Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gadchiroli News: एसटी बसस्थानकांचा होणार कायापालट! परिवहन विभागाने हाती घेतली नवीन मोहीम

बसस्थानकांवरील अस्वच्छतेचा प्रश्न अतिशय गंभीर असून याबाबत आता स्वतः परिवहन विभागाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. दर १५ दिवसांनी बसस्थानक स्वच्छता परिसरात राबविण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 17, 2026 | 12:30 PM
Gadchiroli News: एसटी बसस्थानकांचा होणार कायापालट! परिवहन विभागाने हाती घेतली नवीन मोहीम

Gadchiroli News: एसटी बसस्थानकांचा होणार कायापालट! परिवहन विभागाने हाती घेतली नवीन मोहीम

Follow Us
Close
Follow Us:
  • १५ दिवसांनी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार
  • महिन्यातून दोनदा स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत रापमच्या मध्यवर्ती कार्यालयाने दिले निर्देश
  • बसस्थानकाच्या परिसरातील बॅनरची गर्दी हटवणार
गडचिरोली: राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवरील अस्वच्छतेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. यामुळे स्वतः परिवहन विभागानेच याबाबत कंबर कसली आहे. बसस्थानकांच्या संपूर्ण आवारात, तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये आता दर १५ दिवसांनी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आता देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, विद्यार्थी, नागरिक, तसेच एसटीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

BMC Election Result 2026: फूट आणि फटका, तरीही ठाकरेंचा झुंजार लढा; मुंबईतील ६५ जागांचा खरा अर्थ काय?

सोलापूर येथील बसस्थानकाला भेट देऊन परिवहनमंत्र्यांनी पाहणी करून कारवाईचा बडगा उगारला होता, अशी परिस्थिती इतर ठिकाणच्या बसस्थानकांमध्ये देखील कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळते. त्यामुळे दर १५ दिवसांनी बसस्थानक स्वच्छता परिसरात राबविण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. या स्वच्छता मोहिमेतून बसस्थानकातील बैठक व्यवस्था, लादी, भिंती, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, महिला विश्रांतीगृहे, फलाट, कार्यालयीन कक्ष, शौचालयांची सफाई होणार असून रापमच्या प्रशासकीय इमारतीमधील कार्यालय स्वच्छ करण्यात येणार आहे.  (फोटो सौजन्य – AI Created)

अंमलबजावणीची जबाबदारी विभाग प्रमुखांवर

दर १५ दिवसाला स्वच्छता मोहिमेची अंमलबजावणी प्रत्येक बसस्थानकावर काटेकोरपणे होईल, याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र डबे उपलब्ध करून कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करून विल्हेवाट लावण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने महामंडळाचे नियोजन सुरू आहे.

जाहिरातींच्या बॅनरची गर्दी हटणार

जिल्ह्यातील सर्व स्थानकांत महिन्यातून दोनदा स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत रापमच्या मध्यवर्ती कार्यालयाने निर्देश दिले आहेत. यामध्ये बसस्थानकाच्या परिसरातील बॅनरची गर्दी हटविण्यात येणार आहे. यामुळे बकाल परिसर स्वच्छ होणार आहे. भिंतीवर लावलेले जाहिरातीचे पोस्टर काढून परिसर स्वच्छ व चकचकीत ठेवण्यावर भर दिला जाणार असल्याचे महामंडळाने म्हटले आहे. या मोहिमेमुळे एसटी बसस्थानके अधिक स्वच्छ, आरोग्यदायी आणि प्रवाशांसाठी आनंददायी ठरणार आहे.

KDMC Election: केडीएमसी निवडणूक रणधुमाळी! २० उमेदवार बिनविरोध तर उद्या उर्वरित जागांचा निकाल

राज्य परिवहन विभागाने आदेश जारी केले आहे. याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच बसस्थानके स्वच्छ करण्यात येणार आहे. महिन्यातून दोनदा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या स्वच्छते मोहिमेमुळे एसटी बसस्थानके अधिक स्वच्छ, आरोग्यदायी व प्रवाशांसाठी आनंददायी ठरणार आहे.- अशोककुमार वाढीभस्मे, विभागीय नियंत्रक

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: St bus stations set for a major transformation transport department will clean st bus stand gadchiroli news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Gadchiroli
  • NAVARASHTRA
  • st bus

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.