Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा; अन्यथा गांजा लागवडीला परवानगी द्या’; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. राज्य सहकारी शेतकरी विरोधी धोरण याला जबाबदार आहे. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही, बाजारपेठेत बोगस बियाणे, खते, कीटनाशके औषधे यांचा सुळसुळाट आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 16, 2025 | 03:13 PM
'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा; अन्यथा गांजा लागवडीला परवानगी द्या'; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा; अन्यथा गांजा लागवडीला परवानगी द्या'; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्याचा सातबारा पूर्णतः कोरा करावा. सरकारने निवडणुकीत कर्जमाफीचा शेतकऱ्यांना विविध आश्वासने दिली होती, ती आश्वासने पाळायला जमत नसतील, तर शेतामध्ये शेतकऱ्यांना गांजा लावायची परवानगी द्यावी. त्याचे मूल्यांकन पोलिसांनी करावे, अशी संतप्त मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी केली.

राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. राज्य सहकारी शेतकरी विरोधी धोरण याला जबाबदार आहे. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही, बाजारपेठेत बोगस बियाणे, खते, कीटनाशके औषधे यांचा सुळसुळाट आहे. शेतकरी कर्जबाजारी करण्यात सरकार व प्रशासन यांचा वाटा आहे. सरकार शेतमालाला भाव देऊ शकत नसेल आणि सातबारा कोरा करण्याची त्यांची तयारी नसेल तर शेतकऱ्याला शेतात गांजा लावायची परवानगी द्यावी.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गांजाला करोड रुपयांचा भाव आहे. गेल्याच आठवड्यात तामिळनाडूमध्ये विमानतळावर साडेअकरा किलो गांजा पकडण्यात आला. एक किलो गांजाला करोडचा भाव मिळत असेल तर महाराष्ट्रातील आर्थिक अडचणीत व खोट्या आश्वासनावर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्याला किलोला लाख रुपये भाव तरी मिळावा तर तो कर्जमुक्त होऊन सरकारला कर्ज देईल.

राज्यातील शासकीय कृषी व्यवस्था राजकीय पाठिंबा असलेल्या दलालांच्या ताब्यात आहे. खाजगी दुकानदारांच्या प्रभावाखाली चालणारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे दुकाने शेतकऱ्यांना लुटत आहेत. कांदा, सोयाबीन, दूध, ऊस, भाजीपाला हे कवडीमोल भावाने खरेदी केले जात आहेत. सरकारने तातडीने याबाबत पावले उचलावीत आणि शेतकऱ्याला वाचवावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कांद्याच्या भावामुळे शेतकरी चिंतेत

अवकाळी पावसामुळे कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. त्यातच आता बाजारातही कांद्याला भाव मिळत नाही. गुरुवारी सर्वाधिक 20 रुपये किलो घाऊक भाव मिळाला. तर दुसरीकडे, केंद्र सरकारच्या नाफेड एनसीसीएफमार्फतही कांद्याची खरेदी होत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

Web Title: Swabhimani shetkari sanghatana demand regarding farmers welfare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 03:13 PM

Topics:  

  • Farmer Issue
  • maharashtra farmers
  • Satara News

संबंधित बातम्या

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक
1

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक

Satara News : शिवभक्तांसाठी मोठी बातमी ; दक्षिण काशी वाईमध्ये लघु कुंभ मेळाव्याचे आयोजन
2

Satara News : शिवभक्तांसाठी मोठी बातमी ; दक्षिण काशी वाईमध्ये लघु कुंभ मेळाव्याचे आयोजन

Satara News : बॅडमिंटनप्रेमींसाठी पर्वणी; वाईची क्रीडा परंपरा अधिक समृद्ध करणारी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा
3

Satara News : बॅडमिंटनप्रेमींसाठी पर्वणी; वाईची क्रीडा परंपरा अधिक समृद्ध करणारी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
4

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.