Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News: कल्याण लोकसभेचे श्रीकांत शिंदे यांचा नागरी सत्कार होणार, महापालिकेच्या महासभेत सर्वानुमते ठराव मंजूर

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत महायुतीच्या नगरसेवकांनी यासंदर्भातील प्रस्ताव मांडला असून तो आज सर्वानुमते मंजूर करण्यात आला.  महापालिकेच्या महासभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 16, 2026 | 05:31 PM
कल्याण लोकसभेचे श्रीकांत शिंदे यांचा नागरी सत्कार होणार, महापालिकेच्या महासभेत सर्वानुमते ठराव मंजूर

कल्याण लोकसभेचे श्रीकांत शिंदे यांचा नागरी सत्कार होणार, महापालिकेच्या महासभेत सर्वानुमते ठराव मंजूर

Follow Us
Follow Us:
  • कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत सर्वानुमते ठराव मंजूर
  • कल्याण लोकसभेचे श्रीकांत शिंदे यांचा नागरी सत्कार होणार
  • लोकसभा मतदारसंघात पायाभूत सुविधा आणि नागरी विकास
कल्याण – कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांत झालेल्या मोठ्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा नागरी सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत महायुतीच्या नगरसेवकांनी यासंदर्भातील प्रस्ताव मांडला असून तो आज सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

गेल्या दशकभरात कल्याण लोकसभा मतदारसंघात पायाभूत सुविधा आणि नागरी विकासाच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना मिळाली आहे. मेट्रो, सिमेंट काँक्रीट रस्ते, रिंग रोड, उड्डाणपूल यांसारख्या मोठ्या प्रकल्पांसह विविध नागरी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतल्याची भावना महासभेत व्यक्त करण्यात आली. या कामांमुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था, नागरी सुविधा आणि एकूणच विकास प्रक्रियेला गती मिळाल्याचे नगरसेवकांनी नमूद केले.

गॅस सिलिंडरच्या टंचाईने नांदेडकर त्रस्त; अधिवेशनात लोकप्रतिनिधींचे मार्ग काढण्याचा प्रयत्न

महासभेत शिवसेनेचे गटनेते विश्वनाथ राणे आणि उपमहापौर राहुल दामले यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामगिरीचा गौरव केला. या प्रस्तावाला शिवसेना तसेच भाजपच्या नगरसेवकांनीही उत्स्फूर्त पाठिंबा दिला. सभागृहातील अनेक सदस्यांनी चर्चा करताना कल्याण लोकसभेत झालेल्या विविध विकासकामांचा उल्लेख करत खासदार शिंदे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

शिवसेनेचे नगरसेवक सचिन पोटे, विश्वनाथ राणे, अस्मिता मोरे, माया कांबळे यांच्यासह भाजपचे नगरसेवक वरुण पाटील, मंदार हळबे, दिपेश म्हात्रे आणि दया गायकवाड यांनी अभिनंदन प्रस्तावाला अनुमोदन देत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले. दरम्यान, कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे वरिष्ठ नगरसेवक निलेश शिंदे यांनी सभागृहात बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नागरी सत्काराची सूचना मांडली. या सूचनेचे सभागृहातील सर्व सदस्यांनी स्वागत केले. त्यानंतर महापौर ॲड. हर्षाली थविल-चौधरी आणि उपमहापौर राहुल दामले यांनीही समर्थन देत नागरी सत्काराचा ठराव अधिकृतरीत्या मंजूर केला. या ठरावामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा लवकरच नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

स्वप्नाच्या शहरात स्वत:चं घर! कोकण गृहनिर्माण मंडळाने ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या योजनेअंतर्गत 152 दिवसांत 3750 घरांची विक्री

Web Title: A civic reception will be held for kalyan lok sabha member shrikant shinde resolution passed unanimously in the municipal corporation general body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 05:31 PM

Topics:  

  • Dombivli
  • kalyan
  • KDMC
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Dombivli Tiranga Rally: १५ ऑगस्टनिमित्त डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅली; 35 हजार स्क्वेअर फिट राष्ट्रध्वजासह देशभक्तीचा जल्लोष
1

Dombivli Tiranga Rally: १५ ऑगस्टनिमित्त डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅली; 35 हजार स्क्वेअर फिट राष्ट्रध्वजासह देशभक्तीचा जल्लोष

KDMC News: शास्त्रीनगर रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीचा प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह, बाहेरील टेस्ट मात्र निगेटिव्ह
2

KDMC News: शास्त्रीनगर रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीचा प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह, बाहेरील टेस्ट मात्र निगेटिव्ह

Kalyan Stray Dog: कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत; कल्याणमध्ये भटक्या कुत्र्‍यांनी 125 हून अधिक नागरिकांचा घेतला चावा
3

Kalyan Stray Dog: कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत; कल्याणमध्ये भटक्या कुत्र्‍यांनी 125 हून अधिक नागरिकांचा घेतला चावा

Old Religious Items Collection: घरातील जुन्या देवमूर्ती फेकू नका! विधिवत निरोप देण्यासाठी विशेष संकलन उपक्रम
4

Old Religious Items Collection: घरातील जुन्या देवमूर्ती फेकू नका! विधिवत निरोप देण्यासाठी विशेष संकलन उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.