Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भेसळीचे ३७ हजार लिटर दूध नष्ट, १५ लाखांचा दूधसाठा जप्त; जवळ्यातील अजिंक्यराणा अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

सोलापूर जिल्ह्यातील जवळा येथील अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीजवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत 15 लाखांहून अधिक किमतीचे 37 हजार लिटरहून अधिक भेसळयुक्त दूध नष्ट केले. संबंधित आस्थापनाकडे वैध परवानाही नसल्याचे तपासात समोर आले.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jul 12, 2026 | 04:27 PM
भेसळीचे ३७ हजार लिटर दूध नष्ट, १५ लाखांचा दूधसाठा जप्त; जवळ्यातील अजिंक्यराणा अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

भेसळीचे ३७ हजार लिटर दूध नष्ट, १५ लाखांचा दूधसाठा जप्त; जवळ्यातील अजिंक्यराणा अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

Follow Us
Follow Us:

सोलापूर, शहर प्रतिनिधी : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे. सांगोला तालुक्यातील जवळा येथील मे. अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीजवर धाड टाकून तपासणी केली असता भेसळयुक्त दूध आढळून आले. प्रशासनाने यावेळी तब्बल १५ लाख १ हजार २८० रुपये किमतीचे ३७ हजार ५३२ लिटर दूध जागेवरच नष्ट केले. संबंधित आस्थापनाकडे दूध व्यवसायासाठी आवश्यक असलेला वैध परवाना नसल्याचेही कारवाईत आढळून आले. त्यामुळे परवाना प्राप्त होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत.

सोलापूर येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम आणि मंगेश लवटे यांच्या पथकाने बुरुंगेवाडी परिसरातील मे. अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीज येथे अचानक भेट देऊन तपासणी केली.

खामगाव तालुक्यात बोगस बियाण्यांचा फटका! सोयाबीन उगवलेच नाही; दुबार पेरणीने शेतकरी आर्थिक संकटात

तपासणीदरम्यान दुधाच्या गुणवत्तेबाबत संशय आल्याने पथकाने दुधाची प्राथमिक तपासणी केली. स्पॉट टेस्टमध्ये दुधामध्ये पाणी मिसळल्याचे स्पष्ट झाले. तसेच दुधातील एसएनएफ (सॉलिड नॉट फॅट) चे प्रमाण निर्धारित मानकांपेक्षा कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित दूध भेसळयुक्त असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. व्यवसायाच्या नोंदीही आढळल्या नाहीत. कारवाईवेळी संबंधित संस्थेकडे दूध खरेदी-विक्रीची नियमित नोंद उपलब्ध नसल्याचे आढळले. तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील अनुसूची चारमधील नियमांचे पालन केले जात नसल्याचेही निदर्शनास आले.

दूध हा नाशवंत अन्नपदार्थ असल्याने प्रशासनाने दुधाचे चार नमुने ताब्यात घेऊन ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले. त्यानंतर उर्वरित भेसळयुक्त दूधसाठा नियमानुसार नष्ट करण्यात आला.

सोलापूर IT पार्कच्या जागेचा फेरअभ्यास; उद्योजकांच्या मागणीला उदय सामंतांचा सकारात्मक प्रतिसाद

भेसळीविरोधात कारवाई सुरूच राहणार

ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी जिल्ह्यात अशा प्रकारच्या तपासण्या आणि कारवाया सातत्याने सुरू राहतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. दूध व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि सहआयुक्त दि. वा. भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे दूध व्यवसायातील अनियमितता आणि भेसळीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Solapur fda seizes adulterated milk ajinkyarana milk industries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • Food and Drug Administratio
  • Solapur
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

सोलापूर IT पार्कच्या जागेचा फेरअभ्यास; उद्योजकांच्या मागणीला उदय सामंतांचा सकारात्मक प्रतिसाद
1

सोलापूर IT पार्कच्या जागेचा फेरअभ्यास; उद्योजकांच्या मागणीला उदय सामंतांचा सकारात्मक प्रतिसाद

सोलापुरात आढावा बैठकीला अधिकारी उशिरा; उदय सामंतांनी जिल्हाधिकारी, एसपींची केली कानउघाडणी
2

सोलापुरात आढावा बैठकीला अधिकारी उशिरा; उदय सामंतांनी जिल्हाधिकारी, एसपींची केली कानउघाडणी

Solapur Crime: लग्नाला अवघे दोन महिने, पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; गुन्हा दाखल
3

Solapur Crime: लग्नाला अवघे दोन महिने, पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; गुन्हा दाखल

मुंढेंचा दणका ! दूध संकलनात तब्बल 20 लाख लिटरची घट; भेसळीविरोधातील कारवाईचा फटका
4

मुंढेंचा दणका ! दूध संकलनात तब्बल 20 लाख लिटरची घट; भेसळीविरोधातील कारवाईचा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.