Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खैरापाडा परिसरातील नामांकित शाळेच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

हालाखीची परिस्थिती असताना देखील त्यांनी आपल्या मुलाला काबाडकष्ट करून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षणासाठी ठेवले होते. मागील दोन-तीन दिवसांपासून नितीन शाळेत जात नव्हता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 19, 2024 | 09:02 AM
लेकीच्या लग्नासाठी ठेवली होती बँकेत रक्कम; तिच मिळत नसल्याने आलं नैराश्य

लेकीच्या लग्नासाठी ठेवली होती बँकेत रक्कम; तिच मिळत नसल्याने आलं नैराश्य

Follow Us
Close
Follow Us:

पालघर : बोईसर परिसरातील दहावीतील विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. नितीन मुखिया (वय १७) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून, तो खैरापाडा परिसरातील एका नामांकित शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होता.

आई-वडील दोघेही मजुरीसाठी घराबाहेर असताना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास नितीन याने आपल्या राहत्या खोलीत गळफास घेतला. शेजारी राहणाऱ्या लहान मुलांनी घराचा दरवाजा उघडल्यानंतर ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी नितीनला तातडीने बोईसर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. लोग्वंदी पादा येथील अगदी छोट्या खोलीत राहणाऱ्या नितीनच्या आई वडिलांची परिस्थिती अतिशय गरीब आहे.

हालाखीची परिस्थिती असताना देखील त्यांनी आपल्या मुलाला काबाडकष्ट करून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षणासाठी ठेवले होते. मागील दोन-तीन दिवसांपासून नितीन शाळेत जात नव्हता. दरम्यान, दहावीची परीक्षा जवळ आली असताना एकुलत्या एक मुलाने अचानक आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आई-वडील दोघेही मजूरी करत असल्याने मुखिया कुटुंबावर मोठे संकट आले आहे.

प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

मुलाच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी वडिलांनी बोईसर पोलिसांकडे केली असून, अकस्मात मृत्यूची नोंद बोईसर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. नितीन मुखिया या शाळकरी विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येमागे शाळेतील किंवा इतर काही कारणे आहेत का? याची चौकशी बोईसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान चौधरी हे करीत आहेत.

आत्महत्येपूर्वी तयार केली ऑडिओ क्लिप

आमचा मुलगा काही दिवस शाळेत जात नव्हता. तो निराश होता. मात्र, त्याने त्याची ऑडिओ क्लिप तयार करून ठेवली, त्यानंतर त्याने आपले जीवन संपवले. शाळा प्रशासनाकडून माझ्या मुलाला त्रास होता. या प्रकरणाचा तपास करून तशी कारवाई करावी.

– सुरेश मुखिया, पालक

Web Title: Suicide of a student of a renowned school in khairapada area nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 09:02 AM

Topics:  

  • Mumbai News
  • Palghar crime news

संबंधित बातम्या

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर
1

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने
2

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?
3

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?

महाराष्ट्रातील हवा धोक्यात! १७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे; मुंबई, MMR ची स्थिती चिंताजनक
4

महाराष्ट्रातील हवा धोक्यात! १७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे; मुंबई, MMR ची स्थिती चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.