Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunil Tatkare Sharad Pawar Meeting:  शरद पवारांच्या भेटीचे कारण काय; तटकरेंनी स्पष्टच सांगितलं!

Sunil Tatkare Sharad Pawar Meeting:  प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत नसल्याची चर्चा काल दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती.

  • By anuradha sagar
Updated On: May 13, 2026 | 12:55 PM
Sunil Tatkare NCP, Bombay High Court Aurangabad Bench,

Sunil Tatkare NCP, Bombay High Court Aurangabad Bench,

Follow Us
Follow Us:

 

  • राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पत्रातून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे वगळण्यात आल्याने मोठी खळबळ
  • या घटनेनंतर अवघ्या २४ तासांत सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क
  • सुनील तटकरे यांनी ही भेट केवळ पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी होती आणि यात कोणतेही राजकारण नसल्याचा दावा
 

Sunil Tatkare Meets Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी मंगळवारी (12 मे) अचानक ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे वगळण्यात आली. त्यानंतर अवघ्या २४ तासांत तटकरेंनी शरद पवार यांच्या भेटीबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. शरद पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे यांनी प्रतिक्रीया दिली.

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील नावांवरून चर्चा

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत नसल्याची चर्चा काल दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती. राष्ट्रवादीच्या एका पत्रामधून ही नावे वगळण्यात आल्याचे समोर आल्यानंतर विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत तांत्रिक आणि टायपिंगमध्ये चूक झाल्याचे स्पष्टीकरण सुनेत्रा पवार यांनी दिले. त्यामुळे या चर्चांना काही प्रमाणात पूर्णविराम मिळाला.

Sunil Tatkare Sharad Pawar Meeting:  सुनील तटकरे थेट शरद पवारांच्या भेटीचे कारण काय; तटकरेंनी स्पष्टच सांगितलं!

यानंतर संध्याकाळी सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना तटकरे म्हणाले की, “शरद पवार यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतली. या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण नाही आणि त्यात कोणतेही राजकारण नाही,” असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली होती. त्यासाठी वेळही मागितला होता, बाकी कोणताही विषय नाही. आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही काम करत आहोत तो ठामपणे करत राहणार आहोत, असही सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या पत्राबाबत विचारले असता ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या पत्राचा आणि शरद पवारांच्या भेटीचा काहीही संबंध नाही. यासंदर्भात सुनेत्रा पवार यांनी आधीच ट्विट करून स्पष्टीकरण दिले आहे. त्यावर मला आता काहीच बोलायचं नाही. आजची भेट शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीच होती. असं तटकरेंनी स्पष्ट केलं. त्यानंतर आपण महासचिव पदावर आहात का असं विचारले असता तटकरे काहीच न बोलता निघून गेले.

NEET UG Exam 2026 Paper leak : १० लाखांत खरेदी अन् १५ लाखांत पेपरची विक्री

सुनील तटकरे-प्रफुल्ल पटेल यांच्या भूमिकेकडे लक्ष

सुनील तटकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मंगळवारी दिवसभर सुनील तटकरे यांना महासचिवपदावरून आणि प्रफुल पटेलांना राष्ट्रीय कार्याध्यक्षपदावरून हटवण्यात आल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्याचदरम्यान तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना आणखी खतपाणी मिळाले आहे.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी सुनील तटकरे हे ‘सिल्व्हर ओक’वर शरद पवारांच्या भेटीसाठी आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे काही वेगळा राजकीय निर्णय घेणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, सुनील तटकरे यांना आपण महासचिवपदावर कायम राहणार आहात का, असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी त्यावर मौन बाळगल्याचे दिसून आले. त्यांनी केवळ “शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो,” अशी प्रतिक्रिया दिली.

Baramati Plane Crash Breaking: बारामतीत पुन्हा विमान अपघात;

या सर्व घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या एक्स अकाउंटवरून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांबाबत निर्माण झालेला गोंधळ हा टायपो मिस्टेकमुळे झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, मार्च महिन्यात निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मिनिट्समध्येही सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांपुढे कोणताही उल्लेख नसल्याने त्यावेळीही गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा या मुद्द्यावरून चर्चा रंगू लागल्या असून, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पुढे कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title: Sunil tatkare sharad pawar meeting ncp national executive list controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Nationalist Congress Party
  • Sharad Pawar
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
3

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
4

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.