Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उजनी, भीमाच्या वाढत्या प्रदूषणावर संताप! सुराज्य अभियान आक्रमक; शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

उजनी जलाशय आणि भीमा नदीमध्ये वाढलेल्या प्रदूषणामुळे लाखो नागरिकांच्या आरोग्य, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेती आणि पर्यावरणाशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत.प्रक्रिया न केलेले घरगुती व औद्योगिक सांडपाणी नदीत मिसळत असल्यामुळे जलप्रदूषण वाढले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 04, 2026 | 03:30 PM
उजनी, भीमाच्या वाढत्या प्रदूषणावर संताप! सुराज्य अभियान आक्रमक; शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

उजनी, भीमाच्या वाढत्या प्रदूषणावर संताप! सुराज्य अभियान आक्रमक; शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

Follow Us
Follow Us:

उजनी जलाशय आणि भीमा नदीतील वाढते प्रदूषण हा लाखो नागरिकांच्या आरोग्य, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेती आणि पर्यावरणाशी संबंधित गंभीर प्रश्न बनल्याचा आरोप करत सुराज्य अभियानाने प्रशासनाच्या निष्क्रयतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि विविध तज्ज्ञ संस्थांच्या अहवालांनंतरही अपेक्षित उपाययोजना होत नसल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीचे राजन बुणगे यांनी पत्रकार परिषदेत केला. उजनी जलाशय हा लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. मात्र प्रक्रिया न केलेले घरगुती व औद्योगिक सांडपाणी नदीत मिसळत असल्याने जलप्रदूषण गंभीर स्वरूप धारण करत असून त्याचा परिणाम आरोग्यासह शेती, पशुधन आणि जैवविविधतेवर होत आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Maharashtra Monsoon Alert: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०२५ च्या अहवालाचा दाखला देत महाराष्ट्रातील ५४ नदीपट्टे प्रदूषित असल्याचे अभियानाने सांगितले. भीमा नदीचा विठ्ठलवाडी ते टाकळी हा पट्टा ‘प्रायोरिटी २’ या गंभीर प्रदूषण श्रेणीत असल्याने हा प्रश्न चिंतेचा विषय ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत सोडण्यास बंदी घालत सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि उद्योगांना आवश्यक शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे निर्देश दिले होते. मात्र कोणीच दखल घेतली नाही.

धरणातील दूषित गाळामुळे अन्नसाखळीवर परिणाम

राज्य शासनाने उजनी जलाशयातील गाळ शेतकऱ्यांना सुपीक माती म्हणून मोफत देण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यातील जड धातू व विषारी घटकांची वैज्ञानिक तपासणी न करता गाळाचे वितरण करणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा यावेळी देण्यात आला. दूषित गाळामुळे अन्नसाखळीवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आली.

जलगुणवत्तेचा मूळ डेटा सार्वजनिक करण्याची मागणी

यावेळी सीपीसीबीच्या शिफारशींची तातडीने अमलबजावणी, जलगुणवत्तेचा मूळ डेटा सार्वजनिक करणे, सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, एसटीपीवर ऑनलाईन मॉनिटरिंग प्रणाली बसविणे, स्वतंत्र संस्थेमार्फत गाळाचे विषारीपण तपासणे, बाधित गावांतील नागरिकांच्या रक्तातील हेवी मेटल्सची तपासणी करणे आणि प्रदूषणासाठी जबाबदारांवर ‘पोल्युटर पेझ’ तत्त्वानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास व्यापक जनआंदोलन उभारून कायदेशीर लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा सुराज्य अभियानाचे जिल्हा समन्वयक दत्तात्रय पिसे यांनी दिला.

येरळवाडी धरणात फक्त 25 टक्के मृत पाणी साठा शिल्लक; वडूजसह अनेक गावांचा पाणी प्रश्न ऐरणीवर

तब्ब्ल दोन हजार पानांची आयोगाकडे याचिका

सुराज्य अभियानाने सुमारे दोन हजार पानांच्या कागदपत्रांसह राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. आयोगाने राज्याच्या आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र आयोगाकडून तीन वेळा स्मरणपत्रे पाठवूनही अद्याप अहवाल सादर झालेला नसल्याचा आरोप अभियानाने केला.

Web Title: Surajya abhiyan raises alarm over rising pollution in ujani and bhima river crisis looms over agricultural and drinking water supplies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Bhima River
  • Drinking Water
  • Solapur

संबंधित बातम्या

Mumbai News: पाण्यातून स्वस्त ‘हरित हायड्रोजन’ उत्प्रेरक! कोबाल्ट-निकेल-फॉस्फेटच्या मिश्रणातून किफायतशीर कॅटॅलिस्ट
1

Mumbai News: पाण्यातून स्वस्त ‘हरित हायड्रोजन’ उत्प्रेरक! कोबाल्ट-निकेल-फॉस्फेटच्या मिश्रणातून किफायतशीर कॅटॅलिस्ट

पिण्याचे पाणी सुरक्षित आहे का? निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक कुटुंबाने फॉलो करायला हव्यात ‘या’ महत्वपूर्ण टिप्स
2

पिण्याचे पाणी सुरक्षित आहे का? निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक कुटुंबाने फॉलो करायला हव्यात ‘या’ महत्वपूर्ण टिप्स

Solapur News: कृषीनंतर पशुसंवर्धन विभागही ‘कमकुवत’; मनुष्यबळ-अधिकार घटल्याने पशुपालक चिंतेत
3

Solapur News: कृषीनंतर पशुसंवर्धन विभागही ‘कमकुवत’; मनुष्यबळ-अधिकार घटल्याने पशुपालक चिंतेत

मनोहर भोसले प्रकरणाचा एसआयटी तपास वेगाने, २४ सहआरोपी निष्पन्न; तिघांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
4

मनोहर भोसले प्रकरणाचा एसआयटी तपास वेगाने, २४ सहआरोपी निष्पन्न; तिघांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.