मुंबई– सध्या ठाण्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. ठाण्यात सोमवारी रात्री ठाकरे गट व शिंदे गटात मोठा राडा झाला. (Thane Beating Case) यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटाकडून मारहाण झाली. रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांना गंभीर इजा झाली आहे, मुका मार लागला आहे. अंतर्गत रक्तस्राव झालेला नाही. तसंच त्या गर्भवती (Pregnant) नाहीत. असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. मात्र त्यांना आता पुढील उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, काल ठाकरे कुंटबीय ठाण्यात जाऊन आल्यानंतर आज ठाकरे गट व मविआकडून ठाण्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वात ठाण्यात आज पोलीस आयुक्तालयापर्यंत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. (Shinde Vs Thackeray)
रोशनी शिंदेंना लीलावती रुग्णालयात दाखल…
दरम्यान, ठाकरे गटाकडून आज रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीचा निषेधार्थ आज मविआकडून पोलीस आयुक्तलयावर टाळे ठोको आंदोलन करण्यात येणार आहे. पोलिसांनी या प्रकरणी रोशनी शिंदे यांच्याविरोधातच काल गुन्हा दाखल झाल्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. त्यामुळे आजच्या महामोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागंलय. तर चांगल्या उपचारासाठी रोशनी शिंदे यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळं येथे आज पुन्हा त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ठाकरे गटातीन नेते व पदाधिकारी जाण्याची शक्यता आहे.
नेमका वाद कशामुळं झाला?
फेसबुकवरील पोस्टवरुन ठाकरे आणि शिंदे गटात वाद झाला आणि त्यातून मारहाणीचा प्रकार घडला. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे या सोमवारी (3 एप्रिल) संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतण्याच्या तयारीत होत्या. त्यावेळी ऑफिसच्या आवारात शिरुन शिवसेनेच्या शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी आता सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी रोशनी शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा दावा राजन विचारे यांनी केला आहे. या प्रकरणावरुन आता ठाकरे विरुद्ध शिंदे असा वादही समोर आला असून, आजच्या मोर्च्यामुळं पुन्हा एकदा ठाण्यातील राजकीय वातावरण तापणार आहे.
तुमचे खरे काडतूस ईडी, आणि सीबीआय
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, रोशनी शिंदे यांना अतिशय निर्घृण अमानुष्य मारहाण केली आहे. काल ठाकरे कुटुंबीय त्या महिलेची विचारपूस करण्यासाठी ठाण्यात गेले होते. त्या महिलेवर मातृत्वाची उपचार सुरु आहेत. तरी सुद्धा पोलीस काही करत नाहीत, या सरकारला कोर्टानं नपुंसक म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी ‘फडतूस’ हा योग्य शब्द वापरला आहे. फडतूस म्हणजे बिनकामाचा असा याचा अर्थ आहे. नागपूर हे महाराष्ट्रात आहे, नागपूर आम्ही वेगळे होऊ देणार नाही. हे सरकार बिनकामाचे आहे, तुम्ही काडतूस असाल. तुमचे खरे काडतूस ईडी, आणि सीबीआय आहे, हे बाजूला ठेवून या, मग आम्ही काडतूस कुठे घुसवायचे ते बघतो, असा इशारा राऊतांनी फडणवीसांना दिला.