Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी इंद्रजित भिलारे यांच्या नावाची जोरदार मागणी

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान कुडाळ गटात इंद्रजित भिलारे यांनी पायाला भिंगरी लावून प्रभावीपणे काम केले. गावोगावी संपर्क साधत युवकांना संघटित करण्याबरोबरच पक्षाच्या विचारांशी तरुणांना जोडण्याचे काम त्यांनी केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 01, 2026 | 01:30 PM
पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी इंद्रजित भिलारे यांच्या नावाची जोरदार मागणी

पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी इंद्रजित भिलारे यांच्या नावाची जोरदार मागणी

Follow Us
Follow Us:

मेढा : पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदाचा मार्ग ग्रामविकास विभागाने मोकळा केला असून, या पदासाठी सायगाव विभागातील युवा कार्यकर्ते आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक, माजी सैनिक इंद्रजित भिलारे यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रतापगड कारखान्याचे माजी संचालक भानुदास गायकवाड विद्यमान संचालक विठ्ठल मोरे, भाजप किसान मोर्चा जावळी अध्यक्ष राहुल माने या ज्येष्ठ मंडळींनी ही मागणी केली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान कुडाळ गटात इंद्रजित भिलारे यांनी पायाला भिंगरी लावून प्रभावीपणे काम केले. गावोगावी संपर्क साधत युवकांना संघटित करण्याबरोबरच पक्षाच्या विचारांशी तरुणांना जोडण्याचे काम त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे सायगाव विभागातून सध्या दोन महिला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. त्यामुळे या विभागाला प्रतिनिधित्वाची संधी देताना तरुण चेहऱ्याला पुढे आणावे, अशी भूमिका ज्येष्ठ मंडळींकडून व्यक्त होत आहे. इंद्रजित भिलारे यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला स्वीकृत सदस्यपदाची संधी मिळाल्यास सायगाव विभागातील युवकांना अधिक प्रभावी नेतृत्व मिळू शकते, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल? राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांची पदाधिकाऱ्यांबाबत नाराजी

युवक संघटन उभारण्यात सक्रिय भूमिका इंद्रजित भिलारे यांनी घेऊन सायगावसह कुडाळ आणि भणंग विभागातील युवकांना एकत्र जोडण्याचे काम सातत्याने केले आहे. विविध सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून युवकांशी त्यांचा सातत्याने संपर्क राहिला आहे. त्यामुळे त्यांना स्वीकृत सदस्यपदाची संधी दिल्यास या भागातील युवकांचे संघटन आणखी मजबूत होण्यास मदत होईल, असे समर्थकांचे म्हणणे आहे.

सायगाव विभागाला युवा नेतृत्वाची संधी आणि भाजपला संघटनात्मक बळ देण्यासाठी इंद्रजित भिलारे यांना स्वीकृत सदस्यपद मिळावे, अशी मागणी बाबा साळेकर, ला. बा. पतसंस्था संचालक नितीन मोरे, विष्णू करंजकर आदी ज्येष्ठ मंडळींसह युवकांमधूनही पुढे येत आहे.

माजी सैनिकाचा अनुभव पक्षासाठी ठरणार उपयुक्त

सैन्य दलात सेवा बजावून निवृत्त झालेले इंद्रजित भिलारे यांच्याकडे शिस्त, संघटन कौशल्य आणि नेतृत्वाचा अनुभव आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातही त्यांनी सक्रिय भूमिका बजावत युवकांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी त्यांच्या नावाचा विचार केल्यास भाजपचे संघटन आणखी बळकट होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सायगाव विभागाला युवा नेतृत्वाची संधी आणि भाजपला संघटनात्मक बळ देण्यासाठी इंद्रजित भिलारे यांना स्वीकृत सदस्यपद मिळावे, अशी मागणी आता ज्येष्ठ मंडळींसह युवकांमधूनही पुढे येत आहे.

Web Title: Strong demand for indrajit bhilare nomination as a co opted member of the panchayat samiti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • Medha News
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara Municipal Council:२५ कोटींच्या नुकसानभरपाईचे सात कोटींचे गणित कसे? सातारा पालिकेच्या सभेत प्रशासनाची पोलखोल
1

Satara Municipal Council:२५ कोटींच्या नुकसानभरपाईचे सात कोटींचे गणित कसे? सातारा पालिकेच्या सभेत प्रशासनाची पोलखोल

Satara News : सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या महत्त्वपूर्ण सूचना
2

Satara News : सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या महत्त्वपूर्ण सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.