आमगाव : जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी दमदार पाऊस झाला. त्यामुळे नदी आणि नाल्यांना पूर आला. आमगाव तालुक्यातील (Amgaon taluka) किंडगीपार नाल्याच्या (Kindgipar drain) पुलावरून वाहत असलेल्या पाण्यातून वाहन काढत असताना माजी सैनिक मोहन नेवारे (Ex-serviceman Mohan Neware) वाहून गेले होते. त्यांचा मृतदेह तब्बल ३६ तासानंतर आज शुक्रवारी शोध पथकाच्या हाती लागला.
मंगळवारी दिवसा आणि रात्रभर आलेल्या दमदार पावसामुळे बुधवारी जलजन्य स्थिती निर्माण झाली होती. अनेक मार्गांवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद होती. पाणी असलेले पूल ओलांडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. मात्र ते आदेश न जुमानता आमगाव तालुक्यातील पदमपूर (Padampur in Amgaon Taluka) येथील माजी सैनिक मोहन शेंडे, मोहित बोहरे आणि रवी महारवाडे हे तिघे टाटासुमोने शिवणी( Shivani ) येथे तेरवीला जाण्याकरिता सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास निघाले.
पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. यात टाटा सुमोसह तिघेही पुराच्या पाण्यासोबत वाहू लागले. मोहित बोहरे आणि रवी महारवाडे आपला जीव वाचवत बाहेर पडले. मात्र, मोहन शेंडे हा माजी सैनिक पुराच्या पाण्यासह वाहून गेला. रात्रीपासून शोधकार्य हाती घेण्यात आले. मात्र, मृतदेह हाती लागला नव्हता. आज शुक्रवारी सकाळी तब्बल ३६ तासांच्या प्रयत्नानंतर त्यांचा मृतदेह (dead body) हाती लागला.