Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: 200 हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची फौज मैदानात; वरळी समुद्रकिनाऱ्यासह कोळीवाड्याची व्यापक स्वच्छता

Mumbai News: मुंबईतील सार्वजनिक परिसर अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने सुमीत फॅसिलिटीजतर्फे 1 आणि 2 सप्टेंबर रोजी वरळी समुद्रकिनारा आणि कोळीवाडा परिसरात दोन दिवसीय स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 200 हून अधिक सफाई कर्मचारी, 10 पर्यवेक्षक आणि 2 व्यवस्थापक या मोहिमेत सहभागी झाले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 02, 2026 | 05:16 PM
200 हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची फौज मैदानात; वरळी समुद्रकिनाऱ्यासह कोळीवाड्याची व्यापक स्वच्छता

200 हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची फौज मैदानात; वरळी समुद्रकिनाऱ्यासह कोळीवाड्याची व्यापक स्वच्छता

Follow Us
Follow Us:
  • वरळी कोळीवाड्यात सुमीत फॅसिलिटीजची स्वच्छता मोहीम
  • दोन दिवसांत जवळपास 50 टन कचरा हटवला
  • समुद्रकिनारा, अंतर्गत गल्ल्यांमधील कचऱ्याची सफाई
Mumbai News: मुंबईतील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने सुमीत फॅसिलिटीजने वरळी समुद्रकिनारा आणि कोळीवाडा परिसरात दोन दिवसीय विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली. 1 आणि 2 सप्टेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेत समुद्रकिनाऱ्यासह अंतर्गत गल्ल्या आणि सातत्याने कचरा साचणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

200 हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांचा सहभाग

मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी 200 हून अधिक सफाई कर्मचारी कार्यरत होते. त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी 10 पर्यवेक्षक आणि 2 व्यवस्थापक तैनात करण्यात आले होते. संपूर्ण परिसराची विविध विभागांमध्ये विभागणी करून प्रत्येक विभागाची जबाबदारी स्वतंत्र पर्यवेक्षकांकडे सोपविण्यात आली.

एसटीला एकूण 10324 कोटींचा तोटा; तोट्यातील मार्ग ते ई-बसपर्यंतच्या पैलूवर 2 दिवस विचारमंथन

जवळपास 50 टन कचरा हटवला

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांच्या मोहिमेदरम्यान जवळपास 50 टन कचरा हटविण्यात आला. पहिल्या दिवशी सुमारे 30 टन, तर दुसऱ्या दिवशी वृत्त देईपर्यंत 15 ते 16 टन कचरा संकलित करण्यात आला होता.

टिपर, ई-रिक्षांसह यंत्रसामग्रीचा वापर

कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी प्रत्येकी दोन टन क्षमतेची टिपर वाहने, ई-रिक्षा आणि कचरा संकलनासाठी आवश्यक यंत्रांचा वापर करण्यात आला. गवत वाढलेल्या भागांमध्ये मशीनद्वारे गवत कापण्यात आले. याशिवाय परिसरात प्रत्येकी 120 लिटर क्षमतेच्या कचरापेट्याही ठेवण्यात आल्या.

प्लास्टिक आणि साचलेल्या कचऱ्यावर विशेष लक्ष

मोहिमेत समुद्रकिनाऱ्याची सखोल स्वच्छता करण्यासह प्लास्टिकजन्य पदार्थ आणि अन्य कचरा हटविणे, अंतर्गत गल्ल्यांची साफसफाई, वारंवार कचरा साचणाऱ्या ठिकाणांची स्वच्छता तसेच संकलित कचऱ्याची तातडीने वाहतूक करण्यावर भर देण्यात आला.

उपसभापती सचिन अहिर यांनी केली पाहणी

परिसरातील नागरिकांनी मांडलेल्या समस्यांची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती सचिन अहिर यांनी वरळी समुद्रकिनारा आणि कोळीवाडा परिसराला भेट दिली. त्यांनी स्वच्छता मोहिमेची माहिती घेतली आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

‘स्वच्छ महाराष्ट्रासाठी आमचे योगदान’

सुमीत ग्रुप एंटरप्रायझेसचे कार्यकारी अध्यक्ष सुमित साळुंके यांनीही मोहिमेची पाहणी केली. स्वच्छ, निरोगी आणि जबाबदार समाजाच्या निर्मितीसाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ महाराष्ट्र आणि स्वच्छ भारत अभियानाला योगदान देण्यासह सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून स्थानिक समुदायाच्या हितासाठी मोहीम राबविल्याचे साळुंके यांनी नमूद केले.

जुहू बीचनंतर वरळीमध्ये उपक्रम

यापूर्वी जुहू समुद्रकिनाऱ्यावर राबविण्यात आलेल्या CSR स्वच्छता उपक्रमाचा पुढील टप्पा म्हणून वरळीतील ही मोहीम राबविण्यात आली. मुंबईतील सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेसाठी अशा उपक्रमांच्या माध्यमातून योगदान देण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

दैनंदिन कचरा संकलनात होणारा खोळंबा टळणार! बंद पडणाऱ्या वाहनांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी पालिकेची १.४८ कोटींची नवी यंत्रणा

Web Title: Sumeet facilities two day cleanliness drive at worli koliwada beach 50 tonnes waste removed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

BGMI प्लेयर बनले गेम निर्माते! ‘World of Wonder’मध्ये महाराष्ट्र ठरले गेमिंगचे महत्त्वाचे केंद्र
1

BGMI प्लेयर बनले गेम निर्माते! ‘World of Wonder’मध्ये महाराष्ट्र ठरले गेमिंगचे महत्त्वाचे केंद्र

‘नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी…’; Mangal Prabhat Lodha यांचे सर्वांना आवाहन
2

‘नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी…’; Mangal Prabhat Lodha यांचे सर्वांना आवाहन

GSB Ganeshotsav 2026: जीएसबी महागणपतीचा शाही थाट! ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदी अन् ७०३ कोटींचे विमा संरक्षण
3

GSB Ganeshotsav 2026: जीएसबी महागणपतीचा शाही थाट! ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदी अन् ७०३ कोटींचे विमा संरक्षण

Ganesh Idol Factory Fire: वाई MIDCमध्ये गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक
4

Ganesh Idol Factory Fire: वाई MIDCमध्ये गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.