Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena : “…संजय राऊत यांच्यावर कारवाई करा”, शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी नेपाळमध्ये सुरु असलेला हिंसाचार भारतात सुद्धा होऊ शकतो, असे विधान केले होते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 12, 2025 | 07:05 PM
"...संजय राऊत यांच्यावर कारवाई करा", शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी (फोटो सौजन्य-X)

"...संजय राऊत यांच्यावर कारवाई करा", शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : चिथावणीखोर वक्तव्य करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे केली. शिवसेनेच्या वतीने तशी मागणी करणारे निवेदन त्यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आले.

नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचाराची चित्रफित प्रसारित करून देशातही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी प्रक्षोभक वक्तव्ये करून संजय राऊत यांनी अराजक निर्माण करण्याचे मनसुबे जाहीर केले आहेत.त्यांनी सोशल मीडियावर टाकलेली ही पोस्ट चिथावणीखोर तर आहेच पण त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Pune Rain News: विश्रांती संपली! पुण्यात ‘कोसळधार’; अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ

लोकशाही मार्गाने आपण विजय मिळवू शकत नाही त्यामुळे अशी वक्तव्ये करून समाजात अशांतता आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून वारंवार सुरू आहे. निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था, प्रशासन, प्रसारमाध्यमे या लोकशाहितील चारही स्तंभांवर अविश्वास व्यक्त करून अराजक माजवण्याचे त्यांचे प्रयत्न यापूर्वीही उघड झाले आहेत. नेपाळमध्ये झाली तशीच हिंसा भारतात होऊ शकते असे म्हणून देशात हिंसाचार घडवण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या या चिथावणीखोर वक्तव्याची तातडीने दखल घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या पत्राद्वारे पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना खासदार मिलिंद देवरा, शिवसेना सचिव संजय मोरे, आमदार तुकाराम काते, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, प्रा.ज्योती वाघमारे, संजना घाडी, माजी नगरसेविका सुशिबेन शहा, तृष्णा विश्वासराव, सुवर्णा करंजे, आशा मामेडी हे उपस्थित होते.

संजय राऊत देशाविरोधात गरळ ओकतात – शीतल म्हात्रे

संजय राऊत सारखी व्यक्ती जे बोलते त्यामुळे शहरात बॉम्बच्या अफवा पसरणे, धमकीचे कॉल येणे असे प्रकार घडू शकतात त्यामुळे पोलीसांनी राऊत यांची चौकशी करणे आवश्यक आहे. राऊत पत्राचाळ घोटाळ्यात तुरुंगात जाऊन आलेले आहेत. राऊत हे मनोरुग्ण झाले आहेत. राऊत सातत्याने सोशल मिडियावर समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करतात, देशाविरोधी गरळ ओकतात, त्यामुळे राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे केल्याची माहिती शीतल म्हात्रे यांनी दिली आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त देवेन भारती संजय राऊतांवर कारवाई करणार का? त्यांना समज देणार की गुन्हा दाखल करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Navi Mumbai : NMT कडून प्रवाशांची अडवणूक; पनवेल रेल्वे स्थानक मार्गावर प्रवाशांची गैरसोय

Web Title: Take action against sanjay raut who is trying to create unrest by making provocative statements

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 07:05 PM

Topics:  

  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

Sanjay Raut Live : “नाशिकमध्ये गुन्हेगारीने टोक गाठलेलं…लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये; खासदार राऊतांचा इशारा
1

Sanjay Raut Live : “नाशिकमध्ये गुन्हेगारीने टोक गाठलेलं…लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये; खासदार राऊतांचा इशारा

ठाकरे बंधूंच्या रडारवर आता नाशिक! संयुक्त मोर्च्यामध्ये बाळा नांदगावकरांनी महाजन, भुजबळांसह नेत्यांना घेरलं
2

ठाकरे बंधूंच्या रडारवर आता नाशिक! संयुक्त मोर्च्यामध्ये बाळा नांदगावकरांनी महाजन, भुजबळांसह नेत्यांना घेरलं

“खून आणि क्रिकेट एक साथ कैसा? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरुन खासदार संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा
3

“खून आणि क्रिकेट एक साथ कैसा? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरुन खासदार संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत झाले संजय राऊतांचे वस्त्रहरण…; भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
4

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत झाले संजय राऊतांचे वस्त्रहरण…; भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.