Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SSC Exam 2026 : राज्यात दहावीची दहा टक्के परीक्षा केंद्रे सीसीटीव्हीविनाच; कॉपीमुक्तीचा उडाला बोजवारा

राज्यात दहावीची परीक्षा चालू झाल्या असून, यंदा राज्यभरात एकूण ५ हजार १११ मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे. मात्र त्यापैकी ५५४ केंद्रांवर १०.८३ टक्के सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 20, 2026 | 05:03 PM
राज्यात दहावीची दहा टक्के परीक्षा केंद्रे सीसीटीव्हीविनाच; कॉपीमुक्तीचा उडाला बोजवारा

राज्यात दहावीची दहा टक्के परीक्षा केंद्रे सीसीटीव्हीविनाच; कॉपीमुक्तीचा उडाला बोजवारा

Follow Us
Follow Us:
  • राज्यात दहावीची दहा टक्के केंद्रे सीसीटीव्हीविनाच
  • कॉपीमुक्तीचा उडाला बोजवारा
  • राज्यभरात २७१ भरारी पथके नेमली
पुणे : राज्यात दहावीची परीक्षा चालू झाल्या असून, यंदा राज्यभरात एकूण ५ हजार १११ मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे. मात्र त्यापैकी ५५४ केंद्रांवर १०.८३ टक्के सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे राज्यातील १९१ केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यापैकी ४२ केंद्रांवर सीसीटीव्हीविना परीक्षा होणार आहे. त्यामुळे परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) यांच्या वतीने परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विविध पातळ्यांवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षेदरम्यान काही ठिकाणी वैयक्तिक तसेच सामूहिक कॉपीचे प्रकार उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षेकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.

राज्यभरात २७१ भरारी पथके नेमली

संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यभरात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत असून, विभागीय मंडळ स्तरावरही विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. मंडळ सदस्य व जिल्हास्तरीय शासकीय अधिकाऱ्यांनाही परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले की, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे किंवा प्रत्यक्ष गैरमार्गाने वर्तन करणाऱ्यांविरुद्ध दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल.

हे सुद्धा वाचा : राज्यभरात कॉपी करणाऱ्यांवर मोठी कारवाई; परीक्षा केंद्रावरील 31 कर्मचारी निलंबित

सीसीटीव्ही नसलेल्या केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची बदली

राज्य मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ५५४ केंद्रांवर सीसीटीव्ही सुविधा नाही, त्या केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. या उपाययोजनेमुळे गैरप्रकारांना प्रतिबंध होईल.

Web Title: Ten percent of the 10th class examination centers in the state do not have cctv systems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Exam
  • Students

संबंधित बातम्या

Ajit Pawar: मोठी बातमी! अजितदादा पवार यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ द्या; राष्ट्रवादीच्या आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
1

Ajit Pawar: मोठी बातमी! अजितदादा पवार यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ द्या; राष्ट्रवादीच्या आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

मुंबईतील फनेल झोनमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती; मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे निर्देश
2

मुंबईतील फनेल झोनमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती; मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे निर्देश

GATE XH Exam: आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये शिकण्याची संधी? जाणून घ्या काय आहे ‘GATE XH’ परीक्षा!
3

GATE XH Exam: आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये शिकण्याची संधी? जाणून घ्या काय आहे ‘GATE XH’ परीक्षा!

कोंकणवासियांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ मोठ्या स्थानकावर ३ महत्त्वाच्या ट्रेन्स थांबणार; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश
4

कोंकणवासियांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ मोठ्या स्थानकावर ३ महत्त्वाच्या ट्रेन्स थांबणार; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.