पतीला टीबी, पत्नीचे बाहेर अफेर, मुलं अडथळा बनू लागली म्हणून....; जन्मदात्या आईने केली क्रूर हत्या
प्रेमात पडलेली व्यक्ती काहीही करू शकते, असं म्हटलं जातं. पण ही बाब उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये अगदी सत्यात उतरली आहे. या गावातील एक महिलेने तिच्या प्रेमात अडथळ निर्माण करणाऱ्या स्वत:च्या दोन्ही मुलांची हत्या केल्याचं उघडकीस आलं. येथे दोन मुलांच्या आईने प्रेमाखातीर असं काही केले की सर्वांना धक्का बसला.
ही बाब उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरच्या रुडकाली गावाची आहे. येथे राहणाऱ्या मुस्कानचे लग्न सात वर्षांपूर्वी रुडकाली येथील रहिवासी वसीमसोबत झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून वसीम टीबीने ग्रस्त होता आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत असल्याने तो मुस्कानची इच्छा पूर्ण करू शकत नव्हता. याच काळात जुनैद नावाचा एक तरुण मुस्कानच्या आयुष्यात आला, जो तिचा जवळचा नातेवाईक होता. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांचे प्रेमसंबंधात रुपांतर झाले. वसीम अनेकदा उपचार आणि कामासाठी चंदीगडमध्ये राहत असे, ज्याचा फायदा घेत मुस्कान जुनैदला घरी बोलावत होती. दोघांचेही अवैध शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवाती झाली.
मुस्कान आणि जुनैद यांच्या प्रेमात मुस्कानची मुले अरहान आणि इनाया अडथळा ठरू लागले होते, असं मुस्कानचं म्हणणं होतं. मुस्कानने जुनैदशी लग्न करण्याचा आणि त्याच्यासोबत राहण्याचा आग्रह धरला. जुनैद म्हणाला की तो मुस्कानचा खर्च उचलू शकतो, पण मुलांचा नाही. यानंतर दोघांनीही एक भयानक कट रचला. जुनैदने मुस्काना विष आणून दिले, त्यानंतर १९ जूनच्या सकाळी मुस्कानने मुलांच्या चहामध्ये विष मिसळले आणि तिच्या दोन्ही मुलांना ते पाजले. चहा पियालानंतर दोन्ही मुलांचा जागीचं मृत्यू झाला.
शुक्रवारी दुपारी पोलिसांना दोन मुलांच्या मृत्यूची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तेथील दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले. पाच वर्षांचा अरहान आणि एक वर्षाचा इनाया मृतावस्थेत पडले होते. मुलांचे वडील वसीम कामासाठी चंदीगडला गेले होते आणि मुलांची आई मुस्कान घरी फक्त उपस्थित होती.
तपासात मुलांच्या शरीरावर कोणत्याही जखमा किंवा जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. चौकशीदरम्यान मुस्कानने सांगितले की तिने सकाळी नाश्त्यात मुलांना चहा आणि बिस्किटे दिली होती. पोलिसांना प्रकरण संशयास्पद वाटले आणि मुलांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये विषबाधेमुळे मुलांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक तथ्य उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी मुस्कानची काटेकोरपणे चौकशी केली आणि तिने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी मुस्कानला अटक केली आणि या दुहेरी हत्याकांडाचे रहस्य उघड केले. चौकशीदरम्यान तिने संपूर्ण कट उघड केला. दरम्यान, जुनैद अजूनही फरार आहे आणि पोलीस त्याच्या शोधात छापे टाकत आहेत.