Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार

अपघातानंतर बसमध्ये एकच आरडाओरडा आणि गोंधळ उडाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावले. ग्रामस्थांनी बसच्या काचा फोडून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 17, 2026 | 10:15 PM
Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात
बेल्हेजवळ एसटी बस खोल खड्यात कोसळली
चालकासह प्रवासी ठार, अनेक जखमी

आळेफाटा: अहिल्यानगर महामार्गावरील बेल्हे जवळ रविवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. भिवंडी डेपोची शेवगाव-कल्याण-भिवंडी मार्गावरील एसटी बस अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन महामार्गालगतच्या खोल खड्यात कोसळली. या भीषण दुर्घटनेत एसटी चालक आणि एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की बस पलटी होऊन तिची चाके वर झाली होती.

ही घटना बेल्हे येथील गुंजाळवाडी फाटा परिसरात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, धावत्या बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट महामार्गाखालील खोल खड्यात जाऊन कोसळली. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी होते.

अपघातानंतर बसमध्ये एकच आरडाओरडा आणि गोंधळ उडाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावले. ग्रामस्थांनी बसच्या काचा फोडून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. स्थानिक नागरिक, पोलिस आणि मदत पथकांनी संयुक्तपणे बचावकार्य राबवले.

Accident: पुण्यात भीषण अपघात! रिक्षा-फॉर्च्यूनरच्या जोरदार धडकेत चालकाचा जागीच मृत्यू

अपघातात बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून चालक केबिनमध्ये अडकला होता. परिस्थिती गंभीर असल्याने घटनास्थळी जेसीबी आणि क्रेन मागवण्यात आली. काही काळ सुरू असलेल्या बचावकार्यानंतर जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. जखमी प्रवाशांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. अपघातग्रस्त एसटी बसचा क्रमांक MH 14 BT 4023 असून ती भिवंडी डेपोची असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Palghar News: 170000000 रुपयांची चांदी घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, पालघरमधील चारोटी उड्डाणपुलावरील घटना

या अपघातात कोंडीभाऊ कारभारी वाकचौरे (वय ७०), कमल कोंडीभाऊ वाकचौरे (वय ६७, दोघे रा. बेल्हे), शंकर शिवाजी शेजाळ (वय ५०), वैशाली शंकर शेजाळ (वय २३, दोघे रा. देवडे, पंढरपूर), मगन सुखदेव पाटोळे (वय ४८), शोभा मगन पाटोळे (वय ३०, दोघे रा. बुलढाणा), शारदा बन्सी मेंगळे (वय ५९, रा. आणे), अश्विनी गणेश बहिरट (वय ४८, रा. आणे), अलका नामदेव गायकवाड (वय ५८, रा. संगमनेर), अरुण शंकर गुंजाळ (वय ५१, रा. बेल्हे), दिपाली बबन डोंगरे (वय ३३, रा. डोंगरवाडी), उल्हास तांबे (वय ७०, रा. ओतूर), यमुना यादव पावसे (वय ६०, रा. हिवरगाव पावसा, संगमनेर), दिव्या संजय पवार (वय २१, रा. मानवडी, सिन्नर), सिद्धेश नितीन काळे (वय १०), आशा नितीन काळे (वय ३५) आणि नितीन सिद्धार्थ काळे (वय ३८, सर्व रा. पाथर्डी) हे जखमी झाले आहेत. दरम्यान, या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: St bus accident on kalyan ahilyanagar highway 2 death news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 10:15 PM

Topics:  

  • Accident Case
  • Accident Death
  • Ahilyanagar
  • crime news

संबंधित बातम्या

मावळ तालुक्यात खळबळ; झोपेत असलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला
1

मावळ तालुक्यात खळबळ; झोपेत असलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला

दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
2

दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

सुरतमधून लव्ह जिहादचे नवे प्रकरण उघड, रहिम नाही रोहन बनून महिला वकिलाला जाळ्यात ओढले, शारीरिक शोषणाचा आरोप
3

सुरतमधून लव्ह जिहादचे नवे प्रकरण उघड, रहिम नाही रोहन बनून महिला वकिलाला जाळ्यात ओढले, शारीरिक शोषणाचा आरोप

Shanishingnapur : शनि जयंतीला पोलीस प्रशासनाचे कौतुकास्पद नियोजन; शनिभक्तांकडून कौतुकाचा वर्षाव
4

Shanishingnapur : शनि जयंतीला पोलीस प्रशासनाचे कौतुकास्पद नियोजन; शनिभक्तांकडून कौतुकाचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.