
Pune Ganeshotsav DJ Ban Row: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी डीजे बंदीची मागणी लावून धरली. त्यानंतर मात्र काही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा राग पण सहन करावा लागला.त्यांना मारहाण झाल्याची पण चर्चा होती. पण तरीही बापट डीजे नकोच या भूमिकेवर ठाम आहेत. Pune Ganeshotsav DJ Ban Row:
बापट यांचा मुद्दा आता सामन्य नागरिकांपर्यंत पोहोचला आहे. आज पुणेकर मंच नावाच्या संघटनेने लाऊड स्पीकर आणि डीजे बंद करा या मुख्य मुद्द्यावर त्यांनी थेट पुणे महानगरपालिकेवर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये बापट यांचा सहभाग नव्हता. पोलिसांनी त्यांच्या घरासमोर बंदोबस्त लावला होता. बापट यांनीच पोलिसांना सांगितलं की, मी या मोर्चात सहभागी होणार नाही.
त्यामुळे ते घरीच होते, पण त्यांचे समर्थक मात्र मोर्चात मोठ्या संख्येने आले होते. हा मोर्चा बालगंधर्व चौकातून सुरू झाला आणि थेट पुणे मनपापर्यंत गेला. या मोर्चात जवळपास 300 ते 350 लोक होते. सगळ्यांच्या हातात डीजे बंदी करा,असे फलक तसेच घोषणा देखील करत होते.
मनपामध्ये गेल्यावर त्यांनी पुणे पोलिसांना एक निवेदन दिलं. यानंतर पुणे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “तुम्ही बघताय, डीजे विरोधात मोर्चा बालगंधर्व ते मनपा असा असून या मोर्चामध्ये 300 ते 350 लोक आहेत. त्यांनी डीजे बंदीची मागणी केली आणि निवेदन देखील दिलं आहे. आम्ही या मागणीचा नक्की विचार करु”
गणपती बाप्पाच्या आगमनाआधी महामेट्रोचे मोठे गिफ्ट; Pune Metro ने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
ते पुढे म्हणाले, “सुप्रीम कोर्टाचे नियम आहेत. लाऊड स्पीकरमुळे ध्वनी प्रदूषण होतं. यासाठी पोलीस आयुक्तांनी प्रत्येक झोनमध्ये बैठक घेऊन सगळ्या गणेश मंडळांना सूचना दिल्या आहेत. काल दहीहंडीला पण डीजे कमी लावले होते. ईद-मिलादमध्ये पण कमी होते. जिथे आवाजाची मर्यादा ओलांडली तिथे आम्ही कारवाई केली आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की,ते नियम पाळायला लावत आहेत, पण पूर्ण बंदी घालणं शक्य नाही. ज्यांनी नियम मोडले त्यांच्यावर कारवाई झाली आहे.
या सगळ्या वादावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पण आपलं मत मांडलं आहे. त्या म्हणाल्या, “हा वाद खूपच टोकाला गेला आहे. दिवाळी पर्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. त्यामुळे सगळ्यांना एकत्र बसवून समंजसपणे मार्ग काढला पाहिजे. माझा जन्म पुण्यात झाला आहे. पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतात. पण हल्ली पुण्याबद्दल सतत वाईट बातम्या येत आहेत. लोकांना वर्दीची भीती राहिली नाही, याची खंत वाटते.”
हिंजवडीच्या वाहतूक कोंडीला कायमचा पूर्णविराम! ‘पीएमआरडीए’चा 2182 कोटींचा मास्टर प्लॅन
एकंदरीत पुण्यातला हा डीजे वाद आता चांगलाच वाढला आहे. एकीकडे सणाचा आनंद आणि दुसरीकडे ध्वनी प्रदूषणाचा त्रास, यातून मार्ग कसा निघणार हे बघावं लागेल. गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे, त्यामुळे पोलीस आणि मनपा काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.