• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • The King Of Thane Is Creating A Vision Of Eleven Awakened Maruti Rayas

ठाण्याचा राजा घडवतोय अकरा जागृत मारूतीरायांचे दर्शन! नयनरम्य देखावा

ठाण्याचा राजा नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा राज्यातील अकरा जागृत मारूती मंदिरांचे दर्शन घडवणारा देखावा साकारला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 30, 2025 | 04:15 AM
ठाण्याचा राजा घडवतोय अकरा जागृत मारूतीरायांचे दर्शन! नयनरम्य देखावा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वैविध्यपूर्ण देखावे आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या पांचपाखाडी येथील नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रातील अकरा जागृत मारूतीरायांचे दर्शन घडविले आहे. पुरातन मंदिराची प्रतिकृती साकारून अकरा मारूतींचे एकाच ठिकाणी दर्शन घडविणारा हा देखावा पाहण्यास भाविकांची रीघ लागली आहे.

बारामतीच्या महिलांकडून दुबईला हिरवी मिरची निर्यात! ग्रामीण महिला आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकल्या

1979 मध्ये काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून या गणेशोत्सवाची सुरुवात केली. आज हा गणेशोत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जात आहे. मराठी माणूस हा जरी उत्कृष्ठ पर्यटक असला तरी त्याला देशभरातील मंदिरांची वारी करणे आर्थिकदृष्ट्या अन् सांसारिक अडचणींचा डोंगर पार करुन पूर्ण करणे शक्य होत नसते. याची जाणीव असलेल्या नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवात देशभरातील अनेक मंदिरशिल्पे साकारुन ठाणेकरांना भारतातील मंदिरांचे दर्शन पांचपाखाडीमध्येच घडविले आहे. सन 1979 पासून आजतागायत शहीद स्मारक, राजवाडा, महाराष्ट्राचे संस्कृतीदर्शन, हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेला काश्मिरमधील चरार-ए-शरीफ दर्गाह, स्वातंत्र्यानंतरचा भारत, स्वातंत्र्य लढ्यातील ठाणे शहर, मराठी माणसा जागा हो, भारतीय संस्कृतीचे दर्शन, युवाशक्ती, गणेश दरबार, मिनाक्षी मंदिर, गुंफा मंदिर, पार्वती महाल, राजस्थानी महाल, जोधा-अकबर महाल, सुवर्ण स्वर्ग अशा वैविध्यपूर्ण सजावटी साकारुन नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केवळ राज्यातच नव्हे तर देशात गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा पोहचविली आहे.
यंदा या मंडळाने राज्यातील अकरा जागृत मारूती मंदिरांचा देखावा उभारला आहे.

अष्टविनायकाच्या धर्तीवर अकरा मारूतींचे दर्शन करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहेत. त्याच अनुषंगाने 17 व्या शतकात प्रतिष्ठापीत केलेले शहापूर , सातारा येथील चुन्याचा मारूती, मसूर – सातारा येथील मसूर मारूती, चाफळ – सातारा येथील दास मारूती; वीर मारूती , शिंगणवाडी – सातारा येथील खडीचा मारूती, उंब्रज – सातारा येथील मठातील मारूती, माजगाव येथील माजगावचा मारूती, बहे- सांगली येथील बहेचा मारूती, मनपाडळे – कोल्हापूर येथील मनपाडळेचा मारूती, पारगाव- कोल्हापूर येथील बाळ मारूती आणि शिराळे-सांगली येथील वीर मारूती या अकरा मारूतींच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. त्यासाठी चार विशाल स्तंभांवर फायबर, लाकूड आणि नैसर्गिक रंग यांचा वापर करून 61 × 20 फूट आकारमानाचे दगडी भिंत भासावे, असे 15 फूट उंचीचे मंदिर उभारण्यात येणार आहे. या मंदिरात 20×20 फूट आकारमानाचा गाभारा, 41×20 फूट आकारमानाचे सभामंडप, 10×20 फुटांचे प्रवेशद्वार साकारण्यात आले आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने या देखाव्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडत आहे.

