express (फोटो सौजन्य - pinterest)
चेन्नई एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या गाडीवर दगडफेक झाली आणि त्या गाडीतून प्रवास करणारी कर्जत येथील तरुणी गंभीर जखमी झाली आहे. त्या दगडफेकीबद्दल संबंधित महिला प्रवासी यांनी कर्जत येथे तक्रार नोंदवली असून कर्जत पैसेंजर असोसिएशनकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका; म्हणाले, 28 मार्चला घोषणा केली अन्…
४ एप्रिल २०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस-चैन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेसवरील दगडफेकीत कर्जत येथील २४ वर्षीय तेजस्विनी बाळाराम भोईर ही तरुणी गंभीर जखमी झाली. तेजस्विनी बाळाराम भोईर या प्रवासी तरुणी ठाणे येथील एका शिपिंग कंपनीत ज्युनियर ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. ती दररोज चैन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेसने ठाणे ते कर्जत असा प्रवास करते. ४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सात वाजता त्या ठाणे स्थानकातून महिलांच्या डब्यातून खिडकी शेजारील सिटवर बसुन आपल्या मैत्रीणीसह प्रवास करत होती. गाडी कल्याण स्थानक पार करून विठ्ठलवाडी स्थानकाच्या पुढे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आली असता अचानक डाव्या बाजूने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गाडीवर दगड भिरकावला. हा दगड खिडकीतून आत येऊन तेजस्विनी हिच्या डोक्याला जोरात लागला. या धक्क्यातून ती सावरते न सावरते तोच रक्तस्त्राव सुरू झाला. काही प्रवाशांनी तत्काळ ट्रेनची चैन खेचली, त्यामुळे गाडी विठ्ठलवाडी आणि अंबरनाथ स्थानकांदरम्यान थांबली.
रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र संताप
या घटनेनंतर रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कर्जत येथे रेल्वे प्रशासनाने त्वरित कारवाई करण्याची मागणी होत आहे. धावत्या रेल्वे गाड्यांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, या घटनांमुळे प्रवाशांचे प्राण धोक्यात येत आहेत.
गाडी कर्जत स्थानकात पोहोचल्यानंतर स्टेशन मास्तर यांनी या घटनेचा मेमो तयार केला. कर्जत रेल्वे जिआरपीच्या कर्मचा-यांनी तेजस्विनी हिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना डिस्वार्ज देण्यात आला.
या आधी सुद्धा झाली होती दगड फेक
मुंबई – चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना १२ जानेवारीला घडली होती. अज्ञात इसमांकडून दगडफेक करण्यात आली. विकलांग डब्यात बसलेल्या एका प्रवाशाला किरकोळ जखम झाली होती. त्याच्यावर तात्काळ प्रथमोपचार देण्यात आले. पण या घटनेमुळे रेल्वेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दगडफेकीमुळे या गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या.
ज्या पात्रतेच्या निकषात बसत नव्हत्या….; लाडकी बहीण योजनेबाबत संजय सावकारेंचे सूचक विधान