Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News: १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! २७ गावांतील ५०० कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश

KDMC News: कल्याण ग्रामीणमधील २७ गावांतील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत सुमारे ५०० कर्मचाऱ्यांच्या १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे. केडीएमसीच्या महासभेत संबंधित कर्मचाऱ्यांचा महापालिका सेवेत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 21, 2026 | 06:30 PM
१२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! २७ गावांतील ५०० कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश

१२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! २७ गावांतील ५०० कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश

Follow Us
Follow Us:
  • केडीएमसी महासभेचा मोठा निर्णय
  • २७ गावांतील ५०० कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
  • नगरसेवक कुणाल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
KDMC News Marathi: कल्याण ग्रामीणमधील २७ गावांतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या तब्बल १२ वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. या गावांतील सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय केडीएमसीच्या महासभेत घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.

कल्याण ग्रामीणमधील २७ गावांचा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समावेश करण्यात आल्यानंतर या गावांमधील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेचा प्रश्न निर्माण झाला होता. गावांचा महापालिकेत समावेश झाला, मात्र तेथील सुमारे ५०० कर्मचाऱ्यांचा महापालिका सेवेत समावेश करण्यात आला नव्हता.

KDMC स्थायी समितीच्या सभेला अधिकारी गायब! सभापती-सदस्यांना जुमानत नाहीत का? अखेर सभा काही काळासाठी तहकूब

१२ वर्षांपासून सुरू होता संघर्ष

महापालिका सेवेत समावेश व्हावा यासाठी संबंधित कर्मचारी गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत होते. दीर्घकाळ प्रश्न प्रलंबित राहिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. अखेर या मागणीला आता यश मिळाले आहे. या प्रश्नासाठी शिवसेना गटाचे नगरसेवक कुणाल पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. महापालिका प्रशासन तसेच संबंधित स्तरावर त्यांनी कर्मचाऱ्यांचा प्रश्न वेळोवेळी उपस्थित केला. ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती.

केडीएमसी महासभेत निर्णय

अखेर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत २७ गावांतील संबंधित कर्मचाऱ्यांचा महापालिका सेवेत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. १२ वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यानंतर निर्णय झाल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. महापालिका सेवेत समावेशाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे त्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीला न्याय मिळाल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

कुणाल पाटील यांचा कर्मचाऱ्यांकडून सत्कार

निर्णयानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी नगरसेवक कुणाल पाटील यांचा सत्कार करून आभार मानले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून तो महासभेपर्यंत नेल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. २७ गावांचा केडीएमसीमध्ये समावेश झाल्यानंतर निर्माण झालेल्या विविध प्रशासकीय प्रश्नांपैकी कर्मचाऱ्यांच्या समावेशाचा मुद्दा महत्त्वाचा मानला जात होता. आता महासभेच्या निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांच्या १२ वर्षांच्या संघर्षाला मोठे यश मिळाल्याचे चित्र आहे.

गटई कामगारांवर कारवाईची नोटीस अन् बड्या अनधिकृत बांधकामांवर प्रश्नचिन्ह; महिला मंडळाचा हल्लाबोल

Web Title: 500 employees from 27 villages included in kdmc after 12 year struggle kunal patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Dombivli
  • kalyan
  • KDMC

संबंधित बातम्या

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
1

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Navratri Traffic: कल्याणमध्ये नवरात्रोत्सवासाठी वाहतुकीत मोठे बदल; ‘या’ ७ मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी
2

Navratri Traffic: कल्याणमध्ये नवरात्रोत्सवासाठी वाहतुकीत मोठे बदल; ‘या’ ७ मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी

KDMC News: ‘स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घ्या, अन्यथा हायकोर्टात जाऊ’; KDMC प्रशासनाला ठाकरे गटाचा इशारा
3

KDMC News: ‘स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घ्या, अन्यथा हायकोर्टात जाऊ’; KDMC प्रशासनाला ठाकरे गटाचा इशारा

KDMC News: डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग, कर्मचारीही गायब! उपायुक्तांच्या सरप्राईज व्हिजिटमध्ये सुमित एलकोच्या कामाची पोलखोल
4

KDMC News: डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग, कर्मचारीही गायब! उपायुक्तांच्या सरप्राईज व्हिजिटमध्ये सुमित एलकोच्या कामाची पोलखोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.