Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Agricultural News: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव एकत्र शासनाकडे सादर करा: शंभुराज देसाईंचे आदेश

काही भागांत नद्यांना पूर आल्याने शेतीतील पिके पूर्णतः पाण्यात गेली आहेत. माण, पाटण, कोरेगाव, खटाव आणि जावळी तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची तीव्रता अधिक होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 21, 2025 | 04:45 PM
Satara Agricultural News: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव एकत्र शासनाकडे सादर करा: शंभुराज देसाईंचे आदेश
Follow Us
Close
Follow Us:

Satara Agricultural News: सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध शासकीय विभागांचे मोठे नुकसान झाले असून, या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी तातडीने संयुक्त प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

पालकमंत्री देसाई यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती व पर्जन्यमानाचा आढावा दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतला. अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात पिण्याचे पाणी गढूळ येत असल्याने पोटदुखी, जुलाब, उलट्या यांसारखे संसर्गजन्य आजार वाढू शकतात. त्यामुळे प्राथमिक व ग्रामीण रुग्णालयांमध्ये औषधसाठा पुरेसा ठेवावा आणि वैद्यकीय अधिकारी मुख्यालय सोडू नयेत, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री देसाई यांनी दिल्या.

Election Commission of India: निवडणूक आयोगाचं नेमकं चाललंय काय? आता EVM तपासणीच्या नियमातही  बदल

पावसामुळे अनेक ठिकाणी सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, विद्युत पोल व तारा तुटल्याचे समोर आले असून, याबाबत नुकसानीचे स्वतंत्र प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले. तसेच, भूस्खलन झालेल्या रस्त्यांवर तातडीने कारवाई करावी व सार्वजनिक बांधकाम विभागाने यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देशही देण्यात आले.शाखा अभियंता यांनी मान्सून कालावधीत आपापल्या तालुक्यात थांबावे, असा आदेशही यावेळी देण्यात आला.

सध्या मोठ्या धरणांमध्ये ३२ टक्के तर लहान धरणांमध्ये ६० टक्के पाणीसाठा असून, लहान धरणांमधून पुढील आठवड्यात विसर्ग सोडण्यात येईल. प्रशासन कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सज्ज असल्याचे सांगण्यात आले. सध्या जिल्ह्यात तीन रस्ते बंद असून, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक तालुक्यांतील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः कापूस, सोयाबीन, भात, भाजीपाला व फळपिके यांना फटका बसला असून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

Uttar Pradesh Crime: पतीला टीबी, पत्नीचे बाहेर अफेर, मुलं अडथळा बनू लागली म्हणून….; जन्मदात्या आईने केली

काही भागांत नद्यांना पूर आल्याने शेतीतील पिके पूर्णतः पाण्यात गेली आहेत. माण, पाटण, कोरेगाव, खटाव आणि जावळी तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची तीव्रता अधिक होती. अनेक शेतकऱ्यांनी स्थानिक प्रशासनाकडे नुकसान भरपाईसाठी मागणी केली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ पंचनाम्याचे काम हाती घेण्यात आले असून महसूल विभाग, कृषी विभागाचे पथक संबंधित भागात भेटी देऊन प्राथमिक अंदाज नोंदवत आहे. शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा मिळावा यासाठी शासनस्तरावरून तातडीने प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Submit proposals for the damage caused by heavy rains to the government together shambhuraj desai orders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 04:45 PM

Topics:  

  • Heavy Rainfall
  • Satara News
  • Shambhuraj Desai

संबंधित बातम्या

महायुतीला टक्कर देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन ठरला; शशिकांत शिंदे यांनी दिली माहिती
1

महायुतीला टक्कर देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन ठरला; शशिकांत शिंदे यांनी दिली माहिती

Satara News :  महाविकास आघाडीची साताऱ्यात कमराबंद खलबते; मित्र पक्षांसाठी जागेचा फॉर्म्युला ठरला ?
2

Satara News : महाविकास आघाडीची साताऱ्यात कमराबंद खलबते; मित्र पक्षांसाठी जागेचा फॉर्म्युला ठरला ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.