Pune News: एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वप्न अखेर पूर्ण; ‘इतक्या’ जणांना मिळाली पदोन्नती

या मंदिराची सजावट मंदार मोहन गोळे यांनी केली आहे. नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ( ठाण्याचा राजा ) प्रमुख सल्लागार व मार्गदर्शक डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सल्लागार मनोज प्रधान यांच्या पुढाकाराने अध्यक्ष संदीप पवार , उपाध्यक्ष संदेश प्रभू, सरचिटणीस रमेश चौधरी, कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे, खजिनदार दीपक भंगरथ यांच्यासह शेकडो सदस्य गणरायाच्या सेवेसाठी आहोरात्र परिश्रम घेत आहेत.

Web Title: The king of thane is creating a vision of eleven awakened maruti rayas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 04:15 AM

Topics:  

  • thane

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक झाले जाहीर; “सर्जनशील विनाश” ठरला अव्वल

अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक झाले जाहीर; “सर्जनशील विनाश” ठरला अव्वल

Raigad News :’ सीलिंग कायद्या’च्या अंमलबजावणीवरून मोठा गदारोळ; जंजिरा नवाबांच्या 4500 एकर जमिनीवर प्रश्नचिन्ह

Raigad News :’ सीलिंग कायद्या’च्या अंमलबजावणीवरून मोठा गदारोळ; जंजिरा नवाबांच्या 4500 एकर जमिनीवर प्रश्नचिन्ह

Breaking: राजकारणात भूकंप! मुख्यमंत्री वगळता भाजपच्या सर्व मंत्र्यांनी दिला राजीनामा; काय आहे नेमकं कारण

Breaking: राजकारणात भूकंप! मुख्यमंत्री वगळता भाजपच्या सर्व मंत्र्यांनी दिला राजीनामा; काय आहे नेमकं कारण

Navi Mumbai Crime : अनधिकृत फटाके स्टॉल्सचा वाढता विळखा; नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Navi Mumbai Crime : अनधिकृत फटाके स्टॉल्सचा वाढता विळखा; नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

भूपतीच्या शरणागतीच्या निर्णयाने नक्षलवादी क्षेत्रात खळबळ; सरकारच्या हाती आले मोठे यश

भूपतीच्या शरणागतीच्या निर्णयाने नक्षलवादी क्षेत्रात खळबळ; सरकारच्या हाती आले मोठे यश

Bihar Election Explainer: राजदमधून राजकारणाला सुरूवात अन् आता ‘तेजस्वी’लाच आव्हान; कोण आहेत सतीश यादव?

Bihar Election Explainer: राजदमधून राजकारणाला सुरूवात अन् आता ‘तेजस्वी’लाच आव्हान; कोण आहेत सतीश यादव?

Eng vs NZ T20 series: इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन घोषित! न्यूझीलंडविरुद्ध ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

Eng vs NZ T20 series: इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन घोषित! न्यूझीलंडविरुद्ध ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

व्हिडिओ

पुढे बघा
Sunil Tatkare : ‘त्यांनी आमच्यावर खालच्या लेव्हलला जाऊन टीका केली होती’

Sunil Tatkare : ‘त्यांनी आमच्यावर खालच्या लेव्हलला जाऊन टीका केली होती’

नगरमध्ये भगवा ट्रेंड! संग्राम जगतापांच्या आवाहनानंतर हिंदुत्वाची जोरदार हवा!

नगरमध्ये भगवा ट्रेंड! संग्राम जगतापांच्या आवाहनानंतर हिंदुत्वाची जोरदार हवा!

Kolhapur : फिलोशिपसाठी महाज्योतीचे संशोधक विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात

Kolhapur : फिलोशिपसाठी महाज्योतीचे संशोधक विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात

Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य;  अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य; अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.