मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) नुकताच मोठा निर्णय दिला. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) शिवसेना (Shivsena) हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. पण यावर सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय येणे अद्याप बाकी आहे. आज ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी युक्तिवाद मांडला.
एकनाथ शिंदेंना शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय नुकताच दिला आहे. यापूर्वी शिवसेनेतील आमदार, खासदारांसह अनेक नेत-पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यात आता सगळं काही हातातून गेल्यानंतर आता ठाकरे गटाला पक्षनिधी जाण्याची भीती सतावत आहे. त्यावरून ठाकरे गटाची बाजू मांडणाऱ्या कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद मांडला आहे. त्यांनी विधिमंडळातील पक्ष कार्यालय ताब्यात घेतले आहे. आता ते बँक अकाऊंट आणि सगळं ताब्यात घेतील. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी सिब्बल यांनी केली.
शिवसेना भवनाविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या शिंदे गटाला दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे. त्यातच आता शिवसेना भवनाविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. योगेश देशपांडे यांनी शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्ट विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.