Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईतील लोकल बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपींना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाला आव्हान; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

महाराष्ट्र सरकार आणि दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) २१ जुलै २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 24, 2025 | 07:28 AM
आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

Follow Us
Follow Us:

मुंबई : मुंबईसह देशाला हादरवून टाकणारा साखळी बॉम्बस्फोट 2006 मध्ये झाला होता. याप्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला. आरोपींवरील गुन्हा सिद्ध करण्यामध्ये पूर्ण अपयश आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. पण, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणाची गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्र सरकार आणि दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) २१ जुलै २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. ज्यामध्ये ७/११ बॉम्बस्फोटातील १२ आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले. या स्फोटांमध्ये १८० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आणि ८०० हून अधिक जखमी झाले. सर्वोच्च न्यायालयाने याचिका स्वीकारली आहे आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी की खटल्याची पुढील सुनावणी कशी करावी, हे ठरवण्यासाठी सुनावणीची तारीख निश्चित केली आहे.

महाराष्ट्र सरकारने याचिकेतील मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ज्यामध्ये पुराव्यांचा अभाव, साक्षीदारांची अविश्वसनीयता, तपासातील त्रुटी, छळाचे आरोप आणि तांत्रिक त्रुटी (जसे की आरडीएक्सच्या जप्तीवर एलएसी सील नसणे) यांचा उल्लेख होता. सरकारचा असा युक्तिवाद आहे की, ही एक गंभीर बाब आहे आणि उच्च न्यायालयाचा निर्णय पीडितांना न्याय देण्यात अपयशी ठरतो.

हायकोर्टाने सोमवारी निकाल देताना पुरावे साक्षीदारांचे जबाब आणि आरोपींकडून जप्त केलेले पदार्थ त्यांना दोषी ठरवण्यासाठी पुरेसे नाहीत. बॉम्ब बनवण्यासाठी वापरलेली स्फोटके योग्यरीत्या राखली गेली नव्हती. पुराव्यांचे सीलिंग देखील खराब होते. गुन्ह्यात वापरल्या जाणाऱ्या बॉम्बचे प्रकार रेकॉर्डवर आणण्यातही सरकारी वकिलांना अपयश आले. आरोपींकडून घेतलेले जबाब जबरदस्तीने नोंदवण्यात आले आहेत असे दिसते, असे म्हटले होते. त्यानंतर निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, आता या निर्णयाला आव्हान दिले गेले आहे.

Web Title: Supreme court to hear plea challenging acquittal of accused in mumbai local bomb blast case today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 07:18 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Mumbai Bomb Blast
  • Mumbai News
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Mumbai News: सर्पदंशाचे मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी रोडमॅप! सर्पदंशापासून उपचारापर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करण्यावर भर
1

Mumbai News: सर्पदंशाचे मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी रोडमॅप! सर्पदंशापासून उपचारापर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करण्यावर भर

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन
2

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार
3

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले
4

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.