फोटो सौजन्य - Social Media
ठाणे महापालिकेची नवीन भरती सुरू झाली आहे, ज्यात एकूण १७७३ पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती आस्थापकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय आणि निमवैद्यकीय सेवांमध्ये आहे. उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, विविध विभागांमध्ये नोकरीसाठी संधी उपलब्ध आहे.
अर्ज करण्याची मूळ तारीख २ सप्टेंबर २०२५ होती, परंतु तांत्रिक अडचणींमुळे काही उमेदवार अर्ज करू शकले नाहीत. त्यामुळे अंतिम तारीख आता १७ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया १२ ऑगस्टपासून सुरु आहे, त्यामुळे इच्छुकांनी लवकर अर्ज करणे गरजेचे आहे. ठाणे महापालिका १९८२ मध्ये स्थापन झाली असून, ही ‘ब’ वर्ग महापालिका आहे. महापालिकेत शिक्षण मंडळात ९०८८ कर्मचारी, परिवहन सेवेत २६०० कर्मचारी आणि कंत्राटी कामगार २५०० आहेत. सद्य लोकसंख्या सुमारे २६ लाखांहून अधिक आहे. रिक्त पदांची मुख्य कारणे म्हणजे अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असणे, मोठ्या संख्येने सेवानिवृत्ती आणि वाढीव पदांसाठी ८८० पदांची मंजुरी मिळणे.
अग्निशमन विभागसाठी एकूण ६०१ पदे उपलब्ध आहेत, ज्यात सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी १३, चालक/यंत्रचालक २०७, अग्निशमन जवान ३८१ हे पद समाविष्ट आहेत. आरोग्य विभागमध्ये परिचारीका ४५७, प्रसाविका ११६, ज्युनिअर टेक्नीशियन ६०, दवाखाना आया ४८, वॉर्डबॉय ३७, मॉरच्युरी अटेंडन्ट २८, शस्त्रक्रिया सहाय्यक २५, मल्टीपर्पज वर्कर ३३, तसेच सहाय्यक क्ष किरण तंत्रज्ञ, लॅबोरेटरी अटेंडन्ट, न्हावी, ब्लड बँक टेक्नीशिअन, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, मेडिकल रेकॉर्ड ऑफीसर, फिजीसिस्ट, औषध निर्माण अधिकारी, डायटीशियन, लिपीक, सहाय्यक परवाना निरीक्षक यासह ६५ प्रकारांची पदे आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागमध्ये कनिष्ठ अभियंता (नागरी) २४, कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) १६, कनिष्ठ अभियंता (विद्युत) ४ आणि कनिष्ठ अभियंता २ – ६३ पदे उपलब्ध आहेत. ही भरती स्थानिक तरुणांसाठी सुवर्णसंधी असून, महापालिकेत काम करण्याची संधी मिळेल. इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करणे महत्त्वाचे आहे, कारण ही अंतिम संधी आहे आणि वेळ संपल्यावर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे योग्य पात्रता असलेल्या उमेदवारांनी अर्ज प्रक्रियेत तत्काळ सहभागी होणे गरजेचे आहे.