Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी…’; Mangal Prabhat Lodha यांचे सर्वांना आवाहन

Mangal Prabhat Lodha: भारताची शिक्षणव्यवस्था ही केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित नव्हती, तर कौशल्य, संस्कार, श्रमप्रतिष्ठा, संस्कृती आणि जीवनोपयोगी शिक्षणाची समृद्ध परंपरा भारतात पूर्वीपासून होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 02, 2026 | 06:14 PM
drug free mumbai

drug free mumbai

Follow Us
Follow Us:
  • एका महापालिका शाळेच्या प्रगतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन
  • चांगल्या शैक्षणिक व व्यवस्थापन पद्धती शेअर कराव्यात – मंगल प्रभात लोढा
  • कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठे बदल
मुंबई/Mangal Prabhat Lodha: शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी आपल्या परिसरातील किमान एका महापालिका शाळेच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. एका कार्यक्रमात ते शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांसमोर ते बोलत होते. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी केवळ आपल्या संस्थेपुरते मर्यादित न राहता समाजाप्रती असलेली जबाबदारीही पार पाडली पाहिजे, असे लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले.

“आपल्या परिसरातील एखादी महापालिका शाळा निवडून तिच्या शैक्षणिक विकासासाठी योगदान द्यावे. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील ज्ञान मिळावे यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून द्यावे आणि अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे. आर्थिक मदतीऐवजी आपल्या शाळेतील शिक्षकांनी महिन्यातून एकदा त्या शाळेला भेट देऊन चांगल्या शैक्षणिक व व्यवस्थापन पद्धती शेअर कराव्यात,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील कौशल्य विकासाच्या महत्त्वावरही विशेष भर दिला. विद्यार्थ्यांना लहान वयापासून विविध कौशल्यांचे शिक्षण मिळणे आवश्यक असून, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासासोबतच श्रम आणि कष्ट करणाऱ्या व्यक्तींबद्दल आदर निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. भारतात ब्लू-कॉलर कामांविषयी असलेली सामाजिक मानसिकता बदलण्यासाठी कौशल्याधारित शिक्षण हा त्यासाठी महत्त्वाचा मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले.

गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या; गणेश मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

शिक्षण म्हणजे केवळ परीक्षा, गुण आणि पदवी नसून संस्कार, संस्कृती, मूल्ये, वारसा आणि आत्मविश्वास यांचाही शिक्षणात तितकाच महत्त्वाचा वाटा आहे, असेही लोढा यांनी अधोरेखित केले. बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीत सातत्याने परिवर्तन आवश्यक असून, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताची शिक्षणव्यवस्था

भारताची शिक्षणव्यवस्था ही केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित नव्हती, तर कौशल्य, संस्कार, श्रमप्रतिष्ठा, संस्कृती आणि जीवनोपयोगी शिक्षणाची समृद्ध परंपरा भारतात पूर्वीपासून होती. ब्रिटिश राजवटीत ही पारंपरिक शिक्षणपद्धती मोडून काढत पाठांतर आणि नोकरीकेंद्री शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले, अशी भूमिका मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मांडली. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखालील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून भारतीय शिक्षणाच्या या समृद्ध परंपरेला आधुनिक कौशल्ये आणि तंत्रज्ञानाची जोड देत पुन्हा सक्षम करण्याचा प्रयत्न होत आहे. कौशल्याधारित शिक्षण, भारतीय संस्कृती, मूल्ये, आत्मविश्वास आणि व्यावहारिक ज्ञान यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून ‘विकसित भारत’ घडवण्याच्या दिशेने ही नवी शिक्षणव्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला.

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक

‘ड्रग-फ्री मुंबई’साठी शाळांनी पुढाकार घ्यावा

विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पालक, शिक्षक आणि समुपदेशकांनी एकत्र काम करण्याचे मंत्री लोढा यांचे आवाहन ‘ड्रग-फ्री मुंबई’ अभियानात राज्यातील शाळांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. प्रत्येक शाळेने दोन पालक, दोन शिक्षक आणि एका समाजसेवी संस्थेचे प्रतिनिधी अथवा समुपदेशकाचा समावेश असलेली छोटी समिती स्थापन करून विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून व्यसनमुक्तीबाबत जागृती निर्माण करावी, अशी सूचना त्यांनी केली. “पालकांनी केवळ उत्तम शाळा, सुविधा आणि शिक्षण दिले म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही. मुलांना वेळ, प्रेम, आपुलकी आणि त्यांच्या आयुष्यातील घडामोडींमध्ये पालकांचा सहभागही आवश्यक आहे,” असे सांगत त्यांनी पालकांचेही समुपदेशन करण्याची गरज व्यक्त केली. ‘ड्रग-फ्री मुंबई’ हा केवळ शासनाचा उपक्रम न राहता शाळा, शिक्षक आणि पालकांनी मिळून उभारलेली सामाजिक चळवळ बनली पाहिजे, असे आवाहन लोढा यांनी केले.

Web Title: Mangal prabhat lodha said education sector experts should adopt a municipal school and contribute its progress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • Drug Free Mumbai
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai
  • Schools

संबंधित बातम्या

MMRDA News: कोपरी पुलावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना! कारवर कोसळल्या लोखंडी सळ्या; MMRDA ने ठोठावला २ कोटींचा दंड
1

MMRDA News: कोपरी पुलावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना! कारवर कोसळल्या लोखंडी सळ्या; MMRDA ने ठोठावला २ कोटींचा दंड

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत
2

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला
3

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला

पुण्यानंतर आता मुंबईतही पेटकेअर प्रशिक्षण संस्था? मंत्री Mangal Prabhat Lodha यांचा पुढाकार
4

पुण्यानंतर आता मुंबईतही पेटकेअर प्रशिक्षण संस्था? मंत्री Mangal Prabhat Lodha यांचा पुढाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.