Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुनील माने माफीचा साक्षीदार ?; मानेच्या अर्जावर एनआयएला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

उद्योगपती मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटकं आणि व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाला शुक्रवारी नवे वळण आले आहे. या प्रकरणातील आरोपी माजी पोलीस अधिकारी सुनील मानेकडून माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष न्यायालयाकडे अर्ज केला आहे. त्याची दखल घेऊन विशेष न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 18, 2023 | 07:51 AM
सुनील माने माफीचा साक्षीदार ?; मानेच्या अर्जावर एनआयएला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटकं आणि व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाला शुक्रवारी नवे वळण आले आहे. या प्रकरणातील आरोपी माजी पोलीस अधिकारी सुनील मानेकडून माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष न्यायालयाकडे अर्ज केला आहे. त्याची दखल घेऊन विशेष न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या माने यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवणारा अर्ज कारागृहातूनच विशेष न्यायालयाकडे केला. शुक्रवारीच्या सुनावणीला माने आणि अन्य आरोपी व्हिसीमार्फत न्यायालयात उपस्थित होते. त्यावेळी माने यांनी माफीचा साक्षीदाराबाबत लिहिलेल्या अर्जाचा उल्लेख केला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी माने यांच्या अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश एनआयएला दिले.

पश्चाताप माफीचा साक्षीदार होण्याचे मुळ कारण

कारागृहात राहिल्यावर केलेल्या चुकांचा पश्चाताप झाला म्हणूनच माफीचा साक्षीदार होण्याचा निर्णय घेतल्याचे माने यांनी अर्जात नमूद केले आहे. २६ वर्षांच्या कारकिर्दीत कामगिरीचे चांगल्या पद्धतीने मूल्यांकन केले गेले. केंद्र तसेच राज्य सरकारचे २८० पुरस्कार मिळाले. दुर्दैवाने आणि नकळत आपल्याकडून चुका झाल्या त्या चुकांचा पश्चात्ताप करण्यासाठी पीडितांना न्याय देण्यासाठी या प्रकरणातील घटनाक्रम आणि तथ्ये सांगण्याचा निर्णय घेतल्याचे माने यांनी म्हटले आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत न्यायालयाकडे माफीची मागणी केली आहे.

वाझे यांच्यासह अन्य आरोपींचा अर्जाला विरोध

या प्रकरणातील मुख्य आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेसह अन्य आरोपींच्या वकिलांनी माने यांच्या अर्जाला विरोध केला आहे.

Web Title: Sunil mane apology witness order to nia to clarify position on manes application nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2023 | 07:51 AM

Topics:  

  • anil deshmukh
  • cmomaharashtra
  • Mukesh Ambani
  • NAVARASHTRA
  • Sunil Mane

संबंधित बातम्या

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; ऐन निवडणुकीच्या काळात ‘या’ पदाधिकाऱ्याचा राजीनामा
1

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; ऐन निवडणुकीच्या काळात ‘या’ पदाधिकाऱ्याचा राजीनामा

Rolls Royce सोडून Mukesh Ambani यांचा जावई फिरतोय ‘या’ कारमधून, इतकं काय आहे खास?
2

Rolls Royce सोडून Mukesh Ambani यांचा जावई फिरतोय ‘या’ कारमधून, इतकं काय आहे खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.