Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Politics: साताऱ्यात उसाच्या पैशावरून रणकंदन! ९ मे रोजी नितीन गडकरींना काळे झेंडे दाखवणार; शेतकरी संघटनेचा इशारा

एफआरपी नियमानुसार उस तोडल्यानंतर १४ दिवसांत शेतकऱ्यांना पैसे देणे बंधनकारक असते. तसे न केल्यास १५ टक्के व्याजासह रक्कम देणे आवश्यक आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 02, 2026 | 03:15 PM
Satara Sugarcane Arrears 2026, Kisan Veer Sakhar Karkhana News,

Satara Sugarcane Arrears 2026, Kisan Veer Sakhar Karkhana News,

Follow Us
Follow Us:
  •  उसाचे पैसे महिनोनमहिने थकीत ठेवून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
  • व्याजासह थकीत रक्कम जमा न झाल्यास केंद्रीय मंत्री  नितीन गडकरींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा
  • शेतकऱ्यांना पाच-सहा महिन्यांपासून उसाचे पैसे मिळालेले नाहीत
 

Satara Politics : उसाचे पैसे महिनोनमहिने थकीत ठेवून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांविरोधात संताप उसळला असून हा रोष आता रस्त्यावर उतरू लागला आहे. ९ मे पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर व्याजासह थकीत रक्कम जमा न झाल्यास केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांच्या सातारा दौऱ्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला जाईल, असा इशारा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना किसान मंचचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष शंकर गोडसे यांनी दिला आहे.

किसन वीर, प्रतापगड तसेच काही प्रमाणात अजिंक्यतारा साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांचे तब्बल सहा महिन्यांपासून उसाचे पैसे थकवण्यात आले आहेत. यामध्ये किसन वीर कारखान्याला सरकारकडून उर्जितावस्थेसाठी ४६७ कोटींची मदत मिळूनही आणि शेतकऱ्यांनी उभे केलेले ४३ कोटी मिळून एकूण ५७८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असताना, गेल्या पंधरा महिन्यांपासून साखर कारखान्यातील कामगारांना आणि शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळाला नसल्याचा आरोप गोडसे यांनी केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत होत चालल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Pandharpur News : यमाई तलावालगतची जमीन हस्तांतरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

दरवर्षी दिला जाणारा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार यंदा  मंत्री नितीन गडकरी यांना ९ मे रोजी प्रदान करण्यात येणार असून त्या कार्यक्रमासाठी ते सातारा जिल्ह्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शंकर गोडसे म्हणाले, “शेतकऱ्यांना पाच-सहा महिन्यांपासून उसाचे पैसे मिळालेले नाहीत. यामुळे मुलांची लग्ने रखडली असून पुढील पिकांचे नियोजन कसे करायचे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.” किसन वीर साखर कारखान्याच्या सुमारे ५२ हजार सभासद कुटुंबांचे भविष्य अंधारात गेल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

Chhatrapati Sambhajinagar News: जायकवाडीत ४७.८७ टक्के साठा! 

एफआरपी नियमानुसार उस तोडल्यानंतर १४ दिवसांत शेतकऱ्यांना पैसे देणे बंधनकारक असते. तसे न केल्यास १५ टक्के व्याजासह रक्कम देणे आवश्यक आहे. मात्र, हे नियम पाळले जात नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. “कारखाना व्यवस्थापन साखर विकून आपले हित साधत आहे, पण शेतकऱ्यांच्या खात्यात दमडीही जमा होत नाही,” असा संतप्त आरोप गोडसे यांनी केला.

दरम्यान, कर्जाचा बोजा वाढत असताना आणि बँकांचे व्याज सुरू असताना उसाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शेतकरी संघटनेने दिला आहे.

 

Web Title: Sugar mill arrears row in satara farmers to show black flags to nitin gadkari on may 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Farmers News
  • Nitin Gadkari
  • Satara News

संबंधित बातम्या

एकल महिलांच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी जिल्हा परिषद कटिबद्ध; विविध योजनांचा लाभ देणार – डॉ. प्रिया शिंदे
1

एकल महिलांच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी जिल्हा परिषद कटिबद्ध; विविध योजनांचा लाभ देणार – डॉ. प्रिया शिंदे

‘सहकार’चा दणदणीत विजयी जल्लोष, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, घोषणाबाजी, फटाके आणि पावसाच्या सरींनी रंगला विजयसोहळा
2

‘सहकार’चा दणदणीत विजयी जल्लोष, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, घोषणाबाजी, फटाके आणि पावसाच्या सरींनी रंगला विजयसोहळा

साताऱ्यात पावसाची चाहूल, कोयना परिसरात वाढली पर्जन्यवृष्टी, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
3

साताऱ्यात पावसाची चाहूल, कोयना परिसरात वाढली पर्जन्यवृष्टी, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

Satara News: लिंब ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमिततेप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक
4

Satara News: लिंब ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमिततेप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.