Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivli News: मुसळधार पावसातही तिरंगा रॅलीचा जल्लोष; संस्था-शाळांचा श्रीकांत शिंदेंच्या हस्ते गौरव

१५ ऑगस्टनिमित्त डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीला मुसळधार पावसातही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान देणाऱ्या १०० सामाजिक संस्था आणि ७१ शाळांचा कृतज्ञता सोहळ्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 31, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पावसातही डोंबिवलीतील तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
  • योगदान देणाऱ्या संस्था आणि शाळांचा कृतज्ञता सोहळ्यात गौरव
  • रॅलीतून देशभक्ती आणि एकतेचा संदेश देण्यात आला
 

१५ ऑगस्ट रोजी डोंबिवलीत साकारलेल्या ३५ हजार चौरस फुटांच्या विशाल तिरंग्यासह विश्वविक्रमी तिरंगा रॅलीच्या यशात मोलाचे योगदान देणाऱ्या १०० सामाजिक संस्था आणि ७१ शाळांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी डोंबिवली येथे कृतज्ञता सोहळा पार पडला. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात सहभागी झालेल्या मान्यवरांना प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या ऐतिहासिक तिरंगा रॅलीत मुसळधार पावसाचीही तमा न बाळगता हजारो विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते. ३५ हजार चौरस फुटांचा विशाल तिरंगा हातात घेरून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे डोंबिवलीत राष्ट्रभक्तीचा अभूतपूर्व सोहळा साकारला. या उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया, एशिया बूक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या तीन विक्रम नोंद संस्थांकडून अधिकृत नोंद करण्यात आली.

Mira Bhayandar : गणेशोत्सवाच्या पुरस्कार सोहळ्यात बंद AC; प्रताप सरनाईक संतापले, ‘पालिकेला 100 रुपयांची मनीऑर्डर पाठवतो’

१०० संस्था, ७१ शाळांचा सक्रिय सहभाग

या विश्वविक्रमी उपक्रमाच्या यशामागे डोंबिवलीतील १०० सामाजिक संस्था आणि ७१ शाळांचा सक्रिय सहभाग होता. विद्यार्थ्यांपासून शिक्षक, पालक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि स्वयंसेवकांपर्यंत विविध घटकांनी एकत्र येत या रॅलीला मोठे बळ दिले. या सर्वांच्या योगदानाची दखल घेत आजच्या कृतज्ञता सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात आला.

हजारो विद्यार्थी तिरंगा घेऊन झाले सहभागी

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रध्वजाबद्दलवा अभिमान आणि देशाप्रती असलेली जबाबदारी अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हजारो विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात घेऊन रॅलीत सहभाग घेतला, ही विशेष समाधानाची बाब आहे. नव्या पिढीने देशाच्या प्रगतीसाठी पुढे यावे आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात आपले योगदान द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. १०० सामाजिक संस्था आणि ७৭शाळांनी एकत्र येत दिलेले योगदान हे हे डोंबिवलीच्या सामाजिक एकतेचे उत्तम उदाहरण आहे. विविध क्षेत्रांतील संस्था, विद्यार्थी आणि नागरिक एका तिरंग्याखाली एकत्र येऊ शकतात, याची ताकद या रॅलीच्या माध्यमातून दिसून आली, या सर्वांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

ठाणे मॅरेथॉनसाठी जय्यत तयारी; ३० हजार धावपटूंचा सहभाग, शहरातील वाहतुकीत मोठे बदल

रॅलीत राष्ट्रभक्ती एकजुटीचे दर्शन

१५ ऑगस्टच्या या विश्वविक्रमी तिरंगा रॅलीने डोंबिवलीच्या सामाजिक आणि राष्ट्रभक्तीच्या एकजुटीचे दर्शन घडवले, तीन विक्रम नोंद संस्थांकडून या उपक्रमाची अधिकृत नोंद होणे ही डोंबिवलीसह संपूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी अभिमानाची बाब असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. या कृतज्ञता सोहळ्यास सहभागी सामाजिक संस्थांचे मान्यवर अध्यक्ष, शाळाचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Dombivli news participants of the world record tiranga rally honored by shrikant shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Dombivli
  • Dombivli News
  • Dr Shrikant shinde

संबंधित बातम्या

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
1

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Dombivli News: डोंबिवलीतील माणगावमध्ये चाळींवर जेसीबी; रहिवासी-विकासक आमनेसामने, मालकी हक्कावरून वाद
2

Dombivli News: डोंबिवलीतील माणगावमध्ये चाळींवर जेसीबी; रहिवासी-विकासक आमनेसामने, मालकी हक्कावरून वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.