्हणाले, अनेक शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसते. अशा छोट्या पण महत्त्वाच्या समस्यांवर काम करण्याची गरज आहे. सोलापूर आणि परिसरातील गरजू शाळांची माहिती दिल्यास मदतीचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही फाउंडेशन कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. एका मुलाला शिक्षण दिल्यास त्याच्या पुढील पिढ्यांचे भविष्य बदलू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आपण सर्वांनी मिळून काम केले, तर पुढील दहा वर्षांत हजारो लोकांचे आयुष्य बदलू शकतो, असा आशावाद व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेस चित्रकार विपुल मिरजकर, रूपल पांडे , मानसी, राहुल बऱ्हाणपूरकर आदी उपस्थित होते.

बस चालक-कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी MSRTC-HNCII पुढे; कर्करोग तपासणी आणि जनजागृती अभियान

सध्या तरी राजकारणात जाण्याचा विचार नाही

राजकारणात प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सोनू सूद यांनी सध्या तरी कोणताही राजकीय विचार नसल्याचे स्पष्ट केले. राज्यसभेसह अनेक मोठ्या ऑफर्स आल्या मात्र सध्या समाजकार्यातून लोकांशी जोडलेले राहणे मला अधिक महत्त्वाचे वाटते, असे ते म्हणाले.सरकारसोबत सामाजिक प्रकल्पांमध्ये सहकार्य करण्यास आपण तयार असल्याचे सांगताना सोनू सूद म्हणाले, सरकारी यंत्रणांसोबत समन्वय साधून अनेक ठिकाणी शाळा आणि सुविधा उभारण्याचे काम केले आहे. सहकार्याने मोठे बदल घडवता येऊ शकतात.

मोकाट कुत्र्यांसाठी शेल्टर होमची गरज

मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी शेल्टर होमची गरज आहे. प्रश्न सोडवण्यासाठी केवळ महापालिका किंवा सरकारवर अवलंबून न राहता नागरिकांनीही सहभाग घेतला पाहिजे,असे त्यांनी नमूद केले.

Buldhana News : गोवंश संरक्षणासाठी सरकारचे कठोर पाऊल! जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; अवैध कत्तलखान्यांवर कारवाईचे निर्देश

Web Title: Sonu sood adopts masalechaudhari village in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 09:20 PM

Topics:  

  • Solapur
  • Solapur News
  • sonu sood

संबंधित बातम्या

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे
1

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात पाणी नसल्यामुळे मनसेचे पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 
2

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात पाणी नसल्यामुळे मनसेचे पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन
3

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन

Solapur Navratri 2026: सोलापुरातील रूपा भवानी देवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी
4

Solapur Navratri 2026: सोलापुरातील रूपा भवानी देवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.