Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरंध घाटात ST बस पलटी; १८ प्रवासी जखमी, जखमींना महाडच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल

वरंध घाटातील बेबीचा गोल येथे ब्रेक फेल झाल्याने महाड एसटी बस अपघातग्रस्त झाली, ज्यात १८ प्रवासी जखमी झाले. या अपघातानंतर घाटातील सुरक्षेसाठी कठोर उपाययोजनांची मागणी करण्यात येत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 15, 2025 | 09:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

चंद्रहास नगरकर, महाड: महाड एसटी डेपोच्या रामदास पठार ते महाड या बसला (एमएच 20 बीएल 3822) 15 मार्च 2025 रोजी अपघात झाला. वरंध घाटातील बेबीचा गोल येथे एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटली. या भीषण अपघातात १८ प्रवासी जखमी झाले असून, त्यामध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. सर्व जखमींना तत्काळ महाडच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

‘आता झुकेगा नही साला…’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राणे पिता-पुत्रांवर निशाणा

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी पुढे येत जखमींना बाहेर काढण्यास हातभार लावला. बस अपघाताची माहिती मिळताच महाड पोलिस आणि आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य हाती घेत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे महाड ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलवले. बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले असून, काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे.

अपघाताच्या प्राथमिक तपासानुसार, बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असावा, अशी माहिती बस चालकाने दिली आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या अपघाताची चौकशी सुरू केली असून, तांत्रिक तपासणी अहवालानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. वरंध घाट हा अत्यंत धोकादायक वळणांमुळे प्रसिद्ध आहे. येथे अनेक वेळा अपघात झाले असून, वाहतूक नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. अपघाताची माहिती मिळताच राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महाड ट्रॉमा केअर सेंटरला भेट देऊन जखमी प्रवाशांची विचारपूस केली. त्यांनी डॉक्टरांकडून जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना दिल्या.

बळीराजा सुखावला! कर्जतमध्ये युरिया खताची आवक वाढली

या अपघातामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वरंध घाटातील धोकादायक वळणांवर सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच, सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांची वेळोवेळी तपासणी करूनच प्रवासासाठी पाठवावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

Web Title: St bus overturns at varandha ghat 18 passengers injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2025 | 09:03 PM

Topics:  

  • Accident Case
  • Mahad

संबंधित बातम्या

Raigad News: महाडमध्ये पाणीटंचाईची चाहूल; 20 गावे, 132 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठ्याचा प्रस्ता
1

Raigad News: महाडमध्ये पाणीटंचाईची चाहूल; 20 गावे, 132 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठ्याचा प्रस्ता

Raigad News :  गतिरोधक नसल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ; प्रशासनाच्या हलगर्जिपणावर नागरिक आक्रमक
2

Raigad News : गतिरोधक नसल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ; प्रशासनाच्या हलगर्जिपणावर नागरिक आक्रमक

Raigad News: महाडकरांना दिलासा! वरंधा घाट बंद न करता रुंदीकरणाचे काम सुरूच, प्रशासनाचा मोठा निर्णय
3

Raigad News: महाडकरांना दिलासा! वरंधा घाट बंद न करता रुंदीकरणाचे काम सुरूच, प्रशासनाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